Photo : ‘हा’ ग्रह ठरतो सौरमंडळाचा ‘व्हॅक्यूम क्लीनर’, जाणून घ्या ‘गुरु’किल्ली

या विश्वात अनेक सौर मंडळ आहेत आणि प्रत्येक सौर मंडळात अनेक ग्रह आहेत. जर आपण आपल्या सौर मंडळामध्ये बघितलं तर त्यात अधिकृतपणे आठ ग्रह आहेत. ('vacuum cleaner' of the solar system, know about the 'Jupiter' )

  • Publish Date - 10:47 am, Sat, 27 March 21
1/5
jupiter
या विश्वात अनेक सौर मंडळ आहेत आणि प्रत्येक सौर मंडळात अनेक ग्रह आहेत. जर आपण आपल्या सौर मंडळामध्ये बघितलं तर त्यात अधिकृतपणे आठ ग्रह आहेत.
2/5
jupiter
सौर मंडळातील प्रत्येक ग्रहाचं स्वतःचं वैशिष्ट्य आहे. या फोटो गॅलरीमध्ये आज आम्ही तुम्हाला बृहस्पती (Jupiter) या ग्रहाबद्दल माहिती देणार आहोत. या ग्रहाला गुरु म्हणूनही ओळखलं जातं आणि इंग्रजीमध्ये त्याला ‘ज्युपिटर’ असं म्हणतात. आपल्या सौर मंडळाचा हा सर्वात मोठा ग्रह मानला जातो.
3/5
या ग्रहावरील 'द ग्रेट रेड स्पॉट' ही सर्वात मनोरंजक आणि रहस्यमय गोष्ट आहे. शास्त्रज्ञांच्या मते शेकडो वर्षांपासून या ग्रहावर सतत एक वादळ येत आहे. मात्र हे वादळ कसं आणि का सुरू आहे, याचं उत्तर शास्त्रज्ञांकडे नाहीये.
4/5
jupiter
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की बृहस्पति ग्रहावर कोणताही पृष्ठभाग नाहीये. या ग्रहाविषयी, वैज्ञानिकांनी असा दावा केला आहे की तो मुख्यतः हायड्रोजननं बनलेला आहे आणि नेहमी अमोनिया क्रिस्टल्सच्या ढगांनी आणि संभवतः अमोनियम हायड्रोसल्फाइडने व्यापलेला असतो. ज्यामुळे या ग्रहावर जीवनाची शक्यता नाही.
5/5
jupiter
बृहस्पतिला सौर मंडळाचा 'व्हॅक्यूम क्लीनर' देखील म्हणतात, कारण त्याच्याकडे स्वतःची एक गुरुत्वीय शक्ती आहे. ज्यामुळे तो सौर यंत्रणेत येणाऱ्या बाह्य उल्कापिंडांना बाहेर काढतो. असे म्हणतात की जर हा ग्रह तेथे नसता तर कदाचित ते उल्कापिंड पृथ्वीवर किंवा इतर ग्रहांना टकरावले असते आणि पृथ्वीवर नेहमी उल्का पडले असते.