आपल्या दैनंदिन जीवनातील सवयींचा आपल्या आरोग्यावर आणि नशिबावर परिणाम होत असतो. वास्तुशास्त्रानुसार, जेवताना योग्य दिशेला बसणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. जर तुम्ही चुकीच्या दिशेने बसून जेवलात, तर याचे परिणाम तुमच्या आरोग्यासोबतच समृद्धी आणि नशिबावर होऊ शकतो.
1 / 6
त्यामुळे, वास्तुशास्त्रानुसार कोणत्या दिशेला जेवणे चांगले आहे आणि कोणत्या दिशेला जेवणे टाळावे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. तसेच जेवणासाठी कोणत्या दिशा शुभ आहेत आणि कोणत्या अशुभ आहेत, हे आपण जाणून घेऊया.
2 / 6
वास्तुशास्त्रानुसार, जेवणासाठी पूर्व दिशा सर्वात शुभ मानली जाते. या दिशेला तोंड करून जेवल्यास शरीर निरोगी राहते. तसेच मन शांत होते. पूर्वेकडे तोंड करुन जेवण केल्याने पचनक्रिया सुधारते. यामुळे शरीरातील उर्जेचा प्रवाह संतुलित राहण्यास मदत होते.
3 / 6
त्यासोबतच उत्तर दिशेला तोंड करून जेवण करणे देखील शुभ मानले जाते. या दिशेला तोंड करुन जेवल्याने आरोग्य सुधारते. तसेच मन स्वच्छ होते. ही दिशा संपत्ती आणि शिक्षणाशी संबंधित प्रगतीसाठी फायदेशीर मानली जाते, ज्यामुळे जीवनात सकारात्मक ऊर्जा येते.
4 / 6
वास्तुशास्त्रानुसार, दक्षिण दिशेला तोंड करून अजिबात जेऊ नये. या दिशेला तोंड करुन जेवण करणे अत्यंत अशुभ मानले जाते. ही दिशा यमराज आणि मृत्यूशी संबंधित असल्यामुळे या दिशेने जेवल्याने जीवनात अडचणी, अडथळे आणि नकारात्मक ऊर्जा वाढू शकते.
5 / 6
तसेच, याचा तुमच्या आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे जेवताना शक्यतो दक्षिण दिशा टाळावी, असा सल्ला वास्तुशास्त्र देते. वास्तुशास्त्रातील या नियमांमुळे जीवनात सकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढतो. तसेच आरोग्य, समृद्धी व यश मिळवण्यास मदत होते. अशी लोकांची श्रद्धा आहे.