Health | उन्हाळ्यात पोटातील उष्णता कमी करण्यासाठी आहारात या पदार्थांचा समावेश करा!
शेवग्याची भाजी पोटातील उष्णता शांत करते. यामुळे सध्याच्या उन्हाळ्याच्या हंगामामध्ये आपण आपल्या आहारामध्ये शेवग्याच्या समावेश करायला हवा. दुपारच्या वेळी आपण शेवग्याच्या सुपचा आहारामध्ये समावेश करावा. यामुळे शरीर हायड्रेटेड राहते. उष्माघातापासून चार हात लांब राहण्यासाठी आपण डिंकाचे सेवन करू शकतो. थंड डिंक पोटातील उष्णता कमी करण्यास मदत करते. डिंकचे लाडू देखील आपण आहारामध्ये घेऊ शकतो.
कडाक्याच्या उन्हात घराबाहेर पडणे कोणालाच आवडत नाही. मात्र, काही कारणांमुळे उन्हाळा असो किंवा पावसाळा घराच्या बाहेर पडावेच लागते. त्यामुळे पोटात उष्णता निर्माण होऊन तब्येत बिघडते. परंतू आपण काही पदार्थांचा आहारामध्ये समावेश करून पोटाच्या उष्णतेपासून आराम मिळू शकतो.
1 / 5
शेवग्याची भाजी पोटातील उष्णता शांत करते. यामुळे सध्याच्या उन्हाळ्याच्या हंगामामध्ये आपण आपल्या आहारामध्ये शेवग्याच्या समावेश करायला हवा. दुपारच्या वेळी आपण शेवग्याच्या सुपचा आहारामध्ये समावेश करावा. यामुळे शरीर हायड्रेटेड राहते.
2 / 5
उष्माघातापासून चार हात लांब राहण्यासाठी आपण डिंकाचे सेवन करू शकतो. थंड डिंक पोटातील उष्णता कमी करण्यास मदत करते. डिंकचे लाडू देखील आपण आहारामध्ये घेऊ शकतो.
3 / 5
भारतामध्ये सत्तूपासून अनेक पदार्थ तयार केले जातात. पोटात निर्माण झालेली उष्णता थंड करण्यासाठी याचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. उन्हाळ्यात दररोज एक ग्लास सत्तूचे पाणी प्यावे.
4 / 5
उन्हाळ्याच्या हंगामामध्ये व्हिटॅमिन सीयुक्त फळांचे सेवन अधिक प्रमाणात केले पाहिजे. यामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. तसेच यामुळे आपल्या शरीराला ऊर्जाही मिळते. (वरील टिप्स सामान्य माहितीवर आधारित आहेत, फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला घ्या)