AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo: जेव्हा विलासराव गोपीनाथरावांसोबतही ‘शेजारधर्म’ पाळायचे!

राजबिंडं व्यक्तिमत्त्व, सात मजली हास्य, नर्मविनोदी शैलीतून भल्याभल्यांची टोपी उडवणारा वक्ता आणि लोकप्रिय नेता... अशी ओळख असलेल्या विलासराव देशमुखांना संसदीय राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव होता. (Vilasrao Deshmukh birth anniversary: Everything you need to know leader)

| Edited By: | Updated on: May 26, 2021 | 11:27 AM
Share
सुसंस्कृत राजकारणी, दिलखुलास व्यक्तिमत्त्व आणि अजातशत्रू म्हणून ओळख असलेले माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ काँग्रेस नेते विलासराव देशमुखांची आज जयंती.

1 / 9
राजबिंडं व्यक्तिमत्त्व, सात मजली हास्य, नर्मविनोदी शैलीतून भल्याभल्यांची टोपी उडवणारा वक्ता आणि लोकप्रिय नेता... अशी ओळख असलेल्या विलासराव देशमुखांना संसदीय राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव होता.

2 / 9
लातूरच्या बाभूळगावच्या सरपंचपदापासून त्यांच्या राजकारणाची सुरुवात झाली. सरपंच ते मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री ते केंद्रीय मंत्री असा त्यांचा प्रवास नुसताच थक्क करणारा नव्हता तर प्रेरणादायी होता.

3 / 9
बाभूळगावचे सरपंच, उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे सदस्य, लातूर पंचायत समितीचे उपसभापती, उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँके आणि महाराष्ट्र राज्य सहाकरी बँकेचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिलं. 1980मध्ये पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. सांस्कृतिक मंत्री, महसूल मंत्री म्हणून काम पाहतानाच राज्याचे मुख्यमंत्रीपदही त्यांनी भूषवलं.

4 / 9
विलासरावांना जनसामान्यांची नाळ चांगली माहीत होती. त्यामुळेच ते लोकमानसावर आपला प्रभाव पाडू शकले. एखाद्या व्यक्तीला पाहून त्याच्या मनात काय चालले असेल याचा अंदाज घेण्याची त्यांची हातोटी वाखणण्यासारखी होती.

5 / 9
विलासरावांचं व्यक्तिमत्त्व राजकारण्यांपलिकडचं होतं. ते यारों के यार होते. त्यांची अनेक नेत्यांसोबतची मैत्री नेहमीच चर्चेचा विषय राहिली. ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि विलासरावांना तर 'दो हंस को जोडा' म्हटलं जायचं.

6 / 9
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यासोबतच्या त्यांच्या मैत्रीचे किस्से विशेष लोकप्रिय आहेत. त्यांचा असाच एक किस्सा नेहमी सांगितला जातो. मुंडेंचा मतदारसंघ रेणापूर. तर विलासरावांचा लातूर. दोन्ही तालुके एकमेकांच्या शेजारचे. दोघेही या मतदारसंघातून पहिल्यांदाच 1980मध्ये विधानसभेवर निवडून गेले. विलासराव काँग्रेसी, तर मुंडे भाजपवाले. मात्र, दोघांच्या मैत्रीत पक्ष कधीच आडवा आला नाही. दोघेही एकमेकांना निवडून येण्यात नेहमीच मदत करत.

7 / 9
या 'शेजारधर्मा'बाबत विलासराव अनेकदा जाहीरपणे मिश्किल भाष्यही करत. 'आमचे मतदारसंघ एकमेकांना लागून आहेत, त्यामुळे दोघेही निवडून यायचो, शेजारधर्म काय असतो याचा अनुभव मुंडे घेत आलेले आहेत आणि आता तर आम्ही एका इमारतीतही शेजारी आहोत,' असं देशमुख म्हणायचे. तेव्हा संपूर्ण सभागृह खळखळून हसत विलासरावांना मनमुराद दाद द्यायचा.

8 / 9
विलासरावांनी पद, प्रतिष्ठा, पैसा कमावला. त्यांनी कार्यकर्त्यांचं जाळं निर्माण केलं. मित्रांचा गोतावळा निर्माण केला. पण यातही त्यांची खरी संपत्ती ही त्यांची मुलं आहेत. त्यांची तिन्ही मुलं त्यांच्यावर जीव ओवाळून टाकतात. अभिनेता रितेश देशमुख तर विलासरावांबाबत प्रचंड सेंटिमेंट आहे. त्याचे विलासरावांवरील ट्विट काळीज हेलावून टाकतात. आजही रितेशने एक ट्विट केलं आहे. 'प्रिय देवा, कृपया काळाचं चक्र पुन्हा मागे घे. मिस यू पप्पा, हॅपी बर्थडे', असं रितेशने म्हटलं आहे.

9 / 9
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.