GT vs RR IPL 2026 Qualifier 2 Score Updates and Highlights :गुजरात टायटन्स अंतिम फेरीत, राजस्थान रॉयल्सला 7 गडी राखून नमवलं
GT vs RR Qualifier 2 IPL 2026 Updates and Highlights in Marathi : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनंतर आयपीएल 2026 फायनलमध्ये पोहचणारा दुसरा संघ कोणता असणार? अखेर या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. राजस्थानला पराभूत करत गुजरातने फायनलमध्ये धडक दिली आहे.

गुजरात टायटन्सने क्वॉलिफायर 2 सामन्यात राजस्थान रॉयल्सला पराभूत केलं आहे. गुजरातने यासह फायनलमध्ये धडक दिली आहे. राजस्थानने गुजरासमोर विजयासाठी 215 धावांचं आव्हान दिलं होतं. गुजरातन हे आव्हान 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. गुजरात टायटन्सने या विजयासह फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आता आयपीएल ट्रॉफीसाठी 31 मे रोजी अंतिम सामना होणार आहे. गुजरातसमोर या सामन्यात गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं आव्हान असणार आहे. गुजरात टायटन्सची आयपीएल स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचण्याची ही एकूण तिसरी वेळ ठरली आहे. त्यामुळे आता कोणता संघ रविवारी जिंकत आयपीएल चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
LIVE Cricket Score & Updates
-
GT vs RR IPL 2026 Qualifier 2 Live Score Updates : गुजरात टायटन्स अंतिम फेरीत, आरसीबीशी होणार सामना
शुबमन गिल याच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सने क्वॉलिफायर 2 सामन्यात राजस्थान रॉयल्सचा धुव्वा उडवत तिसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहचण्याची कामगिरी केली आहे. राजस्थानने गुजरातसमोर विजयासाठी 215 धावांचं आव्हान ठेवलं होतं. गुजरातने हे आव्हान कॅप्टन शुबमन गिल याचं शतक आणि साई सुदर्शन याच्या अर्धशतकाच्या जोरावर सहज पूर्ण केलं. गुजरातचा राजस्थान विरुद्धचा हा प्लेऑफच्या इतिहासातील तिसरा विजय ठरला. तसेच गुजरातची फायनलमध्ये पोहचण्याची तिसरी वेळ ठरली आहे. आता गुजरात ट्रॉफीसाठी 31 मे रोजी आरसीबी विरुद्ध 2 हात करणार आहे.
-
GT vs RR IPL 2026 Qualifier 2 Live Score Updates : गुजरात टायटन्सला तिसरा धक्का
वॉशिंग्टन सुंदर 16 धावा करून तंबूत परतला आहे. त्याच्या रुपाने गुजरातला तिसरा धक्का बसला आहे. गुजरातला विजयासाठी 17 चेंडूत 14 धावांची गरज आहे. त्यामुळे हा सामना गुजरातच्या बाजूने झुकलेला आहे.
-
-
GT vs RR IPL 2026 Qualifier 2 Live Score Updates : गुजरात टायटन्सला दुसरा धक्का
कर्णधार शुबमन गिलच्या रुपाने गुजरात टायटन्सला दुसरा धक्का बसला. त्याने 53 चेंडूत 104 धावा केल्या आणि बाद झाला. गिल बाद झाला तेव्हा गुजरात टायटन्सला 30 चेंडूत 33 धावांची गरज होती.
-
GT vs RR IPL 2026 Qualifier 2 Live Score Updates : शुबमन गिलचं शतक
क्वॉलिफायर 2 फेरीत गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिलने 47 चेंडूत शतक पूर्ण केलं. त्याने चौकार मारून शतक साजरं केलं. त्याने 15 चौकार आणि तीन षटकार मारले.
-
GT vs RR IPL 2026 Qualifier 2 Live Score Updates : गुजरात टायटन्सला पहिला धक्का, सुदर्शन विचित्र पद्धतीने बाद
साई सुदर्शन विचित्र पद्धतीने बाद झाला. त्याने 32 चेंडूत 58 धावांची खेळी केली. पण फटका मारताना हातून बॅट सटकली आणि थेट स्टंपवर आदळली. क्रिकेटमध्ये अशा पद्धतीने बाद होणं खूपच दुर्मिळ आहे. त्यामुळे साई सुदर्शन हताश झाला.
-
-
GT vs RR IPL 2026 Qualifier 2 Live Score Updates : साई सुदर्शनचं अर्धशतक
कर्णधार शुबमन गिलनंतर साई सुदर्शनने अर्धशतक ठोकलं आहे. 26 चेंडूत अर्धशतक ठोकलं. षटकार ठोकून त्याने 50 धावा पूर्ण केल्या. त्यामुळे गुजरात टायटन्स मजबूत स्थितीत आहे.
-
GT vs RR IPL 2026 Qualifier 2 Live Score Updates : साई-शुबमन सलामी जोडीची शतकी भागीदारी, गुजरात मजबूत स्थितीत
साई सुदर्शन आणि शुबमन गिल या सलामी जोडीने शतकी भागीदारी केली आहे. या गोघांनी 8.4 ओव्हरमध्ये 100 धावा जोडल्या आहेत. तर राजस्थान विकेट न मिळाल्याने अडचणीत सापड़ली आहे.
-
पारनेर तालुक्यात भोंदू बाबाकडून महिलेची साडेसहा लाखांची फसवणूक
पारनेर तालुक्यात भोंदू बाबाकडून महिलेची साडेसहा लाखांची फसवणूक
गतिमंद मुलाचा आजार बरा करणे आणि भावाचे लग्न लावून देण्याचे आमिष
तंत्र-मंत्र, पूजा आणि होमहवनाच्या नावाखाली लाखो रुपये उकळले
मुलाला जिवंत मारण्याची धमकी देत महिलेवर वारंवार लैंगिक अत्याचार
कोरोना काळापासून पीडित महिला भोंदूबाबांच्या संपर्कात
-
GT vs RR IPL 2026 Qualifier 2 Live Score Updates : गुजरातच्या नावावर पावररप्ले, साई-शुबमनची कडक बॅटिंग
गुजरात टायटन्सच्या शबमन गिल आणि साई सुदर्शन या सलामी जोडीने पावरप्लेमध्ये जबरदस्त सुरुवात केली आहे. या दोघांनी गुजरातसाठी 6 ओव्हरमध्ये बिनबाद 69 धावा जोडल्या. तर दोघांनी 7 ओव्हरपर्यंत गुजरातला 79 धावांपर्यंत पोहचवलं आहे.
-
GT vs RR IPL 2026 Qualifier 2 Live Score Updates : साई-शुबमनचा तडाखा, गुजरातची फायर सुरुवात
साई सुदर्शन आणि कॅप्टन शुबमन गिल या सलामी जोडीने गुजरातला 215 धावांचा पाठलाग करताना जोरदार सुरुवात मिळवून दिली आहे. या दोघांनी गुजरातसाठी पहिल्या 3 ओव्हरमध्ये नॉट आऊट 41 रन्स जोडल्या आहेत. त्यामुळे राजस्थान पहिल्या विकेटच्या शोधात आहे.
-
GT vs RR IPL 2026 Qualifier 2 Live Score Updates : गुजरातच्या बॅटिंगला सुरुवात, शुबमन-साई मैदानात, 215 रन्सचं टार्गेट
गुजरात टायटन्सच्या बॅटिंगला सुुरुवात झाली आहे. गुजरातकडून कॅप्टन शुबमन गिल आणि साई सुदर्शन ही सलामी जोडी मैदानात आली आहे. राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्ससमोर 215 धावांचं आव्हान ठेवलं आहे.
-
GT vs RR IPL 2026 Qualifier 2 Live Score Updates : राजस्थान रॉयल्सचं द्विशतक, गुजरातसमोर 215 रन्सचं टार्गेट, कोण जिंकणार?
