Maharashtra Assembly Monsoon Session Live : अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 25 हजार 826 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर

Maharashtra Assembly Monsoon Session Live Updates आज पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. नेहमीप्रमाणे यंदा देखील अधिवेशनात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता आहे.

Maharashtra Assembly Monsoon Session Live : अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 25 हजार 826 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर

| Edited By: महेश घोलप, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Aug 17, 2022 | 4:46 PM

आज पावसाळी अधिवेशनाचा (Maharashtra Assembly Monsoon Session) पहिला दिवस आहे. नेहमीप्रमाणे यंदा देखील अधिवेशनात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता आहे. राज्यात नवे सरकार येऊन जवळपास दीड महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटला आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर देखील मंत्रिमंडळाचा विस्तार व्हायला अनेक दिवस लागले. त्यामुळे अनेक कामे प्रलंबित राहिल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. या मुद्द्यावरून तसेच राज्यात सध्या पावसामुळे पूर परिस्थिती गंभीर बनली आहे. पुरामुळे हजारो हेक्टर जमीन पण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. विरोधकांनी ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली आहे. आज हा मुद्दा देखील सभागृहात तापण्याची शक्यता आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 17 Aug 2022 03:58 PM (IST)

  टाकली परिसरात घडले बिबट्याचे दर्शन

  – टाकली परिसरात घडले बिबट्याचे दर्शन.

  – वन विभाग सतर्क.

  – अधिकार्‍यांना या परिसरात बिबट्याचे पग मार्क आढळले असून हा बिबटय़ा 13 ती 15 महिन्याचा असण्याची माहिती देण्यात आली.

  – बिबट्या दिसल्याने नागरिकां मध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 • 17 Aug 2022 03:58 PM (IST)

  गोपाळकाला गुण्यागोविंदाने व उत्साहात साजरा करा

  गोपाळकाला गुण्यागोविंदाने व उत्साहात साजरा करा; मात्र नियमांचे भान राखा, पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांचे नागरिकांना आवाहन

  Anchor : श्रीकृष्ण जन्माष्टमी, दहीहंडी उत्सव यासह आगामी सर्व सण उत्सव गुण्यागोविंदाने व इत्साहात साजरा करा. मात्र या दरम्यान न्यायालयाने, शासनाने व पोलीस प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करा. सण साजरे करताना इतरांना त्रास होणार नाही तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची नागरिकांनी दक्षता घ्यावी. असे आवाहन परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी केले. ते दहीहंडी मंडळे, पोलीस पाटील, डीजे वादक व नागरिकांच्या उपस्थितीत आयोजित केलेल्या बैठकीदरम्यान बोलत होते.

 • 17 Aug 2022 03:08 PM (IST)

  राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील याना एस टी बस चालवणे पडणार महागात

  सांगली - राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील याना एस टी बस चालवणे पडणार महागात,,, बेकायदेशीरपणे एस टी बस चालवल्याप्रकरणी जयंत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करावा या बाबत भाजपाने दिली तक्रार

  अँकर - सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे तहसील कार्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी ध्वजारोहण करण्यासाठी आलेले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांनी इस्लामपूर आगाराची चक्क एस टी बस चालवली. यावेळी उपस्थित सगळेच अचंबित झाले. यावेळी सर्व प्रवाशांनी एस टी बस मध्ये बसून याचा आनंद घेतला.

  मात्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील याना एस टी बस चालवणे महागात पडणार आहे कारण बेकायदेशीरपणे एस टी बस चालवल्याप्रकरणी आमदार जयंत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करावा या बाबत भाजपाच्या नेत्यांनी इस्लामपूर पोलिसात तक्रार दिली आहे. एसटी चालवण्याचा कोणताही अनुभव नसताना, किंवा जड वाहन चालक म्हणून आवश्यक असणाऱ्या परवाना किंवा, बॅच बिल्ला नसताना जड वाहन बेकायदेशीरित्या जयंत पाटील यांनी चालवलं असा आरोप भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

 • 17 Aug 2022 02:45 PM (IST)

  राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील याना एस टी बस चालवणे पडणार महागात

  राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील याना एस टी बस चालवणे पडणार महागात,,, बेकायदेशीरपणे एस टी बस चालवल्याप्रकरणी जयंत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करावा या बाबत भाजपाने दिली तक्रार

 • 17 Aug 2022 02:27 PM (IST)

  देशातील सर्वात मोठा पक्ष अशी ओळख असलेल्या भाजप पक्षाने आज 2 समित्यांची फेरनिवड केली आहे

  देशातील सर्वात मोठा पक्ष अशी ओळख असलेल्या भाजप पक्षाने आज 2 समित्यांची फेरनिवड केली आहे

  केंद्रीय सांसदीय समितीची आज घोषणा झाली असून यामध्ये जेपि नड्डा हे या समितीचे अध्यक्ष असणार आहेत तर पंतप्रधान मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह, राजनाथ सिंह, बीएस एडीयुरप्पा, सुधा यादव , बीएल संतोष यांच्यासह प्रमुख नेत्यांचा समावेश आहे

  तर भाजप कडून केंद्रीय निवडणूक समितीचीही आज घोषणा झाली असून, जेपि नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली समितीत मोदी, शाह, राजनाथ, एडीयुरप्पा यांच्यासह, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांचा समावेश आहे, ही समिती 15 जणांची आहे

 • 17 Aug 2022 01:42 PM (IST)

  अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 25 हजार 826 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर

  आज अधिवेशनाचा पहिला दिवस

  अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मंत्र्यांकडून पुरवणी मागण्या सादर

  विधानसभेत 25 हजार 826 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर

  विभागवार मोठ्या निधीची मागणी

 • 17 Aug 2022 01:16 PM (IST)

  राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे लाईव्ह  

  राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे लाईव्ह

 • 17 Aug 2022 12:44 PM (IST)

  विरोधक आक्रमक होतील म्हणून सरकार घाबरलं; कंबोज यांच्या ट्विटवरून शशिकांत शिंदेंचा भाजपाला टोला

  विरोधक आक्रमक होतील म्हणून सरकार घाबरलं

  कंबोज यांच्या ट्विटवरून शशिकांत शिंदेंचा भाजपाला टोला

  विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न - शिंदे

  विरोधकांनी बोलूच नाही ही सरकारची भूमिका - शिंदे

 • 17 Aug 2022 12:22 PM (IST)

  Maharashtra Assembly Monsoon Session Live : ब्लॅकमेलिंग हा भाजपचा नवा धंदा, नाना पटोलेंचा घणाघात

  ब्लॅकमेलिंग हा भाजपचा नवा धंदा

  नाना पटोलेंचा घणाघात

  भाजपाकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग - पटोले

  नाना पटोले यांची भाजपावर घणाघाती टीका - पटोले

  पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधक आक्रमक - पटोले

 • 17 Aug 2022 12:15 PM (IST)

  Assembly Monsoon Session Live: देवेंद्र फडणवीस लाईव्ह

 • 17 Aug 2022 12:12 PM (IST)

  Monsoon Session Live : शिवसेना लवकरच कमबॅक करणार - आदित्य ठाकरे

 • 17 Aug 2022 12:03 PM (IST)

  Monsoon Session Live : खरा मुख्यमंत्री कोण समोर आलं, आदित्य ठाकरेंचा शिंदेंना टोला

  खरा मुख्यमंत्री कोण हे जनतेला दिसून आलंय - आदित्य ठाकरे

  शिंदे गटातील मंत्र्यांना कमी दर्जाची खाती- आदित्य ठाकरे

  सरकार लवकरच कोसळणार - आदित्य ठाकरे

  विधान भवन परिसरातून आदित्य ठाकरेंचा संवाद

 • 17 Aug 2022 11:53 AM (IST)

  Maharashtra Assembly Monsoon Session : कोणी काय बोलावं हा ज्याचा त्याचा अधिकार, फोनवरच्या वक्तव्यावरून मुंडेंचा मुनगंटीवारांना टोला

  कोणी काय बोलावं हा ज्याचा त्याचा अधिकार

  फोनवरच्या वक्तव्यावरून मुंडेंचा मुनगंटीवारांना टोला

  कोणी कंस वागावं, बोलावं, खावं याचं स्वातंत्र्य संविधानाने आम्हाला दिलं - मुंडे

 • 17 Aug 2022 11:37 AM (IST)

  Maharashtra Assembly Monsoon Session Live : शिंदे -फडणवीसांना जनतेचा आवाज ऐकू जात नाही, आदित्य ठाकरेंचा घणाघात

  विधानभवन परिसरातून आदित्य ठाकरे लाईव्ह

  शिंदे -फडणवीसांना जनतेचा आवाज ऐकू जात नाही - आदित्य ठाकरे

  गद्दार सरकार कोसळणारच - आदित्य ठाकरे

  आम्ही घटनेचे सेवक आदित्य ठाकरे

  शिंदे गटाचं घटनेविरोधी काम - आदित्य ठाकरे

  गद्दार सरकारविरोधात आमचं आंदोलन - आदित्य ठाकरे

 • 17 Aug 2022 11:28 AM (IST)

  राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांच्यामुळे स्त्री शिक्षण, स्त्री हक्काला बळ मिळेल - अजित पवार

  विधानसभेत राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींच्या अभिनंदनाचा प्रस्ताव

  मुर्मूंमुळे स्त्री शिक्षण, स्त्री हक्काला बळ मिळेल - अजित पवार

  राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांचं कर्तृत्व महान - अजित पवार

  राष्ट्रपतींची नाळ मातीशी जोडलेली - मुख्यमंत्री

 • 17 Aug 2022 11:20 AM (IST)

  Maharashtra Monsoon Session Live : विधानसभेचे पावसाळी अधिवेशन लाईव्ह

 • 17 Aug 2022 11:12 AM (IST)

  Maharashtra Monsoon Session Live : विधानसभेत राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींच्या अभिनंदनाचा प्रस्ताव

  विधानसभेत राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींच्या अभिनंदनाचा प्रस्ताव

  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मांडला अभिनंदन प्रस्ताव

  राष्ट्रपती द्रौपती मुर्मूना परिस्थितीची जाणीव - मुख्यमंत्री

 • 17 Aug 2022 11:05 AM (IST)

  Maharashtra Assembly Monsoon Session Live : पावसाळी अधिवेशनला सुरुवात; शिंदे -भाजप सरकारचं पहिलं अधिवेशन

  पावसाळी अधिवेशनला सुरुवात

  पहिल्याच दिवशी विरोधक सरकारला घेरणार!

  आमदार सुर्वे आणि बांगर यांचा मुद्दा गाजणार

  शिंदे -भाजप सरकारचं पहिलं अधिवेशन

 • 17 Aug 2022 10:57 AM (IST)

  अधिवेशनपूर्वी विरोधक आक्रमक

 • 17 Aug 2022 10:51 AM (IST)

  Maharashtra Monsoon Session Live : गद्दारांच्या सरकारमध्ये निष्ठावंताना स्थान नाही - आदित्य ठाकरे

  अधिवेशनापूर्वी विरोधक आक्रमक

  विधीमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन

  ईडी सरकार म्हणत जोरदार घोषणाबाजी

  हे सरकार गद्दारांचं सरकार

  सरकारमध्ये निष्ठावंतांना स्थान नाही - आदित्य ठाकरे

 • 17 Aug 2022 10:40 AM (IST)

  Assembly Monsoon Session Live : हे गद्दारांचं सरकार, फारकाळ टिकणार नाही - आदित्य ठाकरे

  आम्ही महाराष्ट्र म्हणून एकजुटीने उभा आहोत

  हुकूमशाही सरकारचा विरोध करत आहोत

  गद्दार सरकारविरोधात आम्ही लढा देत आहोत

  शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा जोरदार घणारघात

  सरकार फारकाळ टिकणार नाही - आदित्य ठाकरे

 • 17 Aug 2022 10:34 AM (IST)

  Maharashtra Monsoon Session Live : मविआचं विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन; 'ईडी' सरकार म्हणत जोरदार घोषणाबाजी

  मविआचं विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

  शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक

  ईडी सरकार म्हणत जोरदार घोषणाबाजी

  मविआच्या सर्व प्रमुख नेत्यांची उपस्थिती

 • 17 Aug 2022 10:30 AM (IST)

  Maharashtra Monsoon Session Live : मोहीत कंबोज आक्रमक, अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पाचवे ट्विट

  मोहीत कंबोज आक्रमक सिंचन घोटाळ्यावर पाचवं ट्विट

  ट्विटमध्ये अनिल देशमुख, नवाब मलिक, संजय पांडे, संजय राऊत यांची नावं

  पाचवी जागा ठेवली  रिकामी

  राष्ट्रवादीचा बडा नेता तुरुंगात जाणार असल्याचं कंबोज यांचं ट्विट

  कंबोज यांचा रोख अजित पवारांकडे?

  अधिवेशनात ट्विटचे पडसाद उमटण्याची शक्यता

 • 17 Aug 2022 09:38 AM (IST)

  हे सरकार अल्पमुदतीचे फारकाळ टिकणार नाही; मिटकरींचा घणाघात

  आजपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यावर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हे सरकार अल्पमुदतीचे असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच सरकार शेतकऱ्यांच्या जीवावर उठल्याचा देखील आरोप त्यांनी केला आहे.

 • 17 Aug 2022 09:23 AM (IST)

  विरोधी पक्षाला सत्तेत असल्याचे विस्मरण - फडणवीस

  अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. विरोधी पक्षाचे पत्र प्राप्त झाले, त्यातून लक्षात येते की त्यांना आपण सत्तेत होतो, याचे विस्मरण झाले आहे. गजनीसारखी त्यांची अवस्था झाल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.

 • 17 Aug 2022 08:40 AM (IST)

  मंत्रिमंडळात एकाही महिलेला स्थान नाही, महिलांवर अन्याय; विरोधकांचा आरोप

  मंत्रिमंडळ विस्तारात एकाही महिलेला प्रतिनिधित्व देण्यात आलेले नाही. यावरून अनेकदा विरोधकांनी शिंदे सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान आजपासून सुरू होत असलेल्या अधिवेशनात देखील विरोधक हा मुद्दा उपस्थित करण्याची शक्यता आहे.

 • 17 Aug 2022 08:22 AM (IST)

  मंत्री संजय राठोड, अब्दुल सत्तारांना घेरण्याची विरोधकांकडून तयारी

  सत्ता स्थापन झाल्यानंतर तब्बल 40 दिवसांनी मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. या मंत्रिमंडळात शिंदे गटाचे आमदार संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांना देखील स्थान देण्यात आले आहे. सत्तार यांचं नाव टीईटी घोटाळ्यात समोर आलं होतं, मात्र त्यांनी त्यावर स्पष्टीकरणे देत आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत. त्यानंतर त्यांना मंत्रिपद देण्यात आलं या मुद्द्यावरून विरोधक सरकारची कोंडी करण्याची शक्यता आहे.

 • 17 Aug 2022 08:15 AM (IST)

  अतिवृष्टी नुकसानभरपाईचा मुद्दा सभागृहात तापणार

  अतिवृष्टीमुळे विदर्भ आणि मराठवाड्यात शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या मदतीचा निर्णय नव्या सरकारने घेतला असला तरी ही मदत अपुरी असल्याचा सूर शेतकऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे अतिवृष्टीच्या मुद्द्यावरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे. विरोधकांना कोंडीत पकडण्याची संधी न देण्यासाठी नव्या सरकारकडून अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना वाढीव मदत देण्याची घोषणा या अधिवेशनात होण्याची शक्यता आहे.

 • 17 Aug 2022 07:35 AM (IST)

  सरकारची स्थापनाच विश्वासघाताच्या पायावर, अजित पवारांचा घणाघात

  आजपासून पावसाळी अधिवेशनला सुरुवात होणार आहे. हे पावसाळी अधिवेशन वादळी होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर घणाघात केला आहे 'राज्यातील सरकार लोकशाही व संसदीय परंपरांच्या चिंधडया उडवत स्थापन झाले आहे. विश्वासघाताच्या पायावर स्थापन झालेले हे सरकार अद्याप विधिमान्य नाही. राज्याची सत्ता हाती घेण्याआधीपासून तसेच घेतल्यानंतरही सरकारच्या डोक्यावर सर्वोच्च न्यायालयाकडून अपात्र ठरण्याची टांगती तलवार कायम आहे'.  असं ट्विट अजित पवार यांनी केलं आहे.

 • 17 Aug 2022 06:47 AM (IST)

  अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांवर 'सामना'तून जोरदार निशाणा

  आज पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सामनामधून सरकारवर जोरदार टीका कण्यात आली आहे. 50 कोटीत आमदार विकला जातो. या बातम्या धक्कादायक आहेत. त्यामुळे लोकांचा राजकारणावरचा विश्वास उडालाय. हे 50-50 कोटी आदिवासी भागातील आरोग्य सुविधांवर खर्च झाले असते तर अनेकांचे जीव वाचले असते. विधिमंडळात या सगळयांवर उठाव व्हावा, उठाव हा शब्द शिंदे  गटास प्रिय असल्याचे सामनाच्या संपादकीयमध्ये म्हटले आहे.

Published On - Aug 17,2022 6:32 AM

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें