नंदुरबार: सारंगखेड्यातील प्रसिद्ध चेतिक फेस्टिव्हलचं वैशिष्ट्य असलेल्या अश्वनृत्य स्पर्धा नुकतीच पार पडली. घोड्यांच्या दिलखुलास अदा पाहून अश्वशौकीन अक्षरश: भारावून गेले. चेतक फेस्टिव्हलमध्ये रविवारी झालेल्या अश्वनृत्य स्पर्धेत 32 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. त्यातील पाच विजयी घोड्यांची निवड करण्यात आली. त्यातली सर्वोत्तम कोण हे 29 तारखेला जाहीर होईल. या स्पर्धेत गुजरात येथून आलेली वाघेला यांची मुन्नी, मध्यप्रदेश […]
नंदुरबार: सारंगखेड्यातील प्रसिद्ध चेतिक फेस्टिव्हलचं वैशिष्ट्य असलेल्या अश्वनृत्य स्पर्धा नुकतीच पार पडली. घोड्यांच्या दिलखुलास अदा पाहून अश्वशौकीन अक्षरश: भारावून गेले.चेतक फेस्टिव्हलमध्ये रविवारी झालेल्या अश्वनृत्य स्पर्धेत 32 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. त्यातील पाच विजयी घोड्यांची निवड करण्यात आली. त्यातली सर्वोत्तम कोण हे 29 तारखेला जाहीर होईल.या स्पर्धेत गुजरात येथून आलेली वाघेला यांची मुन्नी, मध्यप्रदेश वडवणी येथून आलेला सूर्या, राजस्थान जव्हेर येथून आलेली कतरिना, महाराष्ट्रातील हिरापूर येथून आलेला मोती आणि गुजरात येथून आलेली जानकी यांची पाच जणांमध्ये निवड झाली आहेया अश्व नृत्य स्पर्धामध्ये घोड्यांनी दिलखेच अदा सादर केली. अश्वप्रेमींनी त्याला भरभरुन दाद दिली.ही अश्वनृत्य स्पर्धा पाहण्यासाठी देशभरातून अश्वशौकीन अश्वपंढरी असलेल्या सारंगखेडा येथील चेतक फेस्टिव्हलला आले होते.या स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावणाऱ्या अश्वाला 1लाख रुपये तर दुसऱ्या अश्वाला 75 हजार आणि तिसऱ्या अश्वाला 50 हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. याशिवाय चौथ्या नंबरला 25 हजार आणि पाचव्या क्रमांकावरील अश्वाला 7 हजार रुपयांचं बक्षीस मिळेल.आज चेतक फेस्टिव्हलमध्ये घोड्यांची शर्यत होणार आहे. घोड्यांच्या रेसचा थरार पाहण्यासाठी आज सारंगखेड्यात मोठी गर्दी होऊ शकते.चेतक फेस्टिव्हल समिती आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्यावतीने विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत.