Tokyo Paralympics मधील भारताचे 5 लढवय्ये, पदक हुकलं, पण खेळाने संपूर्ण देशवासीयाचं मन जिंकलं

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Updated on: Sep 05, 2021 | 5:59 PM

टोकिओ पॅरालिंपिक स्पर्धेत भारताने ऐतिहासिक कामगिरी करत एकूण 19 पदकं जिंकली. अवनी लेखरा आणि सिंहराज सिंह अधाना यांनी तर प्रत्येकी 2-2 पदकं जिंकली. यात काही खेळाडू तर असेही होते जे थोडक्यात पदकापासून दूर राहिले. यापैकीच 5 असे तारे ज्यांचं पदक थोडक्यात हुकलं, पण त्यांनी देशवासीयांची मनं जिंकली.

Sep 05, 2021 | 5:59 PM

1 / 6
भारताच्या सोनम राणाने टोकिओ पॅरालिंपिकमध्ये पुरुषांच्या शॉटपूट एफ57 इव्हेंटमध्ये चौथा क्रमांक पटकावला. 38 वर्षीय राणाने पहिल्या प्रयत्नातच 13.81 मीटरचा थ्रो केला. हीच त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी राहिली.

2 / 6
बॅडमिंटन पुरुष सिंगल्स एसएल-4 इव्हेंटमध्ये ब्राँझ पदकाच्या सामन्यात भारताच्या तरुण ढिल्लनला पराभवाचा सामना करावा लागला. तो पदकाच्या खूप जवळ आला, मात्र पदकाने त्याला थोडक्यात हुलकावणी दिली. त्याला इंडोनेशियाच्या फ्रेडी सेतियावानने 2-0 ने पराभूत केलं. फ्रेडीने हा सामना 21-17 आणि 21-11 असा जिंकला.

3 / 6
संदीप चौधरी (Sandeep Choudhary) पुरुषांच्या भालेफेकीत (जेवलिन थ्रो) F64 इव्हेंटमध्ये 62.20 मीटरच्या कामगारीसह चौथ्या क्रमांकावर होता. या स्पर्धेच्या अंतिम स्पर्धेतील सुवर्णपदक सुमित अंतिलने आपल्या नावावर केलं.

4 / 6
भारताचा तिरंदाज महावीर स्वरूप उनहालकर देखील पदकापासून थोडक्यात दूर राहिला. केवळ एका शॉटने त्याचं पदक हुकलं. पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल स्टँडिंग एसएच1 स्पर्धेत तो चौथ्या क्रमांकावर होता. त्याने एकूण 203.9 गुण मिळवले. कोल्हापूरचा हा 34 वर्षीय तिरंदाज सुरुवातील पुढे होता, पण नंतर तो सहाव्या फेरीत मागे पडला.

5 / 6
भालेफेकपटू (जेवलिन थ्रोअर) नवदीप टोकिओ पॅरालिंपिकमध्ये चौथ्या क्रमाकांवर राहिला. नवदीपचं F-41 कॅटेगरीत ब्राँझ पदक केवळ 0.59 मीटरने हुकलं. ही त्याची पहिलीच पॅरालिंपिक होती.

6 / 6

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI