बऱ्याच लोकांना इतरांच्या गोष्टी वापरण्याची सवय असते. पण वास्तुशास्त्रात इतरांच्या काही गोष्टी वापर हे दारिद्राचे लक्षण मानले गेले आहे. वास्तुशास्त्राच्या मते 6 गोष्टी अशा असतात की इतरांच्या गोष्टी वापरल्यामुळे आपल्याला दारिद्राला सामोरे जावे लागते. चला तर जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.
Oct 26, 2021 | 4:32 PM
अनेकवेळा आपण काही कामासाठी इतरांचे पेन उधार घेतो, पण काम संपल्यावर ते परत करायला विसरतो. तुमची ही सवय तुमच्यासाठी समस्या बनून आर्थिक संकटाला आमंत्रण देऊ शकते.
1 / 5
दुसऱ्याच्या पलंगावर झोपणे हा देखील वास्तुदोष मानला जातो. असे केल्याने त्या पलंगावर झोपणाऱ्या लोकांमध्ये नेहमी भांडणे होतात आणि मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते.
2 / 5
हातात घातलेले घड्याळ माणसाला चांगली आणि वाईट ऊर्जा देखील देते. इतरांचे घड्याळ धारण केल्याने मानवी कामात अपयश आणि आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे कधीही दुसऱ्या व्यक्तीचे घड्याळ वापरु नये.
3 / 5
एखाद्याचा रुमाल कधीही वापरु नये, त्यामुळे नाते तुटते, असा सामान्य समज असला तरी, एखाद्याचा रुमाल वापरल्याने आर्थिक संकटासोबतच तणावालाही आमंत्रण मिळते, असे वास्तुशास्त्रात सांगितले आहे.