भारतीय महिला क्रिकेटपटूची इंग्लंडमध्ये तुफान खेळी, 43 चेंडूत 17 चौकार लगावत नाबाद 92 धावा

नुकत्याच झालेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 सामन्यात संघात जागा न मिळालेल्या या खेळाडूने इंग्लंडमध्ये ही दमदार कामगिरी करुन दाखवली आहे.

1/5
भारतीय महिला फलंदाज जेमिमा रॉड्रिग्सने (Jemimah Rodrigues) इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या The Hundred या 100 बॉल टूर्नामेंटमध्ये काल (24 जुलै) धमाकेदार खेळी केली. नॉर्दन सुपरचार्जर्स संघाकडून खेळताना जेमिमाने केवळ 43 चेंडूत नाबाद 92 धावा ठोकल्या. तिने 17 चौकारांसह एक षटकारही ठोकला. तिच्या खेळीच्या जोरावरच तिच्या संघाने वेल्स फायर संघावर सहा विकेट्सने विजय मिळवला. वेल्स फायर संघाने 100 चेंडूत आठ विकेट्सच्या बदल्यात 131 धावा केल्या. तर सुपरचार्जर्सने 85 चेंडूत चार विकेट्स गमावत 131 धावांचे लक्ष्य पार करत विजय मिळवला.

2/5
रॉड्रिग्ससाठी ही खेळी खास ठरली कारण ज्यावेळी ती फलंदाजीला आली त्यावेळेस तिच्या सुपरचार्जर्स संघाचा स्कोर 18 चेंडूत चार बाद 19 इतकाच होता. रॉड्रिग्सने एकहाती सर्व सामना सांभाळत सामना जिंकवून दिला. यावेळी एलाइस डेविडसन रिचर्ड्स (नाबाद 23 रन) हिने जेमिमाला चांगली साथ दिली.

3/5
जेमिमा रॉड्रिग्स ही भारताकडून खेळताना दक्षिण आफ्रीकेविरुद्धच्या मालिकेत फार खराब फॉर्ममध्ये दिसून आली होती. त्यानंतर इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यात ती खास कामगिरी करु न शकल्याने तिला टी-20 संघातून बाहेर ठेवण्यात आलं होतं. पण आता या खेळीने तिने सर्वच टीकाकारांना एक कडक प्रतित्यूत्तर दिलं आहे.

4/5
इंग्लंडमध्ये जेमिमा हीचा टी-20 क्रिकेटमधील रेकॉर्ड अप्रतिम आहे. तिने 11 डावांत 158.52 च्या स्ट्राइक रेटने 70.42 च्या सरासरीने 493 धावा ठोकल्या आहेत. तिने इंग्लंडमध्ये टी-20 क्रिकेटमध्ये एका शतकासह तीन अर्धशतकं ठोकली आहेत.

5/5
जेमिमाने 2018 मध्ये भारतीय संघात पदार्पण केलं होतं. आतापर्यंत 21 एकदिवसीय सामन्यात 19.70 च्या सरासरीने 394 रन्स केले आहेत. ज्यात तीन अर्धशतकांचा समावेश आहे. जेमिमा भारताकडून 47 टी-20 सामने खेळली असून यात तिने 26.37 च्या सरासरीने 976 धावा ठोकल्या आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI