Maharashtra Election News LIVE : मुंढवा जमीन व्यवहारप्रकरणी शितल तेजवानीविरोधात आरोपपत्र दाखल
Live Updates In Marathi : पुणे महापालिका आयुक्त तथा प्रशासक नवल किशोर राम यांनी मिळकत करात दहा टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव स्थायी समिती समोर मांडला आहे. एका बाजूला मोठ्या थकीत मिळकतकरांसाठी अभय योजना राबवायच्या आणि दुसरीकडे नियमित कर भरणाऱ्यांनांवर दहा टक्के करवाढ लादायची हा प्रकार अन्यायकारक आहे अशा शब्दात नाराजी व्यक्त केली जात आहे.

LIVE NEWS & UPDATES
-
मध्यरात्री काळजाचा थरकाप उडवणारा अपघात
अहिल्यानगर रोडवर सोमवारी मध्यरात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. अहिल्यानगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्रवाशांनी भरलेली रिक्षा उलटून झालेल्या या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन तरुणी गंभीर जखमी झाल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच पदमपुरा अग्निशमन केंद्राचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अपघाताची भीषणता इतकी होती की, रिक्षा चालक रिक्षामध्येच अडकून पडला होता.
-
रस्त्याच्या खाली गाडी घेण्याच्या कारणावरून गावकरी आणि ऊसतोड कामगारांमध्ये वाद
रुग्णाला घेऊन जाणाऱ्या चार चाकी वाहनाला ऊसतोड कामगाराच्या बैलगाड्याने वाट मोकळी करून न दिल्याने झाला वाद.नांदेडच्या हदगाव तालुक्यातील हरडप येथे ऊसतोड कामगार व गावकऱ्यांमध्ये राडा. ऊसतोड कामगार हातात कोयता घेऊन पाठलाग करतानाचा व्हिडिओ व्हायरल.
-
-
निर्दयी पित्याने पोटच्या सात वर्षीय मुलीला तेलंगणा राज्यातील कॅनलमध्ये नेऊनदिले फेकून
दोन जुळ्या मुलींपैकी एका मुलीचा घेतला जीव, मुलीला नांदेडला घेऊन जातोय म्हणून केला घात. निवडणुकीत तिसऱ्या अपत्याची अडचण होईल म्हणून पित्यानेच पोटच्या मुलीला संपवल्याची माहिती. केरूर गावचे सरपंच पद ओबीसी साठी झाले होते राखीव, आरोपीला एक मुलगा आणि दोन जुळ्या मुली असल्यामुळे कृत्य केल्याची माहिती.
-
जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भूम तालुक्यात भाजप आणि शिवसेना थेट समोरासमोर
भाजपच्या उमेदवारासाठी मंत्री बावनकुळे यांनी सभा घेतल्याने शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांची प्रतिष्ठा पणाला. भूम तालुक्यातील ईट जिल्हा परिषद गटात मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शिवसेना विरोधी सभेनंतर वातावरण तापले.भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारंचे एकमेकांवर सावकारी, दोन नंबरचे धंदे आणि गुत्तेदारीचे गंभीर आरोप
-
सयाजी शिंदे, प्रशांत दामले,अनिरुद्ध पंडित यांच्यासह 6 मान्यवरांना यंदाचा गोदावरी गौरव पुरस्कार
नाशिक- सयाजी शिंदे, प्रशांत दामले,अनिरुद्ध पंडित यांच्यासह 6 मान्यवरांना यंदाचा गोदावरी गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. 10 मार्च रोजी वितरण सोहळा पार पडणार आहे. दर दोन वर्षांनी कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या स्मृतिदिनी गोदावरी गौरव पुरस्कार दिला जातो. ज्येष्ठ कवी वसंत डहाके यांच्या हस्ते पुरस्कार दिले जाणार आहेत. स्मृतिचिन्ह आणि 21 हजार रुपये असं पुरस्काराचं स्वरूप असेल.
-
-
नाशिक- राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या गटनेतेपदी सीमा ठाकरे यांची नियुक्ती
नाशिक- राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या गटनेतेपदी सीमा ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली. हेमलता पाटील यांच्या गैरहजेरीत गटनोंदणी झाली. हेमलता पाटील नाराजीमुळे गैरहजर राहिल्याची चर्चा आहे. अजित पवार यांनी आधी मला गटनेते पदाचा शब्द दिल्याचा दावा हेमलता पाटील यांनी केला. सुनील तटकरे यांच्याकडून मात्र सीमा ठाकरे यांच्या नावाचं पत्र आल्याने गोंधळ निर्माण झाला.
-
विजय वडेट्टीवार- प्रतिभा धानोरकर यांच्यातील वादाबाबत दिल्लीत चर्चा
चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यात सुरू असलेला वाद आणि सत्ता स्थापनेबद्दल असलेला पेच यावर आज दिल्लीत चर्चा होणार आहे. काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल यांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी 12 नंतर दिल्लीत बैठक होणार आहे. या बैठकीत महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार, खासदार प्रतिभा धानोरकर, सुनील केदार आणि राज्याचे सहप्रभारी कुणाल चौधरी उपस्थित राहणार आहेत.
-
-
अमरावतीच्या कपिलवास्तु नगरात दोन्ही हातात तलवारी घेऊन दहशत पसरविण्याचा प्रयत्न
अमरावतीच्या कपिलवास्तु नगरात दोन्ही हातात तलवारी घेऊन दहशत पसरविण्याचा प्रयत्न करण्यात आला. तलवारी घेऊन दहशत पसरविताना सागर वानखडे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. शहर गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळताच दहशत पसरविणाऱ्या गुन्हेगाराला दोन तलवारींसह पोलिसांनी अटक केली.
-
पुण्यातील पोर्शे प्रकरणात तिघांना जामीन
पुण्यातील 2024 मधील पोर्शे कार अपघात प्रकरणात तीन आरोपींना सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी जामीन मंजूर केला. या अपघातात दोन सॉफ्टवेअर अभियंतांचा मृत्यू झाला होता. अल्पवयीनकडून होणाऱ्या अशा अपघातांमध्ये पालकांना जबाबदार धरावं असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं. आदित्य अविनाश सुद, आशिष सतीश मित्तल, आणि अमर संतोष गायकवाड या तीन आरोपींना जामीन मंजूर केला आहे.
-
मुंढवा जमीन व्यवहारप्रकरणी शितल तेजवानीविरोधात आरोपपत्र दाखल
मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात शितल तेजवानी विरुद्ध एक हजार 886 पानांचं आरोपपत्र आर्थिक गुन्हे शाखेकडून न्यायालयात सादर करण्यात आलं. या प्रकरणात अन्य आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून लवकरच त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात येईल, असं आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केलं.
-
नाशिक- शिवसेना आज भरणार महापौर आणि उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज
नाशिक- शिवसेना आज महापौर आणि उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज भरणार आहे. शिंदे सेना भाजप विरोधात महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुका लढणार आहे. भाजपा समन्वय असल्याचा आरोप अजय बोरस्ते यांनी कालच केला होता. भाजपाने आधी आम्हाला सत्तेत सहभागी होण्याचा प्रस्ताव दिला, नंतर नाही म्हणाले, असं ते म्हणाले. त्यामुळे शिंदेंची शिवसेना महापौर उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल करणार आहे.
-
रोहित शेट्टीच्या घराबाहेर करण्यात आल्या गोळीबाराचा कट 4 महिन्यांपूर्वीच शिजला
रोहित शेट्टीच्या घराबाहेर करण्यात आल्या गोळीबाराचा कट 4 महिन्यांपूर्वीच शिजला आहे. गोळीबारासाठी वापरलेली स्कुटी चार महिन्याधीच आरोपींनी खरेदी केली होती. आरोपी अमान मरोटे याने ही बाईक उर्वरीत दोन आरोपींना दिली. त्यांनी ही बाईक मुंबईत येऊन मुख्य शूटरला पोहोचवली होती. हीच बाईक घेऊन आरोपी रोहित शेट्टीच्या घरापर्यंत गेला आणि तिथे जाऊन शेट्टीच्या घरावर गोळीबार केला. पोलिसानी आतापर्यंत चार आरोपींना अटक केलेली आहे. ज्यामध्ये दोन आरोपी फरार आरोपी शुभम लोणकरच्या सातत्याने संपर्कात असल्याचंही समोर आलं आहे.
मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात शितल तेजवानी विरुद्ध एक हजार 886 पानांचं आरोपपत्र आर्थिक गुन्हे शाखेकडून न्यायालयात सादर करण्यात आले या प्रकरणात अन्य आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून लवकरच त्यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात येईल असे आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केलं. तर दुसरीकडे पुणे महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी भाजपच्या प्रदेशाध्यक्षांसह वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत तीन नावं निश्चित करण्यात आली आहेत. आज महापौरपदासाठी अर्ज दाखल करण्यापूर्वीच भाजपाकडून अंतिम नाव जाहीर होण्याची शक्यता आहे. भाजपाने 119 जागांवर विजय मिळवला आहे त्यामुळे पालिकेत भाजपाचाच महापौर होणार आहे हे निश्चित झालं आहे. सर्वसाधारण महिला गटासाठी महापौरपदाचं आरक्षण जाहीर झाल्यानंतर भाजपामधील सर्वसाधारण गटातील इच्छुक महिला नगरसेवकांकरून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली होती. आज महापौर आणि उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. यामध्ये तीन महिला नगरसेवकांमध्ये खडकवासला मतदारसंघातून वर्षात तापकीर, मंजुषा नागपुरे तर पर्वती मतदारसंघातून मानसी देशपांडे यांचं नाव आघाडीवर आहे. यासह राज्य, देश-विदेशातील अपडेट्स जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.
Published On - Feb 03,2026 8:13 AM
