PHOTO | कोरोना विरुद्धच्या लढ्यात बुद्धीबळपटू विश्वनाथ आनंद मैदानात, जी साथियानही सरसावला

टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या सथियानने (G Sathiyan) गेल्या वर्षी केंद्र आणि राज्य सरकारला 1 लाख 25 हजार रुपयांची देणगी दिली होती.

1/5
Corona, Corona In India, Covid 19, Viswanathan Anand, Exhibition Match, G Sathiyan, Covid Relief Fund,
5 वेळा विश्वविजेते असलेले विश्वनाथन आनंद आणि इतर 4 ग्रँडमास्टर खेळाडूंनी कोरोना सहाय्यता निधी जमा करण्यासाठी भन्नाट आयडिया लढवली. त्यांनी गुरुवारी इतर खेळाडूंबरोबर ऑनलाईन बुद्धिबळ सामने खेळले. चेस.कॉम ब्लीटझ धारक किंवा 2 हजारांपेक्षा कमी फीड रेटिंग्ज असलेल्या खेळाडूंनी 11000 रुपये देणगी देत विश्वनाथ आनंद यांच्यासोबत चेस खेळण्याचा आनंद घेतला.
2/5
Corona, Corona In India, Covid 19, Viswanathan Anand, Exhibition Match, G Sathiyan, Covid Relief Fund,
या ऑनलाईन सामन्यांच्या माध्यामातून आनंद यांनी 37 लाखांची रक्कम जमा केली. या सर्व सामन्यांचे आयोजन Chess.com केलं होतं. याशिवाय ग्रँड मास्टर कोनेरू हम्पी, हरिका द्रोनावाली, निहाल सरीन आणि प्रगनंदा रमेशाबाबू या खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
3/5
Corona, Corona In India, Covid 19, Viswanathan Anand, Exhibition Match, G Sathiyan, Covid Relief Fund,
तसेच भारतीय टेबल टेनिसपटू जी साथियानने कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी आर्थिक मदत केली. साथियानने शुक्रवारी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 1 लाख रुपयांची मदत केली.
4/5
Corona, Corona In India, Covid 19, Viswanathan Anand, Exhibition Match, G Sathiyan, Covid Relief Fund,
"देशात जे काही होतंय त्यामुळे मन हेलावून गेलंय. अनेक जण अडचणीतून जात आहेत. दररोज कोणीतरी आपल्या जवळच्या व्यक्तिला गमावत आहे. ही एकमेकांना मदत करण्याची वेळ आहे. मी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीत लाख रुपयांची मदत करत आहे", असं ट्विट साथीयानने केलं.
5/5
Corona, Corona In India, Covid 19, Viswanathan Anand, Exhibition Match, G Sathiyan, Covid Relief Fund,
"कोरोना विरुद्धच्या या दुसऱ्या लाटेविरोधात आपण नक्कीच मात करु", असा विश्वास साथीयानने व्यक्त केला. दरम्यान साथीयानने गेल्या वर्षी केंद्र आणि राज्य सरकारला 1 लाख 25 हजार रुपयांची मदत केली होती.