Marathi News » Spiritual adhyatmik » Mahashivratri Lord Shiva Devotees gather at Dhule Satpuda Dhadgaon Yatra to worship Mahadeva
महादेवाच्या सेवेसाठी भाविक आतुर, सातपुड्याच्या दुर्गम भागातील धडगाव यात्रेला सुरुवात
जितेंद्र बैसाणे | Edited By: मृणाल पाटील
Updated on: Mar 02, 2022 | 11:00 AM
सातपुड्याच्या दुर्गम भागात असलेल्या धडगाव येथील यात्रा उत्सवाला सुरुवात झाली असून येथील महादेव मंदिरात भाविक मोठ्या संख्येने येत आहेत.
Mar 02, 2022 | 11:00 AM
काल सर्वकडे महाशिवरात्री साजरी केली. शिवरात्रीचा दिवस हा देवतांचे दैवत महादेवाला प्रसन्न करून पूजण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला हा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या दिवशी भगवान शिव (Shiv) आणि माता (Parvati) पार्वतीचा विवाह संपन्न झाला असे म्हणतात .
1 / 5
यादरम्यान शिवभक्त त्यांना विविध प्रकारच्या वस्तू अर्पण करतात आणि भक्तीभावाने शिव-पार्वतीचा उपवासही ठेवतात. या दिवशी पूजेसाठी नियमांचे पालन करणे देखील खूप महत्वाचे आहे.
2 / 5
सातपुड्याच्या दुर्गम भागात असलेल्या धडगाव येथील यात्रा उत्सवाला सुरुवात झाली असून येथील स्वयंभू महादेव मंदिरात भाविकांची गर्दी दिसतं आहे.
3 / 5
महाशिवरात्रीच्या दिवशी रात्रीचे आरती झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी यात्रा उत्सव सुरू होतो यात्रा उत्सवासाठी आणि दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची हजेरी असल्यास पाहण्यास मिळत आहे. यावेळी भगवान शंकराची पूजा करण्यात आली.
4 / 5
सकाळपासूनच भाविकांची मंदिर परिसरात गर्दी दिसून येत असून कोरोना नियमांचे पालन होत असल्याचे पाहण्यास मिळाले दोन वर्षानंतर मंदिर परिसरात यात्रा उत्सव होत असल्याने भाविकांमध्ये उत्साहा पाहण्यास मिळाला.