Maharashatra News Live : निवडणूक आयोगावर लोकांचा विश्वास नाही – थोरात
Maharashtra News LIVE in Marathi : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर असून राजकीय मोठे बदल पक्षांंमध्ये बघायला मिळत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचारात सक्रिय झाले. बिहारमध्ये मुख्यमंत्रिपदाची शपथ नितीश कुमार घेणार आहेत.

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यानच महायुतीमध्ये नाराजीनाट्य बघायला मिळतंय. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट एकनाथ शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली आणि पक्षप्रवेशाच्या मुद्द्यावर नाराजी व्यक्त केली. आज त्याबाबत काही घडामोडी घडू शकतात. नगरपरिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्यामध्येच काही पक्ष स्वतंत्र तर काही आघाडी करून लढत आहेत. स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेतली जात आहेत. राज्यात गारठा चांगलाच वाढताना दिसत असून पारा घसरत आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील काही दिवसांसाठी थंडीच्या लाटेचा मोठा इशारा दिला. उद्या 20 नोव्हेंबर रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ काही तासांसाठी बंद राहणार आहे. यासह देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
LIVE NEWS & UPDATES
-
मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त राधाबिनोद शर्मा यांच्याकडून विकास कामांचा आढावा
मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त व प्रशासक राधाबिनोद शर्मा यांनी शहरातील सुरू असलेल्या विकासकामांची आज पाहणी करून प्रलंबित कामांना वेग देण्याचे स्पष्ट निर्देश दिले.घोडबंदर फायर स्टेशन, मिरा रोड पूर्वेतील जिम्नॅस्टिक सेंटर, भाईंदर पूर्वेतील मार्केट–सभागृह इमारत, भाईंदर पश्चिममधील मिनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि राई गाव शाळेच्या कामांची त्यांनी प्रत्यक्ष तपासणी केली.
-
बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी प्रचंड चढाओढ
बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी प्रचंड चढाओढ
१५०० पेक्षा अधिक इच्छुकांनी घेतले अर्ज.
हे अर्ज उद्या, गुरुवार २० नोव्हेंबरपासून ते २५ नोव्हेंबरपर्यंत दररोज दुपारी १२ ते सायंकाळी ५ या वेळेत काँग्रेस कार्यालयात स्विकारले जाणार
अर्जांची छाननी पूर्ण झाल्यानंतर पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार
आगामी निवडणुकीत समविचारी पक्षांसोबत आघाडीचे काँग्रेसकडून संकेत
-
-
निवडणूक आयोगावर लोकांचा विश्वास नाही – थोरात
काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले की, निवडणूक आयोगावर लोकांचा विश्वास राहिला नाही , निवडणूक आयोग स्वतः निर्णय घेत नाही दुसरे कोणीतरी निर्णय घेतय. आमची विचारधारा भाजपा शिवसेना महायुती विरोधात आहे आणि या निवडणुकीत त्यांना पराजित करून त्यांचे नामोहरण कसे होईल यावर आम्ही भर देत आहोत.
-
बीड : राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनात 73.4 कोटींचा घोटाळा
बीडमध्ये राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनात 73.4 कोटींचा घोटाळा झाला आहे. उपजिल्हाधिकारी यांच्या तक्रारीवरून दहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाल्याने बीडमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. भूसंपादनातील अधिकारी, कर्मचारी, वकील यांनी संगनमताने हा कोट्यावधीचा घोटाळा केल्याचे प्रथमदर्शी उघडकीस आले आहे.
-
धुळे : पिंपळनेर शहरात आदिवासी विद्यार्थ्याची आत्महत्या
साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील शासकीय मुलांच्या वस्तीगृहातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सुरेश मालुसरे असं आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचं नाव आहे. तो बीएच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. गेल्या तीन दिवसातील आदिवासी वस्तीगृहातील दुसरी आत्महत्या आहे. तीन दिवसापूर्वी महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी आत्महत्या केली होती.
-
-
नाशिक : निफाड तालुक्यातील देवगाव परिसरात बिबट्याचा उच्छाद
नाशिकच्या निफाड तालुक्यातील देवगाव परिसरात बिबट्यांचा उच्छाद कायम आहे. शाळेजवळ शिक्षकावर बिबट्याने हल्ला केला आहे, यात शिक्षक जखमी झाला आहे. या हल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती घटली आहे.
-
नितीश कुमार यांची एनडीए विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड
नितीश कुमार यांची एनडीए विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड झाली. ते बिहारचे पुढचे मुख्यमंत्री असतील. 20 नोव्हेंबर रोजी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. त्यापूर्वी, नितीश राजभवनात राजीनामा देण्यासाठी आणि सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी पोहोचतील.
-
मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे एक्शन मोडवर
मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे एक्शन मोडवर आले आहेत. उद्या 12 वाजता उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिक्षक आमदार अभ्यंकर यांच्या उपस्थितीत मुंबईच्या 150 शाळांना डिजिटल बोर्ड देण्यात येणार आहे. इतकंच काय तर मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. बांद्रा एमआयजी क्लब इथे 12 वाजता बैठक होणार आहे. संध्याकाळी 7 वाजता शिवाजी मंदीर इथे जेष्ठ शिवसैनिकांच्या स्नेह संमेलनाला हजेरी लावणार आहेत.
-
शिरपुरात भीषण आगीत दुकानं जळून खाक
शिरपूरात भीषण आगीत क्लिनिक, मेडिकल, दुकान आणि एटीएम जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. मागील बाजूस असलेल्या घरांना देखील फटका बसला आहे. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे तीन बंब दाखल झाले आहे.
-
ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री आज भारत दौऱ्यावर येणार
ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्री पेनी वोंग बुधवारी भारतात येत आहेत. वोंग उद्या परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची भेट घेतील. परराष्ट्र मंत्रालयाच्या सल्लागारानुसार, वोंग आज रात्री दिल्लीत येण्याची अपेक्षा आहे. वोंग उद्या, गुरुवारी दिल्लीतील हैदराबाद हाऊसमध्ये जयशंकर यांची भेट घेतील. त्या उद्या रात्री परतण्याची अपेक्षा आहे.
-
हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचे हाल
मोठ अपडेट समोर आली आहे. हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. वांद्र्याला येणारी लोकल वडाळा स्थानकात खोळंबली आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.
-
कांदिवली चारकोप पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोळीबार
कांदिवली चारकोप पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. 2 राउंड गोळीबार झाल्याचं म्हटलं जात आहे. या गोळीबारमध्ये दोन्ही गोळ्या एका माणसाच्या पोटात लागल्या. कांदिवलीतील ऑस्कर रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कांदिवली पश्चिमेकडील हिंदुस्तान नाकाजवळ एका दुचाकीस्वाराने गोळीबार केला. गोळीबार कोणी आणि का केला? याचा तपास चारकोप पोलिसांकडून केला जात आहे.
-
ठाकरे सेना-मनसे जागावाटपाच्या प्राथमिक चर्चेला सुरुवात : सूत्रांची माहिती
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली. त्यानंतर आता ठाकरे सेना आणि मनसे यांच्यात जागावाटपाच्या प्राथमिक चर्चेला सुरुवात झाल्याचं सूत्रांकडून म्हटलं जात आहे. सेनेकडून मनसेला 70 जागा देणार असल्याचं म्हटलं जात आहे.
-
पुण्यात मध्यरात्री कोयता गँगचा राडा
पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगचा हैदोस पाहायला मिळाला आहे. पुण्यात दुचाकीस्वाराकडून एकावर 2 राउंडी गोळीबार करण्यात आला आहे. या गँगने मारहाण केली. त्यानंतर हॉटेलमध्ये तोडफोड केली. तसेच चोरी देखील करण्यात आली आहे.
-
अलिबाग नगरपालिकेत शेकापला मनसेचा पाठिंबा
अलिबाग नगरपालिकेत नगराध्यक्षपदासाठी मविआकडून अक्षया नाईक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अक्षया नाईक या मविआच्या उमेदवार आहेत. अक्षया नाईक यांनी आज शेकाप कार्यकर्त्यांसह मनसे कार्यकर्त्यांची भेट घेतली. यावेळी मनसेने अक्षया नाईक यांना पाठिंबा दिला आहे. मनसेच्या पाठिंब्यामुळे अक्षया नाईक यांचं पारडे झालंय.
-
एनआए अनमोल बिश्नोईला अटक करणार
या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. गँगस्टर अनमोल बिश्नोईला अमेरिकेतून भारतात आणलं आहे. एनआए अनमोल बिश्नोईला अटक करणार आहे. एनआए बिश्नोईला अटकेनंतर कोर्टात हजर केलं जाणार आहे.
-
बदलापुरात शिंदेंच्या शिवसेनेकडून काँग्रेसला दणका
बदलापुरात शिंदेंच्या शिवसेनेकडून काँग्रेसला दणका देण्यात आला आहे. काँग्रेस शहराध्यक्ष संजय जाधव यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. संजय जाधव आणि कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.
-
आमदार कैलास पाटील यांची तुळजापूर नगरपालिकेत नगराध्यक्षपदासाठी दिलेल्या उमेदवारावरून भाजपावर टीका
तुळजापूर नगरपालिकेत नगराध्यक्षपदासाठी दिलेल्या उमेदवारावरून आमदार कैलास पाटील यांनी भाजपावर टीका केली आहे. भारतीय जनता पार्टीचा खरा चेहरा तुळजापूर येथे नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवरून समोर आला आहे.
पार्टी विथ माफिया अशी भारतीय जनता पार्टीची ओळख आहे. सट्टा असेल मटका असेल किंवा ड्रग्ज मधील आरोपींना तुम्ही उमेदवारी देत असाल तर हाच का तुमचा भाजपचा चेहरा, असं आमदार कैलास पाटील यांनी म्हटलंय. भाजपने तुळजापूर येथे नगराध्यक्षपदासाठी ड्रग्ज प्रकरणातील जामीन झालेले विनोद गंगणे यांना उमेदवारी दिली आहे.
-
एकनाथ शिंदे गृहखात्याच्या कार्यक्रमाला का होते गैरहजर?
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या कामात व्यस्त असल्याने एकनाथ शिंदे गृहखात्याच्या कार्यक्रमाला गैरहजर राहिले. कालच याबाबत डीसीअम कार्यालयाने गृहविभागाला कळवल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यांच्या आजच्या दैनंदिन कार्यक्रमातही याचा कुठलाच उल्लेख नाही. आज एकनाथ शिंदे हे ठाण्यातील घरी कार्यकर्त्यांच्या आणि जिल्हाध्यक्षांच्या भेटीगाठी घेणार आहेत.
-
अंबड नगर परिषदेचा गड राखण्याचं आमदार नारायण कुचे यांच्यासमोर आव्हान
जालना जिल्ह्यातल्या अंबड नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाकडून देवयानी केदार कुलकर्णी यांना नगराध्यक्षपदाची उमेदवार म्हणून जाहीर केलंय. तर महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाच्या श्रद्धा शिवप्रसाद चांगले यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय.
-
26 तारखेला युवा स्वाभिमान पक्षाची भूमिका जाहीर करू- रवी राणा
“येत्या 26 तारखेला युवा स्वाभिमान पक्षाची भूमिका आम्ही जाहीर करणार आहोत. मोठा भाऊ म्हणून भाजपला पाठिंबा द्यायचा का, त्यासाठी आम्ही रणनीती करू. युवा स्वाभिमान पार्टीचे देखील उमेदवार निवडून आले पाहिजेत,” असं आमदार रवी राणा म्हणाले.
-
अहिल्यानगर जिल्ह्यातील हसनापूर शिवारात मादी बिबट्या जेरबंद
अहिल्यानगर जिल्ह्यातील हसनापूर शिवारात बिबट्याला जेरबंद करण्यात यश मिळालं आहे. वनविभागाच्या पथकाने लावलेल्या पिंजऱ्यात सकाळी बिबट्या अडकला. परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या हालचालींमुळे भीतीचं वातावरण होतं. नागरिकांच्या सुरक्षेसाठी वनविभागाकडून अनेक ठिकाणी पिंजरे लावण्यात आले होते.
-
अजित पवारांना चॅलेंज दिल्यानंतर बाळराजे पाटील यांच्याकडून दिलगिरी व्यक्त
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट चॅलेंज दिल्यानंतर बाळराजे पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. “भावनेच्या भरात माझ्याकडून ते आव्हान दिलं गेलं, मात्र अजित दादा मोठे आहेत, ते मोठ्या मनाने मला माफ करतील,” असं ते म्हणाले.
