India vs England, Day 1, Live Score: पंत-जाडेजाचं दमदार प्रदर्शन, दिवसअखेर भारत 7/338

| Updated on: Jul 01, 2022 | 11:41 PM

IND vs ENG 5th Test Match Live Updates: मागच्यावर्षीच्या कसोटी मालिकेत एक सामना बाकी राहिला होता. तो आता खेळला जात आहे. पाच कसोटी सामन्यांच्या या मालिकेत चार सामने झाले आहेत.

India vs England, Day 1, Live Score: पंत-जाडेजाचं दमदार प्रदर्शन, दिवसअखेर भारत 7/338
india vs england

IND vs ENG Test: एजबॅस्टन कसोटीत पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. दिवसअखेर भारताच्या सात बाद 338 धावा झाल्या आहेत. ऋषभ पंत आणि रवींद्र जाडेजा आजच्या दिवसाचे हिरो ठरले. दोघांनी जबरदस्त प्रदर्शन केलं. इंग्लंडच्या भेदक गोलंदाजीचा निडरपणे सामना केला व संघाला अडचणीच्या स्थितीतून बाहेर काढलं. ऋषभ पंत 111 चेंडूत 146 धावा फटकावून आऊट झाला. त्याने 19 चौकार आणि 4 षटकार लगावले. ज्यो रुटच्या गोलंदाजीवर त्याने क्रॉलीकडे झेल दिला. रवींद्र जाडेजा 83 धावांवर नाबाद आहे. त्याने 10 चौकार लगावले. मोहम्म शमी सुद्धा खेळपट्टीवर असून त्याने 11 चेंडू खेळून काढले. पण अजून एकही धाव घेतलेली नाही. विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी आणि शुभमन गिल अपयशी ठरले होते. भारताची टॉप ऑर्डर कोसळली होती. अशा परिस्थिती पंत आणि जाडेजा संकटमोचक ठरले. मागच्यावर्षीच्या कसोटी मालिकेत एक सामना बाकी राहिला होता. तो आता खेळला जात आहे. पाच कसोटी सामन्यांच्या या मालिकेत चार सामने झाले आहेत. भारत या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. 15 वर्षांनी भारताला इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्याची संधी आहे.

Key Events

अशी आहे इंग्लंडची प्लेइंग -11

इंग्लंडचा संघ – जॅक लीच, पॉट्स, सॅम बिलिंग्स, बेन स्टोक्स (कॅप्टन), एलेक्स लीस, जॅक क्रॉले, ऑली पॉप, ज्यो रुट, जॉनी बेयरस्टो, स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अँडरसन

अशी आहे भारताची प्लेइंग -11

भारतीय संघ – जसप्रीत बुमराह (कॅप्टन), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज,

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 01 Jul 2022 11:35 PM (IST)

    पंत-जाडेजाच दमदार प्रदर्शन, दिवसअखेर भारत 7/338

    पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. दिवसअखेर भारताच्या 7 बाद 338 धावा झाल्या आहेत. रवींद्र जाडेजा 83 धावांवर नाबाद आहे. त्याने 10 चौकार लगावले. मोहम्म शमी सुद्धा खेळपट्टीवर असून त्याने 11 चेंडू खेळून काढले. पण अजून एकही धाव घेतलेली नाही.

  • 01 Jul 2022 11:07 PM (IST)

    शार्दुल ठाकूर OUT

    शार्दुल ठाकूर अवघ्या एक रन्सवर बाद झाला. स्टोक्सच्या गोलंदाजीवर त्याने बिलिंग्सकडे झेल दिला. भारताच्या 7 बाद 323 धावा झाल्या आहेत.

  • 01 Jul 2022 11:05 PM (IST)

    ऋषभ पंत अखेर 146 धावांवर आऊट

    आक्रमक फलंदाजी करणारा ऋषभ पंत अखेर 146 धावांवर आऊट झाला. त्याने 111 चेंडूत या धावा केल्या. यात 19 चौकार आणि 4 षटकार आहेत. ज्यो रुटच्या गोलंदाजीवर त्याने क्रॉलीकडे झेल दिला.

  • 01 Jul 2022 10:22 PM (IST)

    ऋषभ पंतची शानदार सेंच्युरी

    ऋषभ पंतने शानदार शतक झळकावल आहे. त्याचवेळी रवींद्र जाडेजानेही हाफ सेंच्युरी पूर्ण केलीय. पंत 94 चेंडूत 107 धावांवर खेळतोय. यात 16 चौकार आणि एक षटकार आहे. रवींद्र जाडेजाच्या 114 चेंडूत 53 धावा झाल्या आहेत. त्याने 7 चौकार लगावले. 59.2 षटकात भारताच्या 258/5 धावा झाल्या आहेत.

