OTT | ‘द फॅमिली मॅन’, ‘काला’सोबतच ‘या’ वेब सीरीजदेखील करतील तुमचं मनोरंजन, आवर्जून पहाच!

सध्या लॉकडाऊनमुळे चित्रपटगृह बंद असली तर ओटीटीमुळे मनोरंजनाच्या नव्या वाटा खुल्या झाल्या आहेत. अशावेळी तुम्हाला देखील वेब सीरीज बघण्याची आवड असेल, तर या 13 वेब सीरीज नक्की पहाच!

1/13
एका महिलेची अचानक मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यावर तिच्या आजूबाजूला नेमकं काय घडतं, याकडे 'महाराणी' या वेब सीरीजने लक्ष वेधलं आहे. अभिनेत्री हुमा कुरेशीने यात मुख्य भूमिका साकारली असून, 28 मे ला ही वेब सीरीज सोनी लिव्हवर पाहता येणार आहे.
2/13
पैसे जिंकण्याच्या नादात 23 जणांचे आयुष्य कसे बदलते, याची कथा या वेब सीरीजमध्ये पाहता येणार आहे. पॅनिक ही वेब सीरीज 28 मेपासून Amazon प्राईमवर पाहता येणार आहे.
3/13
'द फॅमिली मॅन 2' ही मनोज बाजपेयी अभिनित वेब सीरीज 4 जून पासून Amazon प्राईमवर पाहता येणार आहे.
4/13
सायकॉलीजीकल थ्रिलरचीची आवड असणाऱ्यांना 'काला' ही सीरीज 4 जूनपासून Aha Video वर पाहता येणार आहे.
5/13
मार्वेल स्टुडीओची आणखी एक बहारदार सीरीज 'लोकी' 9 जूनपासून Disney Plus Hotstar वर पाहता येणार आहे.
6/13
एका दुर्घटनेनंतर जगातील सगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू बंद पडतात.. पुढे काय होतं हे जाणून घेण्यासाठी 9 जूनपासून 'अवेक' ही सीरीज नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे.
7/13
सुनील ग्रोव्हर अभिनित 'सनफ्लॉवर' ही मर्डर मिस्ट्री सीरीज 11 जूनपासून 'झी 5'वर पाहता येणार आहे.
8/13
उत्तर भारतातील छोट्या 'स्केटर' मुलीची कथा सांगणारी 'स्केटर गर्ल' ही वेब सीरीज 11 जूनपासून नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे.
9/13
एक सामान्य मुलगी आणि एका ड्रग्ज व्यसनी व्यक्तीची प्रेमकथा सांगणारी 'द सोवेनिअर' ही सीरीज 17 जूनपासून नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे.
10/13
ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या 1 वर्षानंतर सुरु होते 'कातला'ची कथा...ही सीरीज 17 जूनपासून नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे.
11/13
साऊथ सुपरस्टार धनुषची 'जगमे थंदिरम' 18 जूनपासून नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे.
12/13
लेकीला जन्म देताच मातृत्व हरपल्याने, या चिमुकल्या जीवाचा संभाळ करणाऱ्या एकट्या बापाची ही कथा 'फादरहूड' 18 जूनपासून नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे.
13/13
चार अनाथ मुलं आणि एक सिक्रेट मिशन... 'द मिस्टीरीअस बेनेडिक्ट सोसायटी' ही वेब सीरीज 25 जूनपासून Disney Plus Hotstar वर पाहता येणार आहे.