-
कल्याण-डोंबिवलीत महापौर भाजपाचाच – नरेंद्र पवार
केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. डोंबिवलीचे प्रदेशाध्यक्ष असल्याने या सर्वांसोबत काम केल्याने फायदा होतो. संघटना मजबूत होते. सर्व ताकद वॉर्डाच्या विकासाकरता मिळते. यासाठी सर्व पक्षाचे माजी नगरसेवक, पदाधिकारी भाजपमध्ये येत आहेत असा दावा नरेंद्र पवार यांनी केला. महापौर भाजपाचाच होणार असं ते म्हणाले.
-
शिक्षेसाठी नव्हे, नागरिकांच्या सुरक्षेसाठी कायदे – देवेंद्र फडणवीस
आधी तारीख पे तारीख व्हायचं, आता ते नाही होणार. गंभीर गुन्ह्यांमध्ये देखील वेळेत न्याय देता येणार. शिक्षेसाठी नव्हे, नागरिकांच्या सुरक्षेसाठी कायदे. नव्या कायद्यांमुळे गुन्हेगारांना शोधण्यास मदत होणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. नवीन फौजदारी कायद्यावरील कार्यक्रमात ते बोलत होते.
-
धुळे जिल्ह्यात 254 अर्ज बाद
धुळे जिल्ह्यात नगरपरिषद निवडणुकीच्या अर्ज छाननीनंतर 254 अर्ज बाद तर 356 उमेदवारी अर्ज ठरले वैध. नगराध्यक्ष पदाच्या एकूण अर्जांपैकी 17 बाद. अर्ज छाननी नंतर शिरपूर दोंडाईचा पिंपळनेर तसेच शिंदखेडा नगरपंचायतीच्या एकूण 356 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. माघारी नंतर होणार अंतिम चित्र स्पष्ट.
-
नवीन फौजदारी कायद्याच्या कार्यक्रमाला एकनाथ शिंदे अनुपस्थित
नवीन फौजदारी कायद्यावरील प्रदर्शनाचं उद्घाटन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदर्शनाच उद्घाटन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कार्यक्रमाला अनुपस्थित. त्यांच्या अनुपस्थितीच कारण अस्पष्ट. कालच एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला होता.
-
पुण्यात कोयता टोळीचा मध्यरात्री राडा, हजारो लुटले
पुण्यात मध्यरात्री रेस्टॉरंट आणि बार मध्ये घुसून चार लोकांनी बारमधील वीस हजार रुपये पळवले. मास्क लावून आलेल्या चौघांनी पुण्यातील डेक्कन परिसरात असलेल्या अनंत रेस्टॉरंट अँड बारमध्ये घुसून दरोडा घालत रोकड लुटली.
-
नागपूरच्या भांडेवाडी परिसरात शिरला बिबट्या
नागपूरच्या भांडेवाडी परिसरात शिरला बिबट्या. त्याला पकडण्यासाठी वन विभागाकडून प्रयत्न सुरू असून रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे.
-
मुंबईमध्ये स्वबळावर लढून काय मिळणार याचा काँग्रेसने करावा विचार – विनायक राऊत
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे युती बाबतचा महत्त्वाचा निर्णय घेतील. पण काँग्रेसची संपूर्ण देशामध्ये जी दयनीय अवस्था होत चालली आहे, ते पाहून मुंबईमध्ये स्वबळावर लढून त्यांना काय मिळणार याचा विचार काँग्रेसनेच करावा असं विनायक राऊत म्हणाले. काँग्रेसकडे स्वबळावर लढण्यासारखी इच्छाशक्ती राहिली आहे का असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
-
छत्रपती संभाजीनगर – पुन्हा एकदा अतिक्रमण हटाव कारवाईला सुरुवात, तगडा पोलिस बंदोबस्त तैनात
छत्रपती संभाजीनगर मध्ये पुन्हा एकदा अतिक्रमण हटाव कारवाईला सुरुवात करण्यात येत आहे. पैठण गेट परिसरात ही कारवाई करण्यात येत आहे . या पार्शअवभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांच्या वतीने मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
-
पार्थ पवार यांचा कंपनीत ९९ टक्के शेअर्स, तरीही नाव नाही, अंबादास दानवेंचा सवाल
अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत पार्थ पवार यांच्या कथित जमीन खरेदी प्रकरणावरून सरकारवर जोरदार टीका केली. ज्या पार्थ पवार यांचा कंपनीत ९९ टक्के शेअर्स आहे, त्यांचे नाव या प्रकरणी अद्याप पुढे येत नाही, ही सरकारी जमीन विकता येते का? असा थेट प्रश्न अंबादास दानवे यांनी विचारला
-
नाशिक तपोवनातील झाडांच्या कत्तल प्रकरणावरून वाद चिघळला, पर्यवरणप्रेमी आक्रमक
नाशिकच्या तपोवन परिसरात प्रस्तावित असलेल्या साधू ग्राम प्रकल्पासाठी सुमारे १८०० झाडांचे सर्वेक्षण करून ती तोडण्याच्या महापालिकेच्या प्रस्तावाला पर्यावरणप्रेमींनी तीव्र विरोध दर्शवला आहे. ज्या झाडांवर कत्तलीची नोटीस लावली आहे, त्याच ठिकाणी पर्यावरणप्रेमी एकत्र जमून त्यांनी आपला विरोध व्यक्त केला.या विषयावर तोडगा काढण्यासाठी महापालिका अधिकारी आणि पर्यावरणप्रेमी यांची एकत्रित बैठक घेण्याची मागणी केली आहे.
