केळ म्हटलं की कच्चा रंगाच्या केळीचा रंग हिरवा तर पिकलेल्या केळीचा रंग पिवळा आठवतो. मात्र, तुम्हाला माहिती आहे की निळ्या रंगाचीही केळी आहे? हो, निळ्या रंगाचीही केळी असते आणि त्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे असल्याचंही बोललं जातंय.
1 / 5
माध्यमांमधील रिपोर्टनुसार, या केळीची शेती कमी तापमान असलेल्या थंड प्रदेशात होते. सध्या दक्षिण पूर्व आशिया आणि दक्षिण अमेरिकेत या केळीची शेती होते. फ्लोरिडा, कॅलिफोर्निया, टेक्सास आणि लुइसियाना येथे या केळीचं सर्वाधिक उत्पन्न होतं.
2 / 5
निळं केळ वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातंय. हवाईमध्ये याला आईसक्रीम बनाना, फिजीमध्ये हवाईय बनाना, फिलिपीन्समध्ये क्री नावाने हे केळ ओळखलं जातं. निळ्या केळीला ब्लू जावा बनाना (Blue Java Banana) असंही म्हटलं जातं.
3 / 5
सोशल मीडियावर काही लोक निळ्या केळीविषयी लिहित आहेत. त्यापैकी एकाने निळ्या केळीची चव अगदी व्हॅनिला आईसक्रीम सारखी लागते, असं म्हटलंय.
4 / 5
निळी केळी खाल्ल्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे असल्याचंही सांगितलं जातं. ही केळी बद्धकोष्टता कमी करते, आयर्नची कमतरता भरुन काढते आणि पचं संस्थेला तंदुरुस्त करते.