Ravrambha : साताऱ्यातील ‘अजिंक्यतारा’मध्ये रावरंभा चित्रपटाचे शुटिंग सुरू, खासदार उदयनराजेंनी दिली भेट

साताऱ्यातील अजिंक्यतारा याठिकाणी रावरंभा चित्रपटाचे शुटिंग सुरू आहे. धुलिवंदनाच्या दिवशी चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान खासदार उदयनराजे भोसले यांनी शुटिंगस्थळी भेट दिली. 'रावरंभा' या चित्रपटाची निर्मिती शशिकांत पवार करत आहेत. बेभान, झाला बोभाटा, भिरकीट असे चित्रपट केलेले अनुप अशोक जगदाळे या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत.

Mar 19, 2022 | 9:23 AM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शुभम कुलकर्णी

1 / 5
खासदार उदयनराजे भोसले चित्रपटाच्या शुटिंगस्थळावर आल्यावर त्यांनी चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या. यावेळी अजिंक्यतारा किल्ल्यावर उदयनराजेंच्या उपस्थितीत चित्रीकरणाला सुरुवात करण्यात आली.

2 / 5
ऐतिहासिक कथानक मांडण्यात हातखंडा असलेल्या प्रताप गंगावणे यांनी “रावरंभा”चं लेखन केलं आहे. इतिहासाच्या पानांमध्ये रावरंभा ही सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांतील एक अनोखी प्रेमकहाणीही दडली आहे. ही प्रेमकहाणीच रावरंभा या चित्रपटातून पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर येत आहे.

3 / 5
संजय जाधव यांच्यासारख्या सिनेमॅटोग्राफरच्या दृष्टिकोनातून चित्रीत होणारी रावरंभा ही ऐतिहासिक प्रेमकहाणी प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरेल यात मुळीच शंका नाही. या चित्रपटाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या सातारा जिल्ह्यात चित्रित होणारा हा पहिलाच ऐतिहासिक चित्रपट ठरणार आहे.

4 / 5
रावरंभा ही ऐतिहासिक प्रेमकहाणी असणाऱ्यात चित्रपटात कलाकार ओम भूतकर, अशोक समर्थ, संतोष जुवेकर,रोहित चव्हाण, संजय पाटील, विनायक चौगुले, कार्यकारी निर्माता अन्वय नायकवडी, प्रशांत नलवडे, पंकज चव्हाण आहेत. सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांतील एक अनोखी प्रेमकहाणीही या चित्रपटात आहे.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें