AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘बिग बॉस’ फेम जोडीचा लग्नाआधीच ब्रेकअप; 2 वर्षांपूर्वी केला साखरपुडा

2022 मध्ये साखरपुडा केल्यानंतर हे दोघं लवकरच लग्नबंधनात अडकणार होते. जवळपास चार वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर आता त्यांनी ब्रेकअपचा निर्णय जाहीर केला आहे. पाच महिन्यांपूर्वीच या दोघांनी आपले मार्ग वेगळे केले आहेत.

| Updated on: Feb 13, 2024 | 2:03 PM
Share
'बिग बॉस 14'मध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेली जोडी म्हणजे अभिनेत्री पवित्रा पुनिया आणि एजाज खान. बिग बॉसच्या घरात या दोघांमध्ये मैत्री झाली आणि या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. घरातून बाहेर पडल्यानंतर पवित्रा आणि एजाज लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले होते.

1 / 5
जवळपास चार वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर आता पवित्रा आणि एजाजने ब्रेकअप केल्याचं जाहीर केलंय. एकमेकांशी पटत नसल्याने पाच महिन्यांपूर्वीच ब्रेकअप केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मुंबईतील मालाडमध्ये हे दोघं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.

2 / 5
पाच महिन्यांपूर्वी ब्रेकअप झाला असला तरी गेल्या महिन्यात एजाज त्या घरातून बाहेर पडला. आता दोघांनीही बॉम्बे टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत ब्रेकअप जाहीर केला आहे. 'काहीच पर्मनंट नसतं', असं पवित्रा या मुलाखतीत म्हणाली.

3 / 5
"प्रत्येक नात्याचा एक काळ ठरलेला असतो. आमचं नातं फार काळ टिकलं नसलं तरी मी एजाजच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छाच देते. त्याचा मी आजही तितकाच आदर करते", असं पवित्रा म्हणाली. तर दुसरीकडे पवित्रालाही तिला अपेक्षित असलेलं प्रेम आणि यश मिळावं अशी आशा एजाजने व्यक्त केली.

4 / 5
2022 मध्ये पवित्रा आणि एजाजने साखरपुडासुद्धा केला होता. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत त्यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी सांगितली होती. एजाज आणि पवित्रा हे दोघं टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार आहेत. एजाजने  शाहरुख खानच्या 'जवान'मध्ये भूमिका साकारली होती. तर पवित्रा 'नागमणी' मालिकेत काम करतेय.

5 / 5
Follow Us
मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी
Mumbai Toll Tax : मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी टोल महागले....
ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि...
Raj Thackeray : Uddhav Thackeray : ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि संविधान.....
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?