Photo : वेडिंग बेल्स; सना खानच्या मेहंदीची झलक

सना खाननं आता तिच्या मेहंदीचे काही फोटो सोशल मीडियावर अकाऊंटवर शेअर केले आहेत.(Wedding Bells; Glimpses of Sana Khan’s Mehndi)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 17:43 PM, 25 Nov 2020
गेली अनेक दिवस अभिनेत्री सना खान चर्चेत आहे. अभिनय क्षेत्रापासून अचानक संन्यास घेऊन तिने सगळ्यांना चकित केलं. आता हिच सना खान तिच्या लग्नामुळे चर्चेत आली आहे.
20 नोव्हेंबरला तिनं लग्न केलंय. तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे. आता तिनंसुद्धा या कार्यक्रमांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यास सुरुवात केली आहे.
तिनं आता मेहंदीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिनं केशरी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.
या फोटोमध्ये ती प्रचंड खूश दिसतं आहे. या कार्यक्रमासाठी तिचं घरसुद्धा सुंदर पद्धतीनं सजवण्यात आलं आहे.
तिचा हा लूक तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.