-
जळगाव सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ, आजचा दर काय?
जळगाव सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोन्याचा भाव आज १,५४५ रुपयांनी वाढून GST सह ₹१,२६,६९०/- इतका झाला आहे, तर चांदीचा भाव ₹४,१२० रुपयांनी वाढला आहे. त्यामुळे चांदीचा दर GST सह ₹१,६२,७४०/- वर पोहोचला आहे.
-
धाराशिव जिल्ह्यातील चार सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांना नोटीस
धाराशिव जिल्ह्यात निवडणूक प्रक्रियेची माहिती वेळेत सादर न केल्यामुळे आणि वारंवार माहिती बदलल्यामुळे जिल्हा निवडणूक अधिकारी कीर्ती किरण पुजारी यांनी नोटीसा बजावल्या आहेत. धाराशिव, भूम, परंडा आणि कळंब येथील चार सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. या अधिकाऱ्यांनी विहित कालावधीमध्ये नोटीसला उत्तर न दिल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी दिला आहे.
-
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अनावरण वाद, अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल होताच क्षत्रिय मराठा फाउंडेशनकडून निषेध
क्षत्रिय मराठा फाउंडेशनने नेरुळ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा अनावरण प्रकरणात मनसे नेते अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल केल्याबद्दल तीव्र निषेध व्यक्त केला आहे. फाउंडेशनचे प्रदेश अध्यक्ष संभाजी शिर्के यांनी ही माहिती दिली. या निषेधाचा भाग म्हणून, क्षत्रिय मराठा फाउंडेशनचे पदाधिकारी उद्या (गुरुवारी) अमित ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेणार आहेत आणि त्यांचा सत्कार करणार आहेत.
-
ठाण्यात १०० कोटींचा गुंतवणूक घोटाळा, नौपाडा पोलीस ठाण्यात ९ जणांवर गुन्हा दाखल
100 कोटींचा गुंतवणूक घोटाळा उघडकीस आला आहे. कमी कालावधीत ज्यादा परताव्याचे आमिष दाखवून एका टोळीने तब्बल 200 गुंतवणूकदारांना 100 कोटी रुपयांचा गंडा घातला आहे. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घोटाळ्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा अधिक तपास पोलिसांनी सुरू केला आहे. हे प्रकरण आता अधिक तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
-
धाराशिव जिल्ह्यात सोयाबीन खरेदी हमीभाव केंद्र सुरू, शेतकऱ्यांना मिळणार आधारभूत किंमत
धाराशिव जिल्ह्यामध्ये 31 ठिकाणी सोयाबीन, उडीद, मूग हमीभाव केंद्र सुरू करण्यात आले आहेत. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 14 हजार 143 शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रासाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे. हमीभाव खरेदी केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आधारभूत भाव मिळणार असून अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे.
