PHOTO | आधी मैदान गाजवलं मग राजकारणात नशीब आजमावलं, काहींच्या गळ्यात मंत्रीपदांची माळ तर काही अपयशी

क्रीडाक्षेत्रात जोरदार कामगिरी केल्यानंतर अनेक खेळाडूंनी राजकारणात प्रवेश केला. यामध्ये काही खेळाडूंनी गरुड भरारी घेतली. तर काही अपयशी ठरले.

| Updated on: May 15, 2021 | 8:49 PM
क्रीडा क्षेत्राचा गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय क्षेत्राशी जवळचा संबंध राहिला आहे. मैदानात दमदार कामगिरी केल्यानंतर अनेक खेळाडूंनी राजकारणात नशीब आजमावलं. नुकताच टीम इंडियाचा माजी क्रिकेपटूची पश्चिम बंगालच्या राज्य क्रीडा मंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली. क्रीडा क्षेत्रातून राजकारणात प्रवेश केलेले काही खेळाडू हे यशस्वी ठरले. काहींनी मंत्रिपदापर्यंत मजल मारली. तर काही अपयशी ठरले. या सर्व खेळाडूंबाबत आपण जाणून घेणार आहोत.

1 / 12
यामध्ये आघाडीवर आहे तो मनोज तिवारी. मनोज तिवारीचा नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत विजय झाला. मनोज तृणमूल काँग्रेसच्या तिकीटावर शिबपूर मतदारसंघातून उभा होता. मनोजने भाजपच्या रतिंद्रनाथ चक्रवर्तीवर 32 हजार 339 मताधिक्याने विजय मिळवला.

2 / 12
माजी भारतीय गोलंदाज अशोक दिंडाही या निवडणुकीत उभा होता. दिंडाने भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवली. दिंडाने मोयना विधानसभा मतदारसंघातून दणदणीत विजय मिळवला.

3 / 12
भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार संदीप सिंहने आपल्या नेतृत्वात संघाला उंचीवर नेऊन  ठेवले. त्यानंतर त्याने राजकारणात नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला. भाजपने संदीपला 2019 च्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत पिहोवा मतदारसंघातून तिकीट दिलं. यामध्ये त्याचा विजय झाला. संदीप सध्या  हरियाणा सरकारमध्ये क्रीडामंत्री आहेत.

4 / 12
ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू योगेश्वर दत्तने राजकारणात नशीब आजमावलं. कुस्तीच्या मॅटवर मैदान मारणारा योगेश राजकारणात मात्र अपयशी ठरला. भाजपने योगेश्वरला हरियाणा विधानसभा निवडणुकीतून 2 वेळा संधी दिली. मात्र योगेश्वरला दोन्ही वेळा पराभवाचा सामना करावा लागला.

5 / 12
गौतम गंभीर, टीम इंडियाच्या टी 20 आणि एकदिवसीय वर्ल्ड कप विजेता संघाचा सदस्य. गंभीरने क्रिकेटला रामराम ठोकल्यानंतर त्याने भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर गंभीरने दिल्लीतून 2019 मध्ये लोकसभा निवडणूक लढवली. यामध्ये गंभीरचा विजय झाला. गंभीर खासदारासह समालोचक अशी दुहेरी भूमिका सार्थपणे पार पाडत आहे.

6 / 12
2004 च्या अथेन्स ऑलिम्पिकमध्ये राज्यवर्धन राठोड यांनी  सिल्वर मेडलची कमाई केली होती. ते सध्या जयपूर ग्रामीण लोकसभा मतदार संघातून खासदार आहेत. खासदार म्हणून ही त्यांची दुसरी वेळ आहे. याआधी ते देशाचे क्रीडामंत्रीही होते.

7 / 12
ऑलिम्पिक पदक विजेता विजेंदर सिंहने 2019 मधील लोकसभा निवडणूक लढवली होती. विजेंदर काँग्रेच्या तिकीटावर दक्षिण दिल्लीमधून उभा होता. मात्र विजेंदरचा पराभव झाला.

8 / 12
टीम इंडियाचा माजी फलंदाज मोहम्मद कैफने 2014 ची लोकसभा निवडणूक लढवली. तो काँग्रेसच्या तिकीटावर उत्तर प्रदेशमधील फूलपूर मतदारसंघातून उभा होता. मात्र लोकांनी त्याला कौल दिला नाही.

9 / 12
टीम इंडियाचा माजी कर्णधार मोहम्मद अझहरुद्दीने 2009 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमधील मोरादाबद मतदारसंघातून विजय मिळवला. मात्र 2014 च्या लोकसभा निवडणुकीत अझरुद्दीनला पराभवाचा सामना करावा लागला.

10 / 12
टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंह सिद्धू यांनी 2004 मध्ये राजकारणात पाऊल ठेवलं. त्यांनी अमृतसरमधून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवली. ते 2004-14 पर्यंत खासदार होते. मात्र त्यांनी 2014 मध्ये भाजपला रामराम ठोकत काँग्रेसचा हात धरला. नवज्योत सिंह सिद्धू पंजाब सरकारमध्ये मंत्री होते.

11 / 12
लिटील मास्टर सुनील गावसकरांसोबत सलामीला येणारे चेतन चौहान यांनीही राजकारणात नशीब आजमावलं होतं. चौहान यांचं गेल्या वर्षी कोरोनामुळे निधन झालं. ते योगी सरकारमध्ये मंत्री होते. तसेच ते अमरोह लोकसभा मतदारसंघातून 2 वेळा खासदार होते.

12 / 12
Non Stop LIVE Update
Follow us
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.