AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL : मोहालीच्या मैदानात अश्विनचा जलवा, रिचर्ड हॅडलीचा रेकॉर्ड मोडित, कपिल देवचा विक्रम टप्प्यात

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन जेव्हा जेव्हा मैदानात उतरतो तेव्हा फलंदाजांना त्याच्यासमोर उभं राहणं सोपं नसतं. कसोटी क्रिकेटमध्ये गेल्या काही वर्षांत भारताचा सर्वात मोठा मॅचविनर म्हणून उदयास आलेल्या अश्विनने प्रत्येक सामन्यासह आपली आकडेवारी आणि रेकॉर्ड सुधारणे सुरूच ठेवले आहे.

अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Mar 05, 2022 | 8:14 PM
Share
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन जेव्हा जेव्हा मैदानात उतरतो तेव्हा फलंदाजांना त्याच्यासमोर उभं राहणं सोपं नसतं. कसोटी क्रिकेटमध्ये गेल्या काही वर्षांत भारताचा सर्वात मोठा मॅचविनर म्हणून उदयास आलेल्या अश्विनने प्रत्येक सामन्यासह आपली आकडेवारी आणि रेकॉर्ड सुधारणे सुरूच ठेवले आहे. आज मोहालीत श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी अश्विनने आणखी एक विक्रम आपल्या नावे केला.

1 / 5
भारताचा अनुभवी फिरकीपटू अश्विनने शनिवारी 5 मार्च रोजी श्रीलंकेच्या पहिल्या डावात 2 बळी घेतले. यामध्ये दुसरी विकेट धनंजया डी सिल्वाची होती, ज्याला अश्विनने पायचित केले. यासह अश्विनने न्यूझीलंडचा महान वेगवान गोलंदाज रिचर्ड हॅडलीला मागे टाकले. विशेष म्हणजे या कामगिरीसह अश्विन कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या आता 11 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. (Photo: AFP)

2 / 5
अश्विनचा हा 432 वा कसोटी बळी ठरला आणि त्यामुळे त्याने हॅडलीला (431) मागे टाकले. हॅडलीने 86 कसोटींमध्ये इतक्या विकेट्स घेतल्या होत्या आणि अश्विनने केवळ 85 कसोटींमध्ये ही कामगिरी केली आहे. (Photo: BCCI/ICC)

3 / 5
हॅडली हा 1993 पर्यंत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होता, ज्याचा विक्रम भारतीय अष्टपैलू खेळाडू कपिल देव यांनी मोडला होता. कपिल यांनी आपल्या कारकिर्दीत 434 विकेट घेत हा विक्रम आपल्या नावे केला. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम जवळपास 7 वर्षे कपिलच्या नावावर होता आणि आता अश्विनला या सामन्यात कपिलला मागे टाकण्याची संधी आहे. कपिलला मागे टाकण्यासाठी अश्विनला फक्त 3 विकेट्सची गरज आहे. (Photo: File/ICC)

4 / 5
अश्विनच्या दोन विकेट्सच्या जोरावर भारताने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंकेच्या पहिल्या डावात 4 गडी बाद केले, त्याबदल्यात पाहुण्यांना केवळ 104 धावा करता आल्या होत्या. अशा स्थितीत तिसऱ्या दिवशी अश्विन आणखी 3 विकेट घेत कपिल देवला मागे टाकू शकतो. (Photo: AFP)

5 / 5
Follow Us
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा
तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; MPSC विद्यार्थ्यांचं
MPSC Protest Pune : तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; तिरडी यात्रेतून MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात सरकारविरोधात जोरदार आंदोलन
इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video : इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; शिरूरच्या कार्यक्रमातील VIDEO सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय घडलं?
महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार
Mahayuti : महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; पुणे शिक्षक मतदारसंघात चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार?
महाराष्ट्रात १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात
Drought : महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गडद; १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात; सरकारचा मोठा निर्णय काय?