Splits Hair Home Remedies | दुतोंडी केसांच्या समस्येने त्रस्त आहात? मग ‘हे’ घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Splits Hair Home Remedies : दुतोंडी केस असणे किंवा केसांना फाटे फुटणे ही एक सामान्य समस्या आहे. आपण या समस्येपासून मुक्त होण्यासाठी काही घरगुती उपाय देखील अवलंबू शकता.

1/5
दुतोंडी केसांच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी आपण मध आणि गुलाबपाणी मिसळून केसांमध्ये लावू शकता.
2/5
अवाकॅडो आणि बदाम देखील या समस्येवर गुणकारी ठरतात. यासाठी आपण अवाकाडो आणि बदाम तेल एकत्र करून पेस्ट बनवू शकता. ही पेस्ट केस आणि टाळूवर लावा. यानंतर सौम्य शँम्पूने केस धुवा.
3/5
केस धुण्यापूर्वी एक तास आधी आपण नारळ तेल केसांमध्ये लावू शकता. यामुळे केसांचे नुकसान होण्यापासून संरक्षण होते.
4/5
आपले केस नियमितपणे ट्रीम करणे हा दुतोंडी केस टाळण्याचा उत्तम मार्ग. याशिवाय खूप गरम पाण्याने केस धुणे टाळा.
5/5
दुतोंडी केसांची समस्या दूर करण्यासाठी तूप देखील वापरले जाऊ शकते. आपण शुद्ध तुपाने केसांची मालिश करू शकता. (टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)