  • 01 Jul 2022 09:32 PM (IST)

    पंत-जाडेजामध्ये शतकी भागीदारी

    भारताची धावसंख्या 200 च्या पुढे गेली आहे. रवींद्र जाडेजा आणि ऋषभ पंतमध्ये 130 चेंडूत शतकी भागीदारी झाली आहे.

  • 01 Jul 2022 09:27 PM (IST)

    ऋषभ पंतचा शानदार खेळ

    कठीण परिस्थितीत ऋषभ पंतने आज शानदार खेळ दाखवला. टीम इंडियाचा डाव अडचणीत असताना त्याने अर्धशतक झळकावलं. 66 चेंडूत तो 68 धावांवर खेळतोय. यात 9 चौकार आणि 1 षटकार लगावला. दुसऱ्याबाजूने त्याला रवींद्र जाडेजा साथ देतोय. तो 36 धावांवर खेळतोय. 48 षटकात भारताच्या 193/5 धावा झाल्या आहेत.

  • 01 Jul 2022 08:19 PM (IST)

    ऋषभ पंत-रवींद्र जाडेजाने सावरला डाव

    आता ऋषभ पंत आणि रवींद्र जाडेजाची जोडी मैदानावर आहे. दोघांनी डाव सावरला आहे. पंत 37 चेंडूत 39 आणि रवींद्र जाडेजा 34 चेंडूत 24 धावांवर खेळतोय.. पंतने चार चौकार आणि एक षटकार खेचला आहे. जाडेजाने चार चौकार लगावले आहेत. भारताच्या 150/5 धावा झाल्या आहेत.

  • 01 Jul 2022 07:40 PM (IST)

    भारताचा डाव अडचणीत

    भारताचा डाव अडचणीत सापडला आहे. निम्म संघ तंबूत परतला आहे. श्रेयस अय्यर 15 धावांवर आऊट झाला. अँडरसनने त्याला विकेटकीपर बिलिंग्सकरवी झेलबाद केलं. भारताच्या आता 31 षटकात 107/5 धावा झाल्या आहेत.

  • 01 Jul 2022 07:18 PM (IST)

    विराट कोहली पुन्हा फेल, स्वस्तात बाद

    विराट कोहली पुन्हा एकदा अपयशी ठरला आहे. पॉट्सने त्याला क्लीन बोल्ड केलं. 19 चेंडूत त्याने 11 धावा केल्या. यात दोन चौकार होते. 27 षटकात भारताच्या चार बाद 89 धावा झाल्या आहेत.

  • 01 Jul 2022 07:15 PM (IST)

    शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर Live

    अनेक योजनांबाबत आज चर्चा झाली आहे. त्यात ओबीसी आरक्षण, आत्महत्यामुक्त महाराष्ट्र अशा अनेक मुद्द्यांचा समावेश आहे. शेतकऱ्याच्या मुलाने ही सर्वात मोठी घोषणा केली आहे.

  • 01 Jul 2022 06:56 PM (IST)

    भारताची तिसरी विकेट

    पावसानंतर सामन्याला सुरुवात होताच हनुमा विहारीच्या रुपाने भारताला तिसरा झटका बसला. विहारीला पॉट्सने 20 धावांवर पायचीत पकडलं. 22.2 षटकात भारताच्या 64/3 अशी स्थिती आहे.

  • 01 Jul 2022 06:48 PM (IST)

    सामन्याला सुरुवात

    पावसामुळे थांबलेला खेळ पुन्हा सुरु झाला. 21 षटकात भारताच्या दोन बाद 57 धावा झाल्या आहेत. हनुमा विहारी 14 आणि विराट कोहली 5 धावांवर खेळतोय.

  • 01 Jul 2022 06:25 PM (IST)

    आपत्ती विषयक व्यवस्थापनाचा आढावा घेणारी बैठक सुरू

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात राज्यातील आपत्ती विषयक व्यवस्थापनाचा आढावा घेणारी बैठक सुरू आहे. या बैठकीला मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव तसेच विविध विभागांचे सचिव तसेच हवामान विभाग, रेल्वे, बेस्ट, पालिका, लष्कराच्या तीनही दलाचे अधिकारी, जेएनपीटी आदींची उपस्थिती आहे.

  • 01 Jul 2022 06:21 PM (IST)

    6.30 वाजता होणार खेळपट्टीची पाहणी

    पंच 6.30 वाजता खेळपट्टीची पाहणी करुन सामना कधी सुरु करायचा त्या बद्दल निर्णय घेतील.

  • 01 Jul 2022 05:04 PM (IST)

    पावसामुळे लंचची घोषणा

    पावसामुळे पंचांनी लंचचा निर्णय घेतला आहे. भारताने चांगली सुरुवात केली होती. शुभमन गिल (17) आणि चेतेश्वर पुजारा (13) धावांवर आऊट झाला. या दोघांना अँडरसननेच बाद केलं. लंचला भारताचा स्कोर 53/2 आहे. हनुमा विहारी 14 आणि विराट कोहली 1 रन्सवर खेळतोय.

  • 01 Jul 2022 04:30 PM (IST)

    जेम्स अँडरसनचा भेदक मारा, भारताला दुसरा धक्का

    चेतेश्वर पुजाराच्या रुपाने भारताची दुसरी विकेट गेली आहे. जेम्स अँडरनच्या गोलंदाजीवर त्याने स्लीप मध्ये जॅक क्रॉलेकडे झेल दिला. पुजाराने 46 चेंडूत दोन चौकारांसह 13 धावा केल्या. 18.2 षटकात भारताच्या दोन बाद 46 धावा झाल्या आहेत.

  • 01 Jul 2022 04:16 PM (IST)

    15 षटकांचा खेळ पूर्ण

    15 षटकात भारताच्या एक बाद 43 धावा झाल्या आहेत. चेतेश्वर पुजारा 39 चेंडूत 13 धावांवर आणि हनुमा विहारी 29 चेंडूत 6 धावांवर खेळतोय. पुजाराने आतापर्यंत दोन चौकार लगावले आहेत.

  • 01 Jul 2022 04:01 PM (IST)

    चेतेश्वर पुजारा-हनुमा विहारी मैदानात

    13 षटकात भारताच्या एक बाद 38 धावा झाल्या आहेत. चेतेश्वर पुजारा 33 चेंडूत 9 आणि हनुमा विहारी 22 चेंडूत 5 धावांवर खेळतोय.

  • 01 Jul 2022 03:40 PM (IST)

    भारताला पहिला धक्का, शुभमन गिल बाद

    शुभमन गिलच्या रुपाने भारताला पहिला धक्का बसला आहे. जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर त्याने जॅक क्रॉलेकडे झेल देऊन पॅव्हॅलियनची वाट धरली. शुभमन गिलने 24 चेंडूत 17 धावा केल्या. या खेळीत त्याने चार चौकार लगावले. भारताची धावसंख्या आता 8.2 षटकात एक बाद 31 आहे.

  • 01 Jul 2022 03:23 PM (IST)

    भारताची सावध सुरुवात

    पाच षटकात भारताच्या बिनबाद 18 धावा झाल्या आहेत. शुभमन गिल 9 आणि चेतेश्वर पुजारा 4 धावांवर खेळतोय.

  • 01 Jul 2022 03:05 PM (IST)

    पहिल्या षटकात चौकार

    भारत आणि इंग्लंडमध्ये कसोटी सामना सुरु झाला आहे. जेम्स अँडरसनने पहिलं षटक टाकलं. भारताच्या बिनबाद 4 धावा झाल्या आहेत. शुभमन गिलने षटकातील अखेरच्या चेंडूवर चौकार मारला. रोहितच्या जागी पर्यायी सलामीवीर म्हमून मयंक अग्रवालचा संघात समावेश केला. पण त्याला आजच्या सामन्यात संधी मिळालेली नाही. शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजारा ही सलामीची जोडी मैदानात उतरतली आहे.

  • 01 Jul 2022 03:01 PM (IST)

    भाजप नेते आशिष शेलार Live

    अमित शाह यांच्या गोष्टीवर उद्धव ठाकरेंनी भरोसा ठेवला असता तर हे दिवस आले नसते. मात्र शिवसेनेचा गद्दारी हा स्वभाव आहे. अशी प्रतिक्रिया आशिष शेलार यांनी दिला आहे.

  • 01 Jul 2022 02:54 PM (IST)

    अशी आहे भारताची प्लेइंग -11

    भारतीय संघ - जसप्रीत बुमराह (कॅप्टन), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज,

  • 01 Jul 2022 02:51 PM (IST)

    अशी आहे इंग्लंडची प्लेइंग -11

    इंग्लंडचा संघ – जॅक लीच, पॉट्स, सॅम बिलिंग्स, बेन स्टोक्स (कॅप्टन), एलेक्स लीस, जॅक क्रॉले, ऑली पॉप, ज्यो रुट, जॉनी बेयरस्टो, स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अँडरसन

  • 01 Jul 2022 02:49 PM (IST)

    इंग्लंडने टॉस जिंकला

    इंग्लंडचा कॅप्टन बेन स्टोक्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे.

Published On - Jul 01,2022 2:48 PM

Follow us
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.