टायटॅनिक या 'अनसिंकेबल' म्हणवल्या जाणाऱ्या जहाजासोबत नेमकं काय घडलं होतं? हे महाकाय जहाज नेमकं का बुडालं होतं? याचे नेमके उत्तर आजही शोधले जाते.
1 / 8
या अपघातात तब्बल 1500 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, टायटॅनिक जहाजाचे डिजिटल स्कॅन करण्यात आले होते. याच डिजिटल स्कॅनच्या मदतीने टायटॅनिक जहाजासोबतच्या अपघाताचे नवे रहस्य खुले झाले आहे.
2 / 8
या डिजिटल स्कॅननुसार अपघात झाल्यानंतर टायटॅनिकच्या इंजिनिअर्सने शेवटच्या क्षणापर्यंत जहाजातील इंजिनिअर्सने काम केले होते.
3 / 8
जहाजातील लाईट्स चालूच राहावेत म्हणून त्यांनी शेवटपर्यंत काम केलं होतं, हे डिजिटल स्कॅनमधून समोर आलं आहे.
4 / 8
टायटॅनिक जहाजाच्या अपघाताचा अभ्यास करण्यासाठी अटलांटिक समुद्रात 3800 मीटर खोल पाण्यात रोबोट्सच्या माध्यमातून अभ्यास करण्यात आला होता.
5 / 8
या मोहिमेत टायटॅनिक जहाजाचे तब्बल 7 लाख वेगवेगळे फोटो काढण्यात आले होते. याच फोटोंच्या मदतीने जहाजाचे 'डिजिटल ट्विन' तयार करण्यात आले होते.
6 / 8
त्यानंतर जहाजातील लाईट्स चालूच राहावेत आणि जास्तीत जास्त प्रवाशांना लाईफ जॅकेट्स आणि जिवनरक्षक प्रणाली मिळावी यासाठी जहाजातील इंजिनिअर्सने प्रयत्न केला होता.
7 / 8
टायटॅनिक जहाजाच्या हलला एखाद्या पेपरएवढे छित्र पडल्यामुळेच ते बुडाले. हीमनगाला धडक दिल्यामुळे हा अपघात झाला होता, असाही अंदाज या अभ्यासातून काढण्यात आला आहे.