विजयी धावांचा पाठलाग करताना विराट कोहलीच चेज किंग, आकडेवारी एकदा वाचा
उपांत्य फेरीत टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 4 विकेट राखून धुव्वा उडवला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 264 धावा केल्या. हे आव्हान भारताने 48.1 षटकात पूर्ण केलं. या विजयात विराट कोहलीच्या 84 धावा महत्त्वाच्या ठरल्या. यासह विराट कोहलीने एक खास विक्रम रचला आहे.
विराट कोहलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. विराट कोहलीने धावांचा पाठलाग करताना 8000 धावांचा पल्ला गाठला आहे. उपांत्य फेरीत विराट कोहलीने साजेशी खेळी केली. दोन विकेट पडल्यानंतर टीम इंडिया संकटात असताना 98 चेंडूत 84 धावा केल्या.
1 / 5
विराट कोहलीचं अर्धशतक अवघ्या 16 धावांनी हुकलं. पण वनडे क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करताना 8 हजार धावांचा पल्ला गाठला आहे. यासह सचिन तेंडुलकरनंतर अशी कामगिरी करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने अशी कामगिरी केली आहे.
2 / 5
वनडे सामन्यात धावांचा पाठलाग करताना 232 डावात सचिन तेंडुलकरने 8720 धावा करून विक्रम रचला आहे. आता 8000 धावांचा पल्ला गाठत विराट कोहली या पंगतीत बसला आहे.
3 / 5
वनडे क्रिकेट इतिहासात 60हून अधिकच्या सरासरीने 8 हजाराहून अधिका धावा करणारा जगातील एकमेव फलंदाज आहे. सचिन तेंडुलकरने 8720 धावा केल्या असल्या तरी त्याने त्या 43.22 च्या सरासरीने केल्या आहेत.
4 / 5
विराट कोहलीने आता फक्त 159 डावांमध्ये 64.50 च्या सरासरीने एकूण 8063 धावा केल्या आहेत. विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 60 पेक्षा जास्त सरासरीने 8000 धावा करणारा जगातील एकमेव फलंदाज म्हणून विश्वविक्रम केला आहे.