By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.
लेह लडाखमध्ये बाईक रायडिंग करावी, तिथला निसर्ग स्पोर्ट बाईकवर फिरत अनुभवावा असं अनेकांचं स्वप्न असतं. या स्वप्नाला देशातील बड्या नेत्यानं सत्यात उतरवलं आहे.
हे फोटो पाहून तुम्हाला वाटेल की हा एखाद्या सराईत बाईक रायडरचा फोटो आहे. पण तसं नाहीये. ही व्यक्ती एका राजकीय पक्षाचा नेता आहे.
हे आहेत काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि केरळच्या वायनाड मतदारसंघाचे खासदार राहुल गांधी...
राहुल गांधी यांनी लेह लडाखच्या रस्त्यावर बाईक रायडिंगचा आनंद लुटला. याचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेत.
पॅंगॉन्ग सरोवर... ज्याला माझे वडील जगातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक, असं म्हणायचे, असं कॅप्शन राहुल गांधी यांनी या फोटोंना दिलं आहे.
राहुल गांधींचा हा हटके अंदाज त्यांच्या चाहत्यांच्या पसंतीला उतरतोय. Happy Journey, असं म्हणत त्यांच्या समर्थांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.