Marathi News » Photo gallery » Want to keep sugar levels under control ?; Then include 'these' vegetables in your diet
शुगर लेव्हल ठेवायचीये नियंत्रणात?; तर मग ‘या’ भाज्यांचा आहारात करा समावेश
ज्या व्यक्तींना मधुमेहाचा त्रास आहे, अशा व्यक्तींनी आहारात पिष्टमय पदार्थांचा समावेश टाळावा असा सल्ला तज्ज्ञ देतात. अशा पदार्थांमुळे शरीरातील शुगर लेव्हल अनियंत्रीत होते. त्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. आज आपण अशा काही भाज्यांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यामध्ये पिष्टमय पदार्थांचा समावे नाही, या भाज्यांचा तुम्ही आहारामध्ये नियमित समावेश केल्यास शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यासा मदत होऊ शकेल.
गाजर : हिवाळ्यात सहज उपलब्ध होणारे गाजर मधुमेहाच्या रुग्णांसाठी चांगले मानले जाते. या रुग्णांनी गाजर शिजवण्याऐवजी कच्चे खावे, असे डॉक्टरांचे मत आहे. उच्च फायबर सामग्रीमुळे, ते रक्तातील साखर हळूहळू सोडते.
1 / 5
2 / 5
वांगी : ही देखील पिष्टमय नसलेली भाजी आहे आणि या भाजीचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात कोलेस्टेरॉल नसते. ही भाजी मधुमेहाच्या रुग्णांसाठी रामबाण औषध आहे. ही भाजी शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करते.
3 / 5
भेंडी : भेंडीमध्ये फायबरचे प्रमाण सर्वाधिक असते. फायबरमुळे तुम्ही खाल्लेले अन्न पचण्यास मदत होते. तसेच शरीरातील साखरेची पातळी नियंत्रीत ठेवण्यासाठी देखील भेंडीचा उपयोग होतो. भेंडीमध्ये असे काही घटक असतात की, ते आपल्या शरीरात नैसर्गीकरित्या इन्सुलिन वाढवतात. त्यामुळे तुम्ही मधुमेहापासून दूर राहू शकता.
4 / 5
काकडी : काकडीमध्ये देखील मोठ्याप्रमाणात फायबर असते, तसेच काकडीमुळे शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढता येते. काकडीमुळे साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. मधुमेहाचा आजार असणाऱ्या रुग्णांना डॉक्टर काकडी खाण्याचा सल्ला देतात.