Chembur Viral Video : मुंबईत राजकीय पक्षाच्या कार्यालयात जंगी पार्टी..

Chembur Viral Video : मुंबईत राजकीय पक्षाच्या कार्यालयात जंगी पार्टी..

| Edited By: | Updated on: Mar 02, 2025 | 6:36 PM

मुंबईतील एका राजकीय पक्षाच्या कार्यालयात जंगी पार्टी सुरू असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहे.

मुंबईच्या चेंबुरमधील एका राजकीय पक्षाच्या दारू पार्टीचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. पक्षाचे कार्यकर्ते कार्यालयात दारू पार्टी करत असल्याचं या व्हिडिओमध्ये बघायला मिळत आहे.

या व्हिडिओमध्ये काही पक्षप्रमुखांचे देखील फोटो बघायला मिळत आहेत. त्यावरून आता राजकीय वादंग निर्माण झालं असून राजकीय नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया यावर दिल्या जात आहे. टीव्ही9 मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही. मात्र हा कथित व्हिडिओ शिवसेना शाखा कार्यालयातला असल्याचं बोललं जात आहे. व्हिडिओमध्ये कार्यकर्ते बसून पार्टी करत आहेत. त्यांच्यासमोर दारूच्या बाटल्या आणि इतर गोष्टी ठेवलेल्या आहेत. तर मागे भिंतीवर छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांच्यासह काही नेत्यांचे फोटो या व्हिडिओमध्ये बघायला मिळत आहे. त्यावर आता दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांकडून एकमेकांवर ताशेरे ओढले जात आहेत.

Published on: Mar 02, 2025 06:36 PM