‘उदे गं अंबे..’ मालिकेत महादेवांचं वीरभद्र रुप; देवदत्त नागेनं सांगितला अनुभव

'उदे गं अंबे...कथा साडेतीन शक्तिपीठांची' ही मालिका संध्याकाळी 6.30 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते. यामध्ये देवदत्त नागे आणि मयुरी कापडणे यांच्या मुख्य भूमिका आहेत. या मालिकेनं अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली आहे.

| Updated on: Oct 17, 2024 | 3:22 PM
'स्टार प्रवाह' वाहिनीवर दुर्गाष्टमीच्या शुभमुहूर्तावर सुरु झालेल्या ‘उदे गं अंबे...कथा साडेतीन शक्तिपीठांची’ मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. महाराष्ट्राची श्रद्धास्थानं असलेल्या साडेतीन शक्तीपिठांची अभुतपूर्व गोष्ट या मालिकेत भव्यदिव्य स्वरुपात पहायला मिळतेय.

1 / 5
शक्तीरुप असलेल्या देवी सती आणि शिवशंकराच्या कथेपासून या मालिकेची सुरुवात झाली आहे. महादेव आणि सती यांचा विवाहसोहळा नुकताच प्रेक्षकांनी अनुभवला. मालिकेच्या यापुढील भागात शिवशंकरांचा वीरभद्र अवतार पाहायला मिळणार आहे.

2 / 5
सतीचे पिता अर्थात दक्षराजांनी यज्ञासाठी सर्व देवतांना आमंत्रित केलं. मात्र महादेवांना आमंत्रित केलं नाही. महादेवांचा अपमान सहन न झाल्यामुळे देवी सतीने अग्नीकुंडात उडी घेऊन देहत्याग केला. भगवान शिवशंकरांना हे कळताच ते क्रोधीत झाले आणि त्यांनी वीरभद्र अवतार धारण केला.

3 / 5
दक्षराजाचा यज्ञ सफल होऊ न देण्यासाठी शिवशंकरांनी वीरभद्र अवतार धारण केल्याची माहिती पुराणात आढळते. वीरभद्राचं हे रौद्ररुप सृष्टीचा विनाश करत होतं. सृष्टीचा विनाश कसा रोखला गेला आणि साडे तीन शक्तिपीठांची निर्मिती कशी झाली? याची उत्कंठावर्धक गोष्ट 'उदे गं अंबे' मालिकेच्या यापुढील भागांमधून उलगडणार आहे.

4 / 5
वीरभद्र या अवताराविषयी सांगताना अभिनेता देवदत्त नागे म्हणाला, "वीरभद्र हे महादेवांचं रुप आहे. अभिनेता म्हणून हे रुप साकारणं माझ्यासाठी अतिशय आव्हानात्मक होतं. महादेवांपुढे नतमस्तक होऊन मी हे रुप साकारलं. वीरभद्राचं अक्राळविक्राळ रुप साकारण्यासाठी दोन अडीच तास मेकअपसाठी लागत होते. नखशिखांत नीळ्या रंगात मी दोन दिवस वावरत होतो. बरेच ॲक्शन सीन्स असल्यामुळे पोटतिडकीने मोठ्या आवाजात संवाद बोलावे लागत होते. महादेवांनीच माझ्याकडून हे करवून घेतलं असं मी म्हणेन."

5 / 5
Follow us
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.