AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

400 वर्षांची परंपरा, 50 हजारांपासून ते 15 कोटींपर्यंतचे घोडे अन्…; अश्वांच्या सर्वात मोठ्या पंढरीबद्दल तुम्हाला माहितीये का?

नंदुरबारमधील जागतिक कीर्तीच्या सारंगखेडा चेतक फेस्टिवलला मोठ्या दिमाखात सुरुवात झाली आहे. ३ हजारांहून अधिक जातिवंत अश्व, ₹१५ कोटींचा 'ब्रह्मोस' घोडा आणि थरारक स्पर्धा सुरु आहेत. या ऐतिहासिक अश्व बाजाराची वैशिष्ट्ये आणि उलाढाल किती हे जाणून घेऊया

| Updated on: Dec 14, 2025 | 3:37 PM
Share
अश्वांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेड्याच्या जागतिक कीर्तीच्या चेतक फेस्टिवलला यंदाही मोठ्या दिमाखात सुरुवात झाली आहे. १८व्या शतकापासून सुरू असलेल्या या ऐतिहासिक यात्रेचा संबंध थेट छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांच्या अश्वपरंपरेशी जोडला जातो.

1 / 14
देशभरातून जातिवंत अश्व या यात्रेसाठी दाखल होत असून, सारंगखेडा हे उत्कृष्ट आणि जातिवंत घोड्यांसाठी जगप्रसिद्ध बाजार मानला जातो. देशभरात प्रसिद्ध असलेल्या सारंगखेड्याच्या चेतक फेस्टिवलला दत्त जयंतीच्या दिवशी खऱ्या अर्थाने सुरुवात होत असते. सारंगखेडा येथे महानुभाव पंथाचे एकमुखी दत्त मंदिर असून, दत्त जयंतीपासूनच या यात्रेला खरी सुरुवात होते.

2 / 14
यंदा या अश्व बाजारात ३ हजारांहून अधिक घोडे दाखल झाले आहेत. यंदा मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे तो गुजरातचे नागेश देसाई यांचा मारवाडी जातीचा ब्रह्मोस घोडा. या घोड्याला पुष्कर बाजारात ८ कोटींची बोली लागली होती, मात्र मालकांनी त्याची किंमत १५ कोटी रुपये असल्याचे सांगितले आहे.

3 / 14
त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशातील महेश्वर येथून आलेली मारवाडी जातीची रुद्राणी घोडी देखील आकर्षण ठरत आहे. पुष्कर बाजारात रुद्राणीसाठी १ कोटी १७ लाखांची मागणी झाली होती, मात्र मालकांनी विक्रीस नकार दिला.

4 / 14
तर पांढऱ्या शुभ्र नुकरा जातीचा व्हाईट कोब्रा हा घोडा देखील चर्चेत असून, त्याची किंमत १ कोटी ७२ लाख रुपये ठेवण्यात आली आहे. या अश्वांची किंमत जशी असते त्याच पद्धतीने त्यांच्या आहार देखील पोषक असतो.

5 / 14
या अश्वांना दूध, तूप, काजू, बदाम, गहू, तांदूळ, हरभरे, बाजरी, सरसोचे तेल, शुद्ध आरो फिल्टरचे पाणी आणि वातावरणानुसार मसाल्यांचा पौष्टिक आहार दिला जात असतो. या अश्व बाजारात ५० हजारांपासून ते तब्बल १५ कोटी रुपयांपर्यंतचे घोडे या बाजारात दाखल झाल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

6 / 14
देशातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा घोडेबाजार म्हणून सारंगखेड्याची ओळख आहे. या बाजारात केवळ खरेदी-विक्रीच नाही, तर विविध प्रकारच्या स्पर्धांसाठीही घोडे दाखल होतात. रेवाल चाल स्पर्धा, नृत्य स्पर्धा, नुकरा अश्व स्पर्धा, मारवाडी दोन दात मादी व नर अश्व स्पर्धा, मारवाडी मादी व नर अश्व स्पर्धा अशा विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.

7 / 14
या स्पर्धांमध्ये घोड्यांची उंची, चाल, बांधा, रंग, शिस्त यांचा बारकाईने अभ्यास केला जातो. स्पर्धेत विजयी ठरणाऱ्या घोड्यांना ब्रीडिंगसाठी मोठी मागणी असते, त्यामुळे त्यांच्या किंमती लाखो-कोटींमध्ये पोहोचतात.

8 / 14
अशा विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धांमध्ये घोड्यांची उंची, चाल, बांधा, रंग, शिस्त यांचा बारकाईने अभ्यास केला जातो. स्पर्धेत विजयी ठरणाऱ्या घोड्यांना ब्रीडिंगसाठी मोठी मागणी असते, त्यामुळे त्यांच्या किंमती लाखो-कोटींमध्ये पोहोचतात.

9 / 14
राजस्थानातील पुष्करनंतर देशातील सर्वात मोठा घोडेबाजार म्हणून सारंगखेड्याकडे पाहिले जाते. यंदा ही यात्रा ४ डिसेंबरपासून सुरू झाली असून, या बाजारात आतापर्यंत ३ कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. तर २१ डिसेंबरपर्यंत सुरू राहणाऱ्या या बाजारात ५ कोटींहून अधिक उलाढाल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

10 / 14
या बाजारात मारवाडी, काठेवाडी, सिंधी, पंजाबी तसेच गावठी अश्वांची मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री होत आहे. राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, आंध्रप्रदेश, तामिळनाडू आदी राज्यांत घोडेबाजार भरत असले, तरी सर्वात दर्जेदार आणि उत्कृष्ट घोड्यांचा बाजार सारंगखेड्याच्याच चेतक फेस्टिवलमध्ये भरतो, असे व्यापाऱ्यांचे मत आहे.

11 / 14
घोडे मालकांसाठी तसेच घोड्यांसाठी येथे आवश्यक सर्व सुविधा मिळत असल्याने हा बाजार सर्वात लोकप्रिय बाजार म्हणून ओळखला जाऊ लागला आहे सारंगखेड्याच्या यात्रेला चारशे वर्षांचा इतिहास लाभला आहे. मात्र २०१२ पासून चेतक फेस्टिवलला सुरुवात झाली आहे.

12 / 14
परंतु सरकारने या अश्वांच्या बाजाराकडे पाहिजे तसे लक्ष दिलेले नाही आहे. देशातील दुसऱ्या क्रमांकाचा अश्व बाजार आहे. यामुळे राज्य शासनाने या बाजाराकडे लक्ष देऊन, हा बाजार आणखीन मोठा कसा होईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे. इतिहासाची साक्ष देणारी आणि अश्वसंस्कृती जपणारी सारंगखेड्याची यात्रा आजही तितकीच वैभवशाली आहे.

13 / 14
चेतक फेस्टिवलमध्ये जातिवंत आणि उंच अश्व पाहण्याची तसेच थरारक स्पर्धांचा अनुभव घेण्याची संधी मिळते. अश्वांच्या या ऐतिहासिक पंढरीचे वैभव अनुभवायचे असेल, तर सारंगखेड्याला भेट देण्यासाठी एकदा यावे लागेल.

14 / 14
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!.
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा.
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा.
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत.
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात.
नागपुरात शिक्षकांचं विविध मागण्यासाठी आंदोलन
नागपुरात शिक्षकांचं विविध मागण्यासाठी आंदोलन.
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.