एका षटकात 35 धावा दिल्या, करिअर संकटात, 2 आठवड्यात कमबॅक, घातक गोलंदाजीने चेन्नईचा धुरळा उडवला

खेळ कोणताही असो, प्रत्येक संघ किंवा खेळाडूला चांगला आणि वाईट काळ पाहावा लागतो. विशेषत: आयपीएलसारख्या टूर्नामेंटमध्ये प्रत्येक खेळाडूला चढउतार पाहावे लागले आहेत. बरेच खेळाडू दोन-तीन सामन्यात वाईट प्रदर्शन केल्यानंतर किंवा संपूर्ण मोसमात वाईट प्रदर्शन केलं तरी मेहनत करुन कमबॅक करतात.

| Updated on: Apr 22, 2022 | 1:04 PM
खेळ कोणताही असो, प्रत्येक संघ किंवा खेळाडूला चांगला आणि वाईट काळ पाहावा लागतो. विशेषत: आयपीएलसारख्या टूर्नामेंटमध्ये प्रत्येक खेळाडूला चढउतार पाहावे लागले आहेत. बरेच खेळाडू दोन-तीन सामन्यात वाईट प्रदर्शन केल्यानंतर किंवा संपूर्ण मोसमात वाईट प्रदर्शन केलं तरी मेहनत करुन कमबॅक करतात. कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, उमेश यादव ही यंदाच्या आयपीएलमधील कमबॅक करणाऱ्या खेळाडूंची काही उदाहरणं आहेत. मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातील ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज डॅनियल सॅम्स यानेदेखील नुकतंच शानदार कमबॅक केलंय. सॅम्ससाठी यंदाच्या आयपीएल स्पर्धेची सुरुवात वाईट होती. मात्र दोन आठवड्यांच्या कालावधीत त्याने शानदार कमबॅक केलं. (Photo: BCCI)

1 / 4
चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात गुरुवारी, 21 एप्रिल रोजी खेळवण्यात आलेल्या सामन्यात मुंबईची अवस्था वाईट होती. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने केवळ 155 धावा केल्या होत्या. अशा परिस्थितीत मुंबईला विजय मिळवायचा असेल तर उत्कृष्ट गोलंदाजीची गरज होती आणि ती कामगिरी डावखुरा वेगवान गोलंदाज डॅनियल सॅम्सने केली, ज्याने प्रत्येक षटकात एक विकेट घेत मुंबईला सामन्यात जीवंत ठेवलं. (Photo: BCCI)

2 / 4
चेन्नईच्या डावाच्या पहिल्याच चेंडूवर सॅम्सने ऋतुराज गायकवाडची विकेट घेतली आणि त्यानंतर तिसऱ्याच षटकात मिचेल सँटनरला पॅव्हेलियनमध्ये धाडलं. त्यानंतर चेन्नईचा डाव मजबूत होताना दिसत असताना सॅम्सने 13 व्या षटकात शिवम दुबे आणि 15 व्या षटकात अंबाती रायुडूची विकेट घेतली. म्हणजेच त्याने चेन्नईचे सगळे मोठे फलंदाज बाद केले. सॅम्सने आपल्या 4 षटकात केवळ 30 धावा देत 4 बळी घेतले. (Photo: PTI)

3 / 4
या सामन्यातील प्लेईंग इनेव्हनमध्ये रोहित शर्माने सॅम्सच्या नावाची घोषणा केली तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. याचे कारण म्हणजे 15 दिवसांपूर्वी, म्हणजेच 6 एप्रिल रोजी, कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात सॅम्सची गोलंदाजी निष्प्रभ ठरली होती. कोलकात्याच्या फलंदाजांनी स‌ॅम्सची धुलाई केली होती. त्यामुळे त्याच्या पुन्हा आयपीएलमध्ये खेळण्याची आशा संपुष्टात आली होती. सॅम्सचाच सहकारी (ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू) पॅट कमिन्सने त्याच्या एका षटकात 4 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने 35 धावा ठोकून जिंकला होती. त्यानंतर सलग 3 सामने सॅम्सला बाहेर बसावे लागले. (Photo: BCCI)

4 / 4
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.