IPL 2021 : हे 5 खेळाडू RCB चं नशीब पलटवू शकतात, संपवू शकतात जेतेपदाचा दुष्काळ!

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Banglore) संघात एकापेक्षा एक सरस खेळाडू असूनही अजूनपर्यंत बंगळुरुला आयपीएलचा (IPL 2021) करंडक जिंकता आला नाही. यंदा विराटच्या (Virat kohli) नेतृत्वाखालील संघ आयपीएल जेतेपदाचा करंडक उंचावून जेतेपदाचा दुष्काळ मिटवू शकतात. IPL 2021 Royal Challengers Banglore

1/5
Virat kohli
विराट कोहली हा आरसीबीचा संघाचा सर्वात मोठा मॅच विनर खेळाडू आहे. 2008 पासून विराट आरसीबी या संघाकडून खेळतोय, पण 3 वेळा अंतिम फेरी गाठल्यानंतरही आरसीबीला एकदाही आयपीएलचे जेतेपदही मिळवता आले नाही. यावर्षी विराट पुन्हा एकदा आपल्या संघाला आयपीएलचा विजेता करण्यासाठी प्रयत्न करेल. कोहलीने 192 आयपीएल सामन्यांमध्ये 5878 धावा केल्या आहेत.
2/5
Glenn Maxwel
यंदाच्याच वर्षी आरसीबीने ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज ग्लेन मॅक्सवेल याला 14.25 कोटी रुपये देऊन खरेदी केलं आहे. आयपीएलमध्ये सध्या मॅक्सवेल खास प्रदर्शन करताना दिसून येत नाहीय. पण तो काय करु शकतो, हे मात्र क्रिकेट विश्वाला माहिती आहे.
3/5
ab de villiers RCB
ए बी डिव्हिलियर्स हा आरसीबीसाठी हुकमी एक्का आहे. पाठीमागचे काही सिझन एबीने आरसीबीसाठी खेळले आहेत. अनेक यादगार परफॉर्मन्सने एबीने आरसीबीला मॅचेस जिंकवून दिल्या आहेत. यंदाही अशाच मॅचविनिंग खेळीची डिव्हिलियर्सकडून आरसीबीला अपेक्षा असेल.
4/5
yuzvendra Chahal RCB
युजवेंद्र चहल. आरसीबीचा विकेट टेकर बोलर. समोरच्या संघातील बॅट्समन सेट झाला की कोहली चहलला बोलिंगसाठी निमंत्रण देतो आणि चहलही विराटची इच्छा पूर्ण करुन संघाला जिंकवण्यासाठी मोलाचं योगदान देतो. यंदाच्या आयपीएल मोसमात चहलकडून शानदार प्रदर्शनाची अपेक्षा असेल.
5/5
kyle jamieson
न्यूझीलंडचा जलदगती गोलंदाज काइल जैमिसनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फार थोड्या काळात आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला आहे. यंदाच्या सिझनमधल्या त्याच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष असेल.