Top 5 Marathi Serial | प्रेक्षकांना भावतेय जयदीप-गौरीची प्रेमकथा, ‘सुख म्हणजे…’सह ‘या’ मालिका ठरल्या अव्वल!

माहिती स्त्रोत : https://www.barcindia.co.in/data-insights#currencydata (महाराष्ट्र-गोवा - ग्रामीण आणि शहरी) आठवडा – 21

1/6
या आठवड्यातील (TRP Week 21) टीआरपी शर्यतीच्या यादीत स्टार प्रवाहच्या मालिकांचं वर्चस्व पहायला मिळालं आहे.
2/6
जयदीप आणि गौरीची ही गोड प्रेमकथा प्रेक्षकांना खूप भावली आहे. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका प्रथम क्रमांकावर आहे.
3/6
‘रंग माझा वेगळा’ ही मालिका सध्या एका मोठ्या निर्णायक वळणावर आली आहे. ही मालिका टीआरपी यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
4/6
नवऱ्याच्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी कीर्ती जीवचं रान करतेय. ‘फुलाला सुगंध मातीचा’ ही मालिका टीआरपी यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
5/6
स्वराजची दृष्टी पुन्हा आल्यानंतर आतातरी वैभवी त्याच्या समोर सत्य आणू शकेल का, या ट्रॅकवर असलेली ‘सांग तू आहे का?’ ही मालिका चौथ्या क्रमांकावर आहे.
6/6
एका सामान्य मुलीचा शिक्षणाचा आणि डॉक्टर होण्याच्या स्वप्नाचा प्रवास दाखवणारी ‘स्वाभिमान’ ही मालिका टीआरपी शर्यतीत पाचव्या क्रमांकावर आहे.