-
तपोवन परिसरातील झाडांच्या होणाऱ्या कत्तल प्रकरणी महापालिकेचा खुलासा
1800 वृक्षांवर केलेले मार्किंग कत्तलीसाठी नाही तर सर्वेक्षणासाठी… जे झाडं नवीन आणि विदेशी प्रजातीचे आहेत, ते आम्ही पडणार आहोत… एकही जून वृक्ष आम्ही पडणार नाही… जेवढे नवीन झाड पाडणार तेवढेच झाडं आम्ही लावणार देखील… जिथे पुनर्रोपण शक्य आहे तिथे पुनर्रोपण देखील करणार… अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर यांची माहिती…
-
वाहन चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगार अटकेत, पोलिसांची कडक कारवाई
तुषार संजय झांबरे वय 29 मोर्चा मूळचा बीडचा राहणारा या आरोपीला चोरीला गेलेल्या ट्रक सहित घेतले ताब्यात घेतलं. तर दुसरा आरोपी राजू पठाण वय 28 मूळचा राहणारा लोणी काळभोर हा पळून गेला होता. त्यालाही पोलिसांनी अटक केली आहे. राजू पठाण हा तोतया डॉक्टर आहे. याबाबत खडक पोलिस अधिक तपास करत आहेत. पुणे शहरातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये हद्दीत या आरोपींनी गाड्याची चोरी केली आहे. या आरोपींनी अजून कुठे असे गुन्हे केले आहेत का याचा तपास खडक पोलीस करत आहेत.
-
उत्तरेकडून येणाऱ्या थंड लाटमुळे निफाडमध्ये थंडीचा कडाका कायम…
निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात सात अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद… वाढत्या थंडीमुळे मानवाबरोबरच शेती पिकांवरही होतोय परिणाम… फळधारणा झालेल्या द्राक्ष बागेंना वाढत्या थंडीमुळे फटका बसण्याची भीती… गेल्या आठ दिवसापासून निफाड तालुक्यात किमान तापमानाचा पारा दहा अंश सेल्सिअसच्या खाली…
-
एकाच कुटुंबातील दोन महिला आमने सामने
अमरावतीच्या दर्यापूर नगर परिषदमध्ये एकाच कुटुंबातील दोन जावामध्ये लढत. भाजप आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या पत्नी नलिनी भारसाकडे विरुद्ध जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक काँग्रेसचे नेते सुधाकर भारसाकळे यांच्या पत्नी मंदाबाई भारसाकडे निवडणुकीच्या रिंगणात..
-
जालनाच्या परतुरमध्ये नगरपरिषद निवडणुकीत भाजपचा स्वबळाचा नारा
विद्यमान आमदार बबनराव लोणीकर आणि माजी आमदार सुरेश जेथलिया यांच्या प्रतिष्ठापणाला. सत्ता खेचून आणण्यासाठी बबनराव लोणीकरांची प्रतिष्ठा पणाला तर गड कायम राखण्याचं सुरेशकुमार जेथलियांसमोर आव्हान
-
निवडणुकीपूर्वी पुणे महापालिकेचे सभागृह नव्या रूपात
पुणे महापालिकेचे मुख्य सभागृह निवडणुकीपूर्वी सुशोभीकरणासाठी प्रशासनाने १ कोटी रुपयांच्या खर्चास मंजुरी दिली आहे. 2022 पासून बंद असलेले सभागृह पुन्हा वापरात आणण्यासाठी ध्वनीव्यवस्था, विद्युतदुरुस्ती आणि नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत.
-
देखभाल कामांमुळे उद्या पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद
विविध जलकेंद्रांवरील देखभाल, फ्लो मीटर व व्हॉल्व्ह बसवण्याच्या कामांसाठी गुरुवारी संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शुक्रवारी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. खडकवासला ते पर्वतीदरम्यानच्या 3000 मिमी वाहिनीवरील दुरुस्ती व वडगाव जलशुद्धीकरण केंद्राच्या कामांसाठी धरणातून होणारा पुरवठा सकाळी 6 ते रात्री 12 बंद ठेवला जाणार आहे.
-
पेट्रोल पंपचालक आणि विक्रेता संघटना आक्रमक
पुण्यात पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांवरील मारहाणीच्या वाढत्या घटनांमुळे पेट्रोल पंपचालक आणि विक्रेता संघटना आक्रमक झाल्या आहेत. मारहाण थांबली नाही तर 24 नोव्हेंबरपासून सायंकाळी सातनंतर पंप बंद ठेवण्याचा इशारा ऑल इंडिया पेट्रोल-डिझेल असोसिएशनने दिला.
Published On - Nov 19,2025 8:18 AM
