शत्रूला धडकी भरवणाऱ्या स्वदेशी युद्धनौकेचं परीक्षण सुरू! जाणून घ्या IAC ‘विक्रांत’ची वैशिष्ट्ये

केरळच्या कोची इथे भारतीय नौदलाच्या शिपयार्डमध्ये विक्रांतची निर्मिती करण्यात आली आहे. सध्या इथे 48 जहाज आणि पाणबुड्यांच्या निर्मितीचं काम सुरू आहे.

1/7
भारतीय बनावटीची पहिली विमानवाहू युद्धनौका IAC 'विक्रांत'चं समुद्री परीक्षण बुधवारपासून (4 ऑगस्ट) सुरू करण्यात आलं आहे. यासोबतच भारतानं अत्याधुनिक युद्धनौकांची डिझाईन आणि निर्मिती करणाऱ्या जगातल्या मोजक्या देशांच्या पंक्तीत स्थान मिळवलं आहे.

2/7
IAC विक्रांत ही भारतात तयार झालेली सर्वात मोठी आणि जटील अशी युद्धनौका आहे. या युद्धनौकेचं वजन 40 हजार टन आहे. याआधी INS विक्रांतने 1971 च्या युद्धात महत्वपूर्ण भूमिका बजावली होती.

3/7
एक वर्ष समुद्रात परीक्षण केल्यानंतर 'विक्रांत' पुढच्यावर्षी अखेरपर्यंत नौदलात सामील होऊ शकते. 'विक्रांत' च्या निर्मितीवर फेब्रुवारी 2009 में काम सुरू करण्यात आलं होतं. मात्र, अनेकवेळा काम बंद करण्यात आलं. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी वेळ लागला.

4/7
IAC विक्रांत युद्धनौकेत 75 टक्के उपकरणं स्वदेशी आहेत. सोबतच विक्रांतच्या निर्मितीमध्ये अनेक भारतीय कंपन्यांची मदत घेण्यात आली आहे.

5/7
IAC विक्रांत युद्धनौकेवरून मिग-29 आणि इतर फायटर जेट्स टेक ऑफ करू शकतात. तब्बल 30 जेट्सची स्क्वाड्रन वाहून नेण्याची INS विक्रांतची क्षमता शकतं. सोबकच विक्रांतवर 25 'फिक्स्ड विंग' हेलिकॉप्टरही विक्रांत वाहून नेऊ शकतं. शिवाय विक्रांत 64 बराक मिसाईलने सज्ज आहे ज्या जमीनीवरून हवेत मारा करू शकतात.

6/7
कोणत्याही देशासाठी विमानवाहू युद्धनौका महत्वाची भूमिका बजावतात. अशाप्रकारच्या युद्धनौका या तरंगत्या बेटांसारख्या असतात. युद्धाच्यावेळी ऐन महासागरात फायटर जेट्स आणि हेलिकॉप्टरला टेकऑफ आणि लॅन्डिंगसाठी विमानवाहू युद्धनौका जागा उपलब्ध करून देतात. त्यामुळे शत्रूवर हवाई प्रहार करणं सहज शक्य होतं.

7/7
केरळच्या कोची इथे भारतीय नौदलाच्या शिपयार्डमध्ये विक्रांतची निर्मिती करण्यात आली आहे. सध्या इथे 48 जहाज आणि पाणबुड्यांच्या निर्मितीचं काम सुरू आहे.
केरळच्या कोची इथे भारतीय नौदलाच्या शिपयार्डमध्ये विक्रांतची निर्मिती करण्यात आली आहे. सध्या इथे 48 जहाज आणि पाणबुड्यांच्या निर्मितीचं काम सुरू आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI