IND vs SA Womens WC Score and Highlights : नॅडिन डी क्लार्कने भारताच्या तोंडातील घास हिसकावला, अफ्रिकेचा 3 विकेट्सने विजय
India Women vs South Africa Women, World Cup 2025 Score and Highlights Updates: भारताला वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या पहिल्या पराभवाला समोरं जावं लागलं आहे. ऋचा घोषने केलेल्या खेळीमुळे भारताने 251 धावांपर्यंत मजल मारली. पण भारतीय गोलंदाजांना हे आव्हान रोखता आलं नाही.

भारताने दक्षिण अफ्रिकेला विजयासाठी 252 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान दक्षिण अफ्रिकेने 48.5 षटकात 7 गडी गमवून पूर्ण केलं. नॅडिन डी क्लार्क या विजयाची शिल्पकार ठरली. आठव्या स्थानावर तिने अफलातून फलंदाजी केली. तिने 54 चेंडूत 8 चौकार आणि 5 षटकार मारत नाबाद 84 धावांची खेळी केली. तिच्या खेळीमुळे भारताचा पराभव निश्चित झाला. आता भारताचा पुढचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.
LIVE Cricket Score & Updates
-
IND vs SA Womens WC Live Score Updates : नॅडिन डी क्लार्कने भारताच्या आशेवर टाकलं पाणी, अफ्रिकेचा 3 विकेटने विजय
भारताला वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील पहिल्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. दक्षिण अफ्रिकेने भारताला 3 गडी राखून पराभूत केलं. खरं तर एक वेळ अशी होती की हा सामना भारत सहज जिंकेल. पण डी क्लार्कने अफलातून फलंदाजी केली. तिच्या आक्रमक खेळीपुढे भारतीय गोलंदाज हतबल दिसले. अखेर हा सामना भारताने गमावला. प्रत्येक पराभव हा उपांत्य फेरीचं गणित बिघडवणारा ठरणार आहे. त्यामुळे सुरुवातीच्या सामन्यातच विजय मिळवणं खूप गरजेचं आहे. आता भारताचे एकूण चार सामने शिल्लक असून त्यापैकी तीन सामन्यात विजय मिळवणं आवश्यक आहे. आता भारताचा पुढचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.
-
IND vs SA Womens WC Live Score Updates : क्लो ट्रायॉन बाद
मोक्याच्या क्षमी क्लो ट्रायॉनची विकेट टीम इंडियाला मिळाली आहे. प्रत्येक चेंडूनंतर सामना फिरताना दिसत आहे. असं असताना सेट असलेली क्लो ट्रॉयॉनची विकेट मिळाली. त्यामुळे भारताच्या विजयाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. दक्षिण अफ्रिकेला 4 षटकात 41 धावांची गरज आहे. तर भारतासाठी 3 विकेट आणि धावगती रोखणं महत्त्वाचं आहे.
-
-
IND vs SA Womens WC Live Score Updates : क्लो ट्रायॉन आणि नॅडिन डी क्लार्क ही जोडी जमली असून भारतीय गोलंदाजांसमोर आव्हान निर्माण केलं आहे. धावांचं अंतर थोडं जास्त असलं तरी ही जोडी फोडणं आवश्यक आहे.
क्लो ट्रायॉन आणि नॅडिन डी क्लार्क ही जोडी जमली असून भारतीय गोलंदाजांसमोर आव्हान निर्माण केलं आहे. धावांचं अंतर थोडं जास्त असलं तरी ही जोडी फोडणं आवश्यक आहे. 6 षटकात आता 60 धावांची गरज आहे. प्रत्येक षटकात 10 धावांचं गणित आहे.
-
IND vs SA Womens WC Live Score Updates : दक्षिण अफ्रिकेला 10 षटकात 81 धावांच गरज
दक्षिण अफ्रिकेला 10 षटकात 81 धावांची गरज आहे. तसेच भारताला विजयासाठी 4 विकेट काढव्या लागणार आहे. त्यामुळे आता सामन्यातक कोण बाजी मारतो याकडे लक्ष लागून आहे. क्लो ट्रायन भारतासाठी डोकेदुखी ठरत आहे. तिची विकेट काढणं खूप आवश्यक आहे.
-
IND vs SA Womens WC Live Score Updates : क्रांती गौडची कमाल, अखेर डोकेदुखी ठरलेल्या लॉराला पाठवलं तंबूत
भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरलेल्या कर्णदार लॉरा वोल्वार्डची विकेट काढण्यात अखेर क्रांती गौडला यश आलं आहे. तिने 111 चेंडूत 70 धावांची खेळी केली. पण क्रांती गौडचा चेंडू कळलाच नाही आणि स्टंप घेऊन गेला.
-
-
IND vs SA Womens WC Live Score Updates : दक्षिण आफ्रिकेची जोडी जमली, सहाव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी, सामना रंगतदार स्थितीत
दक्षिण आफ्रिकेने सहाव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली आहे. कॅप्टन लॉरा वोल्वार्ड्ट आणि क्लो ट्रायॉन या जोडीने नाबाद अर्धशतकी भागीदारी केली आहे. दक्षिण आफ्रिकेने यासह सामन्यात कमबॅक केलं आहे. भारताला हा सामना जिंकायचा असेल तर या जोडीला लवकरात लवकर फोडावं लागणार आहे.
-
IND vs SA Womens WC Live Score Updates : लॉरा वोल्वार्ड्टचं अर्धशतक, दक्षिण आफ्रिका 100 पार
दक्षण आफ्रिकेची कॅप्टन लॉरा वोल्वार्ड्ट हीने अर्धशतक पूर्ण केलं. लॉराच्या या अर्धशतकानंतर विंडीजच्या 100 धावाही पूर्ण झाल्या. लॉराच्या या खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेने 30 ओव्हरनंतर 5 विकेट्स गमावून 113 रन्स केल्या आहेत. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 120 बॉलमध्ये आणखी 139 धावांची गरज आहे.
-
IND vs SA Womens WC Live Score Updates : दक्षिण आफ्रिकेला पाचवा झटका, अर्धा संघ तंबूत, भारताची सामन्यावर घट्ट पकड
टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला पाचवा झटका दिला आहे. श्री चऱणी हीने दक्षिण आफ्रिकेची विकेटकीपर बॅट्समन सिनालो जाफ्ता हीला एलबीडब्ल्यू आऊट केलं. सिनालोने 20 बॉलमध्ये 14 रन्स केल्या.
-
IND vs SA Womens WC Live Score Updates : दक्षिण आफ्रिकेला झटपट 2 झटके, टीम इंडिया मजबूत स्थितीत
टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला झटपट 2 झटके दिले आहेत. त्यामुळे दक्षिण आफ्रिका पूर्णपणे बॅकफुटवर गेली आहे. स्नेह राणा हीने मारिजान काप हीला 14 व्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर 20 रन्सवर बोल्ड केलं. त्यानंतर 15 व्या ओव्हरमधील पहिल्याच बॉलवर दीप्ती शर्मा हीने अँनेके बॉश हीला आपल्याच बॉलिंगवर कॅच आऊट केलं. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला स्कोअर हा 4 आऊट 58 असा झाला आहे.
-
IND vs SA Womens WC Live Score Updates : दक्षिण आफ्रिकेच्या 50 धावा पूर्ण, टीम इंडिया तिसऱ्या विकेट्सच्या शोधात
दक्षिण आफ्रिकेने 252 धावांचा पाठलाग करताना12 ओव्हरनंतर 2 विकेट्स गमावून अर्धशतक पूर्ण केलं आहे. दक्षिण आफ्रिकेकडून कॅप्टन लॉरा वोल्वार्ड्ट आणि मारीजान काप ही जोडी खेळत आहेत. लॉरा 28 आणि मारिजान 14 धावांवर नाबाद आहे. त्यामुळे टीम इंडियाचा ही जोडी फोडण्याचा प्रयत्न सुरु आहे.
-
IND vs SA Womens WC Live Score Updates : दक्षिण आफ्रिकेला पावरप्लेमध्ये दुसरा झटका, भारताची कडक सुरुवात
टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला पावरप्लेमध्ये दुसरा झटका दिला आहे. क्रांती गौड हीच्यानंतर अमनजोत कौर हीने वैयक्तिक पहिली विकेट मिळवली. कौरने सुने लुस हीला विकेटकीपर रिचा घोष हीच्या हाती कॅच आऊट केलं.
-
IND vs SA Womens WC Live Score Updates : क्रांती गौडचा धमाका, दक्षिण आफ्रिकेला तिसऱ्या ओव्हरमध्ये पहिला झटका
क्रांती गौड हीने तिच्या दुसऱ्या आणि डावाील तिसऱ्या ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर दक्षिण आफ्रिकेला पहिला झटका देत भारताला कडक सुरुवात करुन दिली आहे. क्रांतीने आपल्याच बॉलिंगवर ताझिमन ब्रिट्स हीचा कॅच घेतला. ताझिमनला भोपळाही फोडता आला नाही.
-
IND vs SA Womens WC Live Score Updates : दक्षिण आफ्रिकेच्या बॅटिंगला सुरुवात, विजयासाठी 252 धावांचं आव्हान
दक्षिण आफ्रिकेच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर 252 धावांचं आव्हान ठेवलं आहे. दक्षिण आफ्रिकेकडून ताझमिन ब्रिट्सन आणि कॅप्टन लॉरा वोल्वार्ड्ट ही सलामी जोडी मैदानात आली आहे.
-
IND vs SA Womens WC Live Score Updates : टीम इंडिया ऑलआऊट, दक्षिण आफ्रिकेसमोर 252 धावांचं आव्हान
टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेसमोर 50 ओव्हरमध्ये 252 रन्सचं टार्गेट ठेवलं आहे. टीम इंडियाने 49.5 ओव्हरमध्ये ऑलआऊट 251 रन्स केल्या. टीम इंडियासाठी रिचा घोष हीने सर्वाधिक 94 रन्स केल्या. तर स्नेह राणा हीने 33 धावांचं योगदान दिलं. मिडल ऑर्डरने निराशा केली. तर टॉप ऑर्डरला मोठी खेळी करता आली नाही. मात्र त्यानतंरही भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर 252 धावांचं सन्मानजनक आव्हान ठेवलं आहे.
-
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदाराच्या गाडीवर दगडफेक
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदाराच्या गाडीवर दगडफेक
आमदार इद्रिस नायकवडी यांच्या वाहनावर आज्ञातंकडून करण्यात आली दगडफेक
मिरज तालुक्यातील जानराववाडी-बेळंकीदरम्यान घडला प्रकार
दुचाकीवरून तोंडाला रुमाल बांधून आलेल्या, दोघांकडून करण्यात आली दगडफेक
घटनास्थळी मिरज ग्रामीण पोलीस दाखल
-
IND vs SA Womens WC Live Score Updates : रिचाने गिअर बदलला, टीम इंडियाच्या 47 ओव्हरनंतर 222 धावा, विकेटकीपर शतक करणार का?
टीम इंडियाची विकेटकीपर बॅट्समन रिचा घोष हीने अर्धशतक ठोकल्यानंतर अखेरच्या काही षटकांमध्ये गिअर बदलला आहे. रिचाने अर्धशतकानंतर चौकार आणि षटकार ठोकत जोरदार फटकेबादी केली. त्यामुळे टीम इंडियाच्या 47 ओव्हरनंतर 222 धावा झाल्या आहेत. त्यामुळे आता रिचा शतक करणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
-
IND vs SA Womens WC Live Score Updates : टीम इंडियाच्या 200 धावा पूर्ण, 26 बॉलमध्ये किती रन्स करणार?
टीम इंडियाने 45.4 ओव्हरमध्ये 201 धावा पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे आता टीम इंडिया उर्वरित 26 बॉलमध्ये किती धावा जोडणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
-
IND vs SA Womens WC Live Score Updates : रिचा घोषचं झुंजार अर्धशतक, टीम इंडिया 200 च्या उंबरठ्यावर
टीम इंडियाची विकेटकीपर बॅट्समन रिचा घोष हीने पुन्हा एकदा भारतासाठी झुंजार खेळी केली आहे. रिचाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडिया अडचणीत असताना अर्धशतक ठोकलं आहे. रिचाच्या अर्धशतकी खेळीमुळे भारताचा स्कोअर 44 ओव्हरनंतर 7 आऊट 190 असा झाला आहे.
-
IND vs SA Womens WC Live Score Updates : भारताला सातवा झटका, अमनजोत कौर आऊट
दक्षिण आफ्रिकेने भारताला सातवा झटका देत सेट होऊ पाहणारी अमनजोत कौर आणि रिचा घोष ही जोडी फोडली आहे. अमनजोतने 44 बॉलमध्ये 13 रन्स केल्या.
-
IND vs SA Womens WC Live Score Updates : रिचा-अमनजोतने टीम इंडियाला सावरलं, भारताला मोठ्या भागीदारीची गरज
टीम इंडियाने चांगल्या सुरुवातीनंतर झटपट 6 विकेट्स गमावल्या. त्यामुळे टीम इंडियाची स्थिती 102 धावांवर 6 आऊट अशी झाली होती. मात्र त्यानंतर आता रिचा घोष आणि अमनजोत कौर या जोडीने भारताचा डाव सावरला आहे. भारताला मोठी धावसंख्या उभायरायची असेल तर या जोडीने जास्तीत जास्त वेळ मैदानात राहणं गरजेचं आहे.
-
IND vs SA Womens WC Live Score Updates : टीम इंडियाला सहावा धक्का, दीप्ती शर्मा आऊट
दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाला सहावा झटका देत पूर्णपणे बॅकफुटवर ढकलंल आहे. मारिजान काप हीने भारताला 26 व्या ओव्हरमधील शेवटच्या बॉलवर सहावा झटका दिला. कापने दीप्ती शर्मा हीला 4 रन्सवर कॅच आऊट केलं.
-
IND vs SA Womens WC Live Score Updates : टीम इंडियाला पाचवा झटका, कॅप्टन हरमनप्रीत कौर आऊट
दक्षिण आफ्रिकेने भारताला पाचवा आणि मोठा झटका दिला आहे. दक्षिण आफ्रिकेने कॅप्टन हरमनप्रीत कौर हीला आऊट केलं आहे. हरमनप्रीतने 24 बॉलमध्ये 9 रन्स केल्या. त्यामुळे भारताचा स्कोअर हा 24.2 ओव्हरनंतर 5 आऊट 100 असा झाला आहे.
-
IND vs SA Womens WC Live Score Updates : 9 धावात 3 झटके, टीम इंडिया बॅकफुटवर, दक्षिण आफ्रिकेचं कमबॅक
दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाला 9 धावांच्या मोबदल्यात 3 झटके देत बॅकफुटवर फेकलं आहे. दक्षिण आफ्रिकेने हर्लीन देओल, प्रतिका रावल आणि जेमीमाह रॉड्रिग्स या तिघींना 9 धावांच्या मोबदल्यात आऊट केलं. त्यामुळे आता टीम इंडिया अडचणीत सापडली आहे. टीम इंडियाचा स्कोअर 20.4 ओव्हरनंतर 4 आऊट 92 असा झाला आहे.
-
IND vs SA Womens WC Live Updates : टीम इंडियाला तिसरा झटका, प्रतिका रावल माघारी, महिला ब्रिगेड अडचणीत
अर्धशतकी सलामी भागीदारीनंतर टीम इंडियाची घसरगुंडी झाली आहे. दक्षिण आफ्रिकेने भारताला झटपट 3 झटके दिले आहेत. स्मृती मंधाना, हर्लिन देओल हीच्यांनतर आता भारताने प्रतिका रावल हीची विकेट गमावली आहे. प्रतिका रावल हीने 56 बॉलमध्ये 37 रन्स केल्या आहेत.
-
IND vs SA Womens WC Live Updates : टीम इंडियाला दुसरा झटका, हर्लीन देओल क्लिन बोल्ड
टीम इंडियाने दुसरी विकेटगमावली आहे. नॉनकुलुलेको म्लाबा हीने स्मृती मंधाना हीच्यानंतर हर्लीन देओल हीला आऊट केलं. हर्लीन क्लिन बोल्ड झाली. हर्लीनने 23 बॉलमध्ये 13 रन्स केल्या.
-
IND vs SA Womens WC Live Updates : भारताला पहिला झटका, स्मृती मंधाना आऊट
दक्षिण आफ्रिकेने स्मृती मंधाना-प्रतिका रावल ही सेट सलामी जोडी फोडली आहे. दक्षिण आफ्रिकेने भारताला 11 व्या ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर पहिला झटका दिला. नॉनकुलुलेको म्लाबा हीने स्मृती मंधानाला सुने लुस हीच्या हाती कॅच आऊट केलं. स्मृतीने 32 बॉलमध्ये 23 रन्स केल्या.
-
IND vs SA Womens WC Live Updates : टीम इंडियाच्या सलामी जोडीची अर्धशतकी भागीदारी, 10 ओव्हरनंतर 55 रन्स
प्रतिका रावल आणि स्मृती मंधाना या सलामी जोडीला पहिल्या 2 सामन्यात भारताला चांगली सुरुवात करुन देता आली नाही. मात्र या दोघींनी ती उणीव तिसऱ्या सामन्यात भरुन काढली आहे. या सलामी जोडीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अर्धशतकी भागीदारी केली आहे. स्मृतीने डावाील 10 व्या ओव्हरमधील पहिल्या बॉलवर फोर लगावला. यासह सलामी जोडीची अर्धशतकी भागीदारी पूर्ण झाली. भारताने 10 ओव्हरनंतर बिनबाद 55 धावा केल्या आहेत.
-
IND vs SA Womens WC Live Updates : टीम इंडियाची संयमी सुरुवात, 5 ओव्हरनंतर 32 धावा
प्रतिका रावल आणि स्मृती मंधाना टीम इंडियाच्या या सलामी जोडीने संयमी सुरुवात केली आहे. भारताच्या या जोडीने पहिल्या 5 ओव्हरमध्ये बिनबाद 32 धावा केल्या आहेत. प्रतिका 25 आणि स्मृती 3 धावांवर नाबाद खेळत आहेत.
-
IND vs SA Womens WC Live Updates : सामन्याला सुरुवात, टीम इंडियाची बॅटिंग, प्रतिका-स्मृती मैदानात
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याला अखेर 1 तासाच्या विलंबाने सुरुवात झाली आहे. दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून भारताला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. भारताकडून प्रतिका रावल आणि स्मृती मंधाना ही सलामी जोडी मैदानात आली आहे.
-
विजेच्या तारांमुळे ऊस जळाल्याने नुकसान भरपाईची मागणी
जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातील वडीकाळ्या गावालगत असलेल्या शेत शिवारातील ऊसाला आग लागल्याची घटना घडली.शेतातून गेलेल्या विजेच्या तारांचा एकमेकांना स्पर्श झाल्याने ही आग लागली असून यामध्ये या गावातील दोन शेतकऱ्यांचे जवळपास सात ते आठ एकर वरील उसाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
-
IND vs SA Womens WC Live Updates : वुमन्स दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन
वुमन्स दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन : लॉरा वोल्वार्ड (कॅप्टन), तझमिन ब्रिट्स, सुने लुस, मारिझान कॅप, अनेके बॉश, सिनालो जाफ्ता (विकेटकीपर), क्लो ट्रायॉन, नादिन डी क्लर्क, अयाबोंगा खाका, तुमी सेखुखुने आणि नॉनकुलुलेको मलाबा.
-
IND vs SA Womens WC Live Updates : वूमन्स टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन
वूमन्स टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : प्रतिका रावल, स्मृती मांधना, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कॅप्टन), जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, रिचा घोष (विकेटकीपर), स्नेह राणा, अमनजोत कौर, क्रांती गौड आणि श्री चरणी.
-
IND vs SA Womens WC Live Updates : दक्षिण आफ्रिकेचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय
दक्षिण आफ्रिकेने टीम इंडिया विरुद्ध टॉस जिंकला आहे. दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्ड्ट हीने फिल्डिंगचा निर्णय घेत टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.
-
IND vs SA Womens WC Live Updates : चाललंय काय? टॉसला पुन्हा विलंब, नाणेफेक किती वाजता होणार?
टॉसला पुन्हा एकदा विलंब झाला आहे. आता 3 वाजता होणारा टॉस थेट 3 वाजून 30 मिनिटांनी करण्यात येणार आहे. तर 4 वाजता सामन्याला सुरुवात होणार असल्याची माहिती देणयात आली आहे. मात्र त्यानंतरही एकही ओव्हर कमी करण्यात आलेली नाही.
-
IND vs SA Womens WC Live Updates : सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
पाऊस आणि ओल्या खेळपट्टीमुळे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याला तब्बल 45 मिनिटांच्या विलंबाने सुरुवात होणार आहे. सामन्याला सुधारित वेळेनुसार दुपारी 3 वाजून 45 मिनिटांनी सुुरुवात होणार आहे.
-
IND vs SA Womens WC Live Updates : पावसामुळे टॉसला विलंब, पुढील पाहणी किती वाजता?
पाऊस आणि ओल्या खेळपट्टीमुळे टॉसला विलंब झाला आहे. आता पंच दुपारी 3 वाजून 10 मिनिटांनी खेळपट्टीची पाहणी करुन पुढील निर्णय घेणार आहेत. त्यामुळे आता पाहणीनंतर चाहत्यांना दिलासादायक बातमी मिळते की आणखी वेळ प्रतिक्षाल करावी लागणार? हे काही मिनिटांतच स्पष्ट होईल.
-
IND vs SA Womens WC Live Updates : पावसामुळे टॉसला विलंब, क्रिकेट चाहत्यांची निराशा
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याला 3 वाजता सुरुवात तर 2 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणं अपेक्षित होतं. मात्र आता तसं होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. विशाखापट्टणममध्ये जोरदार पाऊस झाला. त्यामुळे मैदान कव्हरने झाकण्यात आलं आहे. त्यामुळे जोवर खेळपट्टी कोरडी होत नाही तोवर टॉस होणार नाही. त्यामुळे आता चाहत्यांना किमान 20-30 मिनिटं प्रतिक्षा करावी लागणार आहे.
-
IND vs SA Womens WC Live Updates : थोड्याच मिनिटांत टॉस, कोण जिंकणार?
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याला दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे. तर त्याआधी 2 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. टॉस कोण जिंकणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
-
IND vs SA Womens WC Live Updates : सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तसेच जिओहॉटस्टार एपद्वारे मोबाईलवर लाईव्ह पाहता येईल.
-
IND vs SA Womens WC Live Updates : भारताची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन, 1 बदल होण्याची दाट शक्यता
वूमन्स टीम इंडियात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये 1 बदल होऊ शकतो. अमनजोत कौर आजारानंतर कमबॅकसाठी सज्ज आहे. अमनजोतच्या कमबॅकमुळे रेणुका सिंह ठाकुर हीला बाहेर व्हावं लागू शकतं. अमनजोतला आजारामुळे पाकिस्तान विरूद्धच्या सामन्याला मुकावं लागलं होतं.
टीम इंडियाची संभाव्य प्लेंग ईलेव्हन : स्मृती मंधाना, प्रतीका रावल, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कॅप्टन), जेमिमा रॉड्रिग्ज, ऋचा घोष, दीप्ती शर्मा, अमनजोत कौर, स्नेह राणा, श्री चरणी आणि क्रांती गौड.
-
IND vs SA Womens WC Live Updates : दक्षिण आफ्रिका वूमन्स टीम
दक्षिण आफ्रिका वूमन्स टीम : लॉरा वोल्वार्ड (कॅप्टन), तझमिन ब्रिट्स, सुने लुस, मारिझान कॅप, अनेके बॉश, सिनालो जाफ्ता (विकेटकीपर), क्लो ट्रायॉन, नादिन डी क्लर्क, मसाबता क्लास, अयाबोंगा खाका, नॉनकुलुलेको मलाबा, तुमी सेखुखुने, नॉन्डुमिसो शांगासे, काराबो मेसो आणि ॲनेरी डेर्कसेन.
-
IND vs SA Womens WC Live Updates : भारतीय महिला संघ
भारतीय महिला संघ : प्रतिका रावल, स्मृती मानधना, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कॅप्टन), जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, रिचा घोष (विकेटकीपर), श्री चरणी, क्रांती गौड, रेणुका सिंग ठाकूर, अमनजोत कौर, उमा चेत्री, अरुंधती रेड्डी आणि राधा यादव.
-
IND vs SA Womens WC Live Updates : सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याला दुपारी 3 वाजता सुरुवात होईल. तर 2 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. दोन्ही संघांचा या मोहिमेतील आपला तिसरा सामना आहे. भारतीय संघ अजिंक्य आहे. तर दक्षिण आफ्रिकेने 1 सामना जिंकला आहे. तर शेवटच्या सामन्यात पहिला विजय मिळवला आहे.
-
IND vs SA Womens WC Live Updates : टीम इंडिया विजयी हॅटट्रिकसाठी सज्ज
हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात भारतीय संघाने आतापर्यंत खेळललेल्या दोन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. भारताने श्रीलंका आणि पाकिस्तानला पराभूत केलंय. आता टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत विजयी हॅटट्रिक करण्यासाठी सज्ज झाली आहे. तसेच दक्षिण आफ्रिका दुसरा विजय मिळवत भारताचा विजय रथ रोखणार का? याकडेही क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.
Published On - Oct 09,2025 1:36 PM
