‘प्यार का कोई धर्म नहीं होता…’ या भारतीय क्रिकेटपटूंनी झुगारली जातीधर्माची बंधनं!

कुण्या शायराने म्हटलंय 'प्यार का कोई धर्म नहीं होता...' ही ओळ तंतोतंत खरी करुन दाखवलीय भारताच्या काही क्रिकेटपटूंनी... वाचा कोणकोणत्या क्रिकेटपटूंनी जातीधर्माच्या सीमा ओलांडल्या... (India Cricketers inter Caste And inter Religion Marriage)

Jun 02, 2021 | 3:30 PM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Akshay Adhav

Jun 02, 2021 | 3:30 PM

मोहम्मद कैफ... भारतीय क्रिकेट जगतातला नंबर वन फिल्डर... त्याच्या अनेक कॅचेसमुळे भारताने अवघड वाटणाऱ्या मॅचेस जिंकल्या. नोएडाची पत्रकार असलेल्या पूजा यादवबरोबर त्याचे प्रेमाचे बंध जुळले. मोहम्मद कैफ मुस्लिम आहे तर पूजा हिंदू... 2011 मध्ये त्यांनी लग्न केलं.

1 / 7
झहीर खान.... भारताचा माजी गोलंदाज ज्याने जागतिक क्रिकेटवर तब्बल एक दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजवलं. त्याच्या जशी क्रिकेट कारकर्दीची चर्चा होते तशी त्याच्या पर्सनल लाईफची देखील सातत्याने चर्चा होत असते. झहीर खानची पत्नी सागरिका घाटगे एक गुणी अभिनेत्री आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील  घाटगे घराण्यात म्हणजेच मराठी कुटुंबात तिचा जन्म झाला. पुढे झहीर खानशी तिची मैत्री झाली. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. अनेक वर्ष ते दोघे एकमेकांना डेट करत होते. अखेर नोव्हेंबर 2017 मध्ये झहीर आणि सागरिका लग्नबंधनात अडकले. सागरिका हिंदू तर झहीर खान मुस्लिम आहे. परंतु प्रेमाच्या आड त्यांनी धर्म येऊ दिला नाही.

2 / 7
दिनेश कार्तिकच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल नेहमी चर्चा होत राहिलेली आहे. कारण त्याची पहिली बायको निकीताचं क्रिकेटपटू मुरली विजयबरोबर अफेयर होतं. मग त्यांचा घटस्फोट झाला. 2015 मध्ये दिनेश कार्तिकने स्क्वॅश प्लेअर दीपिका पल्लीकलबरोबर लग्न झालं. दिनेश हिंदू आहे तर दीपिका ख्रिश्चन आहे.

3 / 7
टीम इंडियाचे माजी कर्णधार मन्सूर अली खान यांचं बॉलिवूड अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्यावर प्रेम जडलं. पटौदी मुस्लिम तर शर्मिला टागोर हिंदू.... दोघांनी 196 मध्ये लग्न केलं.

4 / 7
टीम इंडियाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांचं पहिवं लग्न नौरीन हिच्याशी 1987 मध्ये झालं. परंतु 1996 मध्ये त्यांचा काही कारणांनी घटस्फोट झाला. त्याचवर्षी अझरुद्दीन यांनी बॉलिवूड अभिनेत्री संगीता बिजलानीबरोबर लग्नगाठ बांधली. अझरुद्दीन मुस्लिम तर संगिता हिंदू आहे.

5 / 7
अजित आगरकर... भारतीय गोलंदाजीचा एकेकाळचा हिरा... त्याने धर्माने शिया मुस्लिम असलेल्या फातिमाबरोबर लग्न केलं. 2007 मध्ये ते एकमेकांचे आयुष्यभरासाठी साथीदार झाले.

6 / 7
भारतीय संघाचा तडाखेबाज बॅट्समन युवराज सिंहने 2015 साली मूळची इंग्लंडची असलेली बॉलिवूड अभिनेत्री हेजल कीचसोबत लग्नगाठ बांधली. युवराज शिख आहे तर हेजल ख्रिश्चन आहे.

7 / 7

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें