मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्याचा वेध घेणाऱ्या चित्रपटाची चर्चा

अत़्यंत साध्या अशा या कार्यकर्त्याचा जीवनपट आणि आरक्षणासाठीचा संघर्ष समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी 'संघर्षयोद्धा- मनोज जरांगे पाटील' या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित केल्यापासूनच लोकांमध्ये त्याविषयी खूपच उत्सुकता आहे.

| Updated on: Feb 21, 2024 | 1:01 PM
मराठा आरक्षण हा सध्या महाराष्ट्रातील अत्यंत ज्वलंत मुद्दा झाला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे आणि त्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता झटणाऱ्या  मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

1 / 6
'संघर्षयोद्धा- मनोज जरांगे पाटील' असं या चित्रपटाचं नाव असून याचं शूटिंग नुकतंच पूर्ण झालं आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी याठिकाणी या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं असून आता हा चित्रपट येत्या 26 एप्रिल 2024 ला  संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

2 / 6
सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेतर्फे 'संघर्षयोद्धा- मनोज जरांगे पाटील' या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेता रोहन पाटीलने साकारली आहे. गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाची कथा आणि निर्मिती केली असून सुधीर निकम यांनी पटकथा आणि संवाद लेखन केलं आहे. तर शिवाजी दोलताडे यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी निभावली आहे.

3 / 6
या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हांडे,  माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर, सोमनाथ अवघडे, किशोर चौगुले, सिद्धेश्वर झाडबुके यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

4 / 6
महाराष्ट्रात ऐतिहासिक आणि सामाजिकदृष्ट्या सर्वात महत्त्वाचा समाज म्हणून मराठा समाजाची एक वेगळीच ओळख आहे.  इतिहासात शेतकरी आणि योद्धे म्हणून मराठ्यांना ओळखलं जायचं. मराठ्यांच्या आरक्षणासाठी  'एक मराठा, लाख मराठा' म्हणत 2016 मध्ये राज्यभर भव्य मोर्चे निघाले होते.

5 / 6
त्यानंतर राज्य सरकारने  दिलेले आरक्षण न्यायालयात टिकलं नाही. या पार्श्वभूमीवर  मराठा आरक्षणाच्या मागणीने पुन्हा जोर धरला आहे.  त्यात आघाडीवर आहेत ते अंतरवाली सराटी या गावातील मनोज जरांगे पाटील... आंदोलनं, उपोषणं करून त्यांनी आरक्षणाची मागणी लावून धरली आहे. त्यांना राज्यभरातून तुफान पाठिंबा मिळत आहे.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?.
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा.
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद.
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?.
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.