सायबर फ्रॉड टाळण्यासाठी +77, +89, +85, +86, +84 या कोडवरुन जर कॉल आले तर सावध राहावे, असा सल्लाही अनेकदा दूरसंचार विभागाकडून दिला जातो. याद्वारे भारतीयांची फसवणूक होण्याची शक्यता असते.
2 / 8
पण तुम्ही कधी एक गोष्ट लक्षपूर्वक पाहिलीत का? भारतीय मोबाईल क्रमांक हे बहुतांश वेळा +91 या कोडने सुरु होतात. यामागे एक विशिष्ट कारण असते.
3 / 8
4 / 8
आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाकडून जगातील प्रत्येक देशाला काही कोड देण्यात आले आहे. इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियनने जगाची 9 झोनमध्ये विभागणी केली आहे.
5 / 8
यानुसार दक्षिण, मध्य, पश्चिम आणि मध्य पूर्व आशिया 9 व्या प्रदेशात मोडतात. या नवव्या झोनमधील सर्व देशांमधील सर्व कॉलिंग कोड हे +9 पासून सुरु होतात.
6 / 8
या नवव्या झोननुसार भारताला पहिला क्रमांक देण्यात आला. त्यामुळे +9 च्या पुढे 1 असा आकडा म्हणजेच +91 असा कोड लावण्यात आला. यानंतर पाकिस्तानचे +92 आणि अफगाणिस्तानचे +93 असे कोड येतात.
7 / 8
आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ कोणत्याही देशाला हा कोड जारी करण्यापूर्वी देशाची लोकसंख्या, संघ आणि इतर अनेक घटक पाहते. त्यानंतरच हे कोड दिले जातात.