राजस्थान रॉयल्सने क्वालिफायर 2 सामन्यात गुजरात टायटन्ससमोर 215 धावांचं आव्हान ठेवलं आहे. राजस्थानने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 214 धावा केल्या. राजस्थानसाठी वैभव सूर्यवंशी याने सर्वाधिक 96 रन्स केल्या. तर आणि डोनोवन फेरेरा याने शेवटच्या ओव्हरमध्ये 4 सिक्ससह 27 रन्स केल्या. डोनोवनने 11 बॉलमध्ये नॉट आऊट 38 रन्स केल्या. त्यामुळे राजस्थानला 200 पार पोहचता आलं. आता कोणता संघ हा सामना जिंकणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
-
GT vs RR IPL 2026 Qualifier 2 Live Score Updates : वैभव सूर्यवंशीचं सलग दुसऱ्यांदा शतक हुकलं, राजस्थानला सहावा झटका
कगिसो रबाडा याने वैभव सूर्यवंशी याच्या विस्फोटक खेळीचा शेवट केला आहे. कगिसोने वैभवला प्रसिध कृष्णा याच्या हाती कॅच आऊट केलं आहे. वैभवने 47 बॉलमध्ये 96 रन्स केल्या. वैभवचं अशाप्रकारे सलग दुसऱ्यांदा शतक हुकलं. वैभवने एलिमिनेटर सामन्यात 97 रन्स केल्या होत्या.
-
GT vs RR IPL 2026 Qualifier 2 Live Score Updates : वैभव सूर्यवंशीने अर्धशतकानंतर गिअर बदलला, राजस्थान द्विशतकाच्या दिशेने
वैभव सूर्यवंशी याने अर्धशतकानंतर गिअर बदलला आहे. वैभवने जेसन होल्डर याने टाकलेल्या डावातील 16 व्या ओव्हरमध्ये 1 सिक्स आणि 2 फोरसह एकूण 16 धावा मिळवल्या. राजस्थानने 16 ओव्हरनंतर 5 विकेट्स गमावून 154 रन्स केल्या आहेत.
-
GT vs RR IPL 2026 Qualifier 2 Live Score Updates : वैभव सूर्यवंशीचं अर्धशतक, राजस्थानला भक्कम भागीदारीची गरज
वैभव सूर्यवंशी याने झुंजार आणि चिवट अर्धशतक झळकावलं आहे. वैभवने 31 बॉलमध्ये हे अर्धशतक पूर्ण केंलं. वैभवने या खेळीत 2 सिक्स आणि 6 फोर लगावले.
-
GT vs RR IPL 2026 Qualifier 2 Live Score Updates : जोफ्रा आर्चर आऊट, राजस्थानला पाचवा झटका
प्रसिध कृष्णा याने फटकेबाजी करण्याच प्रयत्न करणाऱ्या जोफ्रा आर्चर याला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. जोफ्रा आर्चर याने 4 बॉलमध्ये 1 सिक्ससह एकूण 7 धावा केल्या.
-
GT vs RR IPL 2026 Qualifier 2 Live Score Updates : दासून शनाका आऊट, राजस्थानला चौथा धक्का, गुजरात मजबूत स्थितीत
जेसन होल्डर याने राजस्थान रॉयल्सला दुसरा झटका दिला आहे. होल्डरने शनाका याला 3 धावांवर विकेटकीपर जोस बटलर याच्या हाती कॅच आऊट केंल. त्यामुळे राजस्थानचा स्कोअर 11.3 ओव्हरमध्ये 4 आऊट 109 असा झाला आहे.
-
GT vs RR IPL 2026 Qualifier 2 Live Score Updates : साई सुदर्शनकडून वैभव सूर्यवंशीला जीवनदान
साई सुदर्शन याने घोडचूक केली आहे. साईने राजस्थान रॉयल्सचा स्टार आणि युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याला 46 रन्सवर जीवनदान दिलं आहे. आता गुजरातला ही चूक किती महागात पडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
-
GT vs RR IPL 2026 Qualifier 2 Live Score Updates : कॅप्टन रियान परागचं पॅकअप, राजस्थानला तिसरा झटका
जेसन होल्डर याने फटकेबाजी करुन राजस्थानच्या डावाचा गिअर बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्या कॅप्टन रियान पराग याला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. होल्डरने रियानला जोफ्रा आर्चर याच्या हाती कॅच आऊट केलं. रियानने 6 बॉलमध्ये 11 रन्स केल्या.
-
GT vs RR IPL 2026 Qualifier 2 Live Score Updates : रवींद्र जडेजा रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर, कुणाची एन्ट्री?
राजस्थान रॉयल्सचा अनुभवी ऑलराउंडर रवींद्र जडेजा रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर गेला आहे. जडेजाने 19 बॉलमध्ये 34 रन्स केल्या. रवींद्र जडेजा रिटायर्ड हर्ट झाल्यानंतर मैदानात वैभव सूर्यवंशी याची साथ देण्यासाठी कॅप्टन रियान पराग मैदानात आला आहे.
-
GT vs RR IPL 2026 Qualifier 2 Live Score Updates : वैभव सूर्यवंशी-रवींद्र जडेजा जोडी जमली, गुजरात विकेटच्या शोधात
वैभव सूर्यवंशी आणि रवींद्र जडेजा या दोघांनी राजस्थानचा डाव सावरला आहे. दोघेही सेट झाले आहेत. दोघांनी राजस्थानसला 7 ओव्हरनंतर 2 आऊट 76 रन्सपर्यंत पोहचवलं आहे. वैभव 34 आणि जडेजा 29 रन्सवर नॉट आऊट खेळत आहेत.
-
GT vs RR IPL 2026 Qualifier 2 Live Score Updates : वैभव-जडेजा जोडीवर मोठी जबाबदारी, राजस्थानच्या किती धावा?
गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सला झटपट 2 झटके दिले. गुजरातने यशस्वी जैस्वाल आणि ध्रुव जुरेल या दोघांना झटपट आऊट केलं. मात्र त्यानंतर वैभव सूर्यवंशी आणि रवींद्र जडेजा या दोघांनी राजस्थानला 4 ओव्हरनंतर 2 आऊट 45 रन्सपर्यंत पोहचवलं आहे. त्यामुळे या दोघांवर राजस्थानला मोठी भागीदारी करुन देण्याची जबाबदारी असणार आहे. तर गुजरात तिसऱ्या विकेटच्या शोधात आहे.
-
GT vs RR IPL 2026 Qualifier 2 Live Score Updates : ध्रुव जुरेल आऊट, राजस्थानला दुसरा झटका
गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सला दुसरा झटका दिला आहे. कगिसो रबाडा याने आपल्या बॉलिंगवर ध्रुव जुरेल याला कॅप्टन शुबमन गिल याच्या हाती 7 धावांवर कॅच आऊट केलं.
-
GT vs RR IPL 2026 Qualifier 2 Live Score Updates : गुजरातची ‘यशस्वी’ सुरुवात, राजस्थानचा ओपनर आऊट, जैस्वाल 1 रन करुन माघारी
मोहम्मद सिराज याने डावातील पहिल्याच ओव्हरमध्ये राजस्थानला पहिला झटका दिला आहे. सिराजने यशस्वी जैस्वाल याला आऊट केलं आहे. यशस्वी 1 रन करुन आऊट झाला.
-
GT vs RR IPL 2026 Qualifier 2 Live Score Updates : सामन्याला सुरुवात, राजस्थान बॅटिंग, वैभव-यशस्वी सलामी जोडी मैदानात
गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स क्वालिफायर 2 सामन्याला सुरुवात झाली आहे. राजस्थान रॉयल्सने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. राजस्थानकडून यशस्वी जैस्वाल आणि वैभव सूर्यवंशी ही सलामी जोडी मैदानात आली आहे.
-
GT vs RR IPL 2026 Qualifier 2 Live Updates : राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन
राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन : यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल, रियान पराग (कॅप्टन), डोनोवन फरेरा, दासून शनाका, रवींद्र जडेजा, जोफ्रा आर्चर, नांद्रे बर्गर, ब्रिजेश शर्मा आणि यशराज पुंजा.
-
GT vs RR IPL 2026 Qualifier 2 Live Updates : गुजरात टायटन्स प्लेइंग ईलेव्हन
गुजरात टायटन्स प्लेइंग ईलेव्हन : साई सुदर्शन, शुबमन गिल (कॅप्टन), जोस बटलर (विकेटकीपर), निशांत सिंधू, वॉशिंग्टन सुंदर, जेसन होल्डर, राशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, कागिसो रबाडा, प्रसीद कृष्णा आणि मोहम्मद सिराज.
-
GT vs RR IPL 2026 Qualifier 2 Live Updates : राजस्थानने टॉस जिंकला, गुजरात विरुद्ध निर्णय काय?
राजस्थान रॉयल्सने क्वालिफायर 2 सामन्यात टॉस जिंकला आहे. कॅप्टन रियान पराग याने बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता राजस्थान गुजरात टायटन्ससमोर किती धावांचं आव्हान ठेवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
-
GT vs RR IPL 2026 Qualifier 2 Live Updates : गुजरातसमोर राजस्थानचं आव्हान, थोड्याच वेळात टॉस
गुजरात विरुद्ध राजस्थान क्वालिफायर 2 सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी थोड्या वेळात संध्याकाळी 7 वाजता टॉस होणार आहे. राजस्थान आणि गुजरातपैकी कुणाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
-
GT vs RR IPL 2026 Qualifier 2 Live Updates : गुजरात टायटन्स टीम
साई सुदर्शन, शुबमन गिल (कॅप्टन), जोस बटलर (विकेटकीपर), निशांत सिंधू, वॉशिंग्टन सुंदर, जेसन होल्डर, राहुल तेवतिया, राशीद खान, कगिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, कुलवंत खेजरोलिया, ग्लेन फिलिप्स, अनुज रावत, कुमार कुशाग्रा, आर साई किशोर, ल्यूक वुड, कॉनर एस्टरहुइझेन, इशांत शर्मा, जयंत यादव, शाहरुख खान, मानव सुथार, अर्शद खान, गुरनूर ब्रार आणि अशोक शर्मा.
-
GT vs RR IPL 2026 Qualifier 2 Live Updates : राजस्थान रॉयल्स टीम
यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रियान पराग (कॅप्टन), डोनोवन फरेरा, दासून शनाका, रवींद्र जडेजा, जोफ्रा आर्चर, नांद्रे बर्गर, सुशांत मिश्रा, ब्रिजेश शर्मा, यशराज पुंजा, शुभम दुबे, अमन राव पेराला, रवी बिश्नोई, तुषार देशपांडे, ॲडम मिल्ने, शिमरॉन हेटमायर, लुआन-ड्रे प्रिटोरियस, क्वेना माफाका, संदीप शर्मा, कुलदीप सेन, युधवीर सिंग चरक, इमनजोत सिंग चहल आणि विघ्नेश पुथूर.
-
GT vs RR IPL 2026 Qualifier 2 Live Updates : गुजरात विरुद्ध राजस्थान आमनेसामने, कोण पोहचणार फायनलमध्ये?
आयपीएल 2026 स्पर्धेच्या क्वालिफायर 2 सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आमनेसामने आहेत. हा सामना जिंकणारा संघ अंतिम फेरीत पोहचणार आहे. विजयी संघाचा अंतिम फेरीत आरसीबी विरुद्ध सामना होणार आहे. तर पराभूत संघाचा प्रवास इथेच संपणार आहे.
Published On - May 29,2026 6:17 PM
