LSG vs PBKS Highlight Score, IPL 2025 : पंजाब किंग्सने लखनौ सुपर जायंट्सला 8 गडी राखून केलं पराभूत, प्रभसिमरन सिंगचा झंझावात
Lucknow Super Giants vs Punjab Kings Highlight Score in marathi: आयपीएल 2025 स्पर्धेत पंजाब किंग्सची विजयी घोडदौड सुरु आहे. मागच्या पर्वात पंजाब किंग्सची स्थिती एकदम वाईट होती. पण या पर्वात पहिल्या टप्प्यात पंजाब किंग्सची चांगली सुरुवात झाली आहे. गुजरात जायंट्सनंतर लखनौ सुपर जायंट्सला पराभूत केलं आहे.

एकाना स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध आणि पंजाब किंग्ज यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात पंजाब किंग्सने विजयी घोडदौड कायम ठेवली. लखनौ सुपर जायंट्सला त्याच्या होमग्राउंडवर पराभूत केलं. लखनौ सुपर जायंट्सने विजयासाठी 172 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान पंजाब किंग्सने 8 गडी आणि 22 चेंडू राखून पूर्ण केलं. त्यामुळे पंजाब किंग्सला जबरदस्त फायदा झाला आहे. या विजयासह पंजाब किंग्सने गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. पंजाब किंग्सने 2 सामन्यात विजय मिळवला आणि 4 गुणांसह +1.485 नेट रनरेट आहे. या सामन्यात 27 कोटी रुपये मानधन मिळालेला ऋषभ पंत फेल गेला.
LIVE NEWS & UPDATES
-
LSG vs PBKS Live Score, IPL 2025 : पंजाब किंग्सने लखनौ सुपर जायंट्सला 8 गडी राखून केलं पराभूत, प्रभसिमरन सिंगचा झंझावात
आयपीएल 2025 स्पर्धेच्या 13 व्या सामन्यात पंजाब किंग्सने लखनौ सुपर जायंट्सचा 8 गडी राखून पराभव केला. लखनौ सुपर जायंट्सने विजयासाठी 172 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान फक्त 2 गडी गमवून पूर्ण केलं. या विजयासह पंजाब किंग्सला गुणतालिकेत जबरदस्त फायदा झाला आहे.
-
LSG vs PBKS Live Score, IPL 2025 : पंजाब किंग्सला दुसरा धक्का, प्रभसिमरन 69 धावा करून बाद
पंजाब किंग्सला प्रभसिमरनच्या रुपाने दुसरा धक्का बसला आहे. 69 धावा करून बाद झाला.
-
-
LSG vs PBKS Live Score, IPL 2025 : पंजाब किंग्सच्या 10 षटकात 1 गडी बाद 110 धावा
पंजाब किंग्सने 10 षटकात 1 गडी गमवून 110 धावा केल्या आहेत. विजयासाठी 60 चेंडूत 62 धावांची गरज आहे.
-
LSG vs PBKS Live Score, IPL 2025 : पंजाब किंग्सकडून प्रभसिमरनचा झंझावात, 23 चेंडूत अर्धशतक
पंजाब किंग्सच्या प्रभसिमरन सिंगने 23 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. यावेळी त्याने 6 चौकार आणि तीन षटकार मारले.
-
LSG vs PBKS Live Score, IPL 2025 : प्रभसिमरन सिंगचा आक्रमक पवित्रा
पंजाब किंग्सकडून प्रभसिमरन सिंगने आक्रमक पवित्रा घेतला आहे. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलत आहे. चेंडू आणि धावांमधील अंतर कमी करण्याचा प्रयत्न सुरु आहे.
-
-
LSG vs PBKS Live Score, IPL 2025 : पंजाब किंग्सला पहिला धक्का, प्रियांश आर्य बाद
पंजाब किंग्सला प्रियांश आर्यच्या रुपाने पहिला धक्का बसला आहे. 8 धावांवर असताना दिग्वेश राठीने त्याला तंबूचा रस्ता दाखवला.
-
लखनौ सुपर जायंट्सने पंजाबसमोर ठेवलं 172 धावांचं आव्हान
लखनौ सुपर जायंट्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 गडी गमवून 171 धावा केल्या. पंजाब किंग्ससमोर विजयासाठी 172 धावांचं आव्हान आहे. आता हे आव्हान पंजाब किंग्स गाठते का ते पाहणं महत्त्वाचं आहे. कारण या खेळपट्टीवर हे आव्हान पण कठीण आहे.
-
LSG vs PBKS Live Score, IPL 2025 : लखनौ सुपर जायंट्सला पाचवा धक्का, डेविड मिलर तंबूत
लखनौ सुपर जायंट्सला डेविड मिलरच्या रुपाने पाचवा धक्का बसला आहे.
-
LSG vs PBKS Live Score, IPL 2025 : लखनौ सुपर जायंट्सला चौथा धक्का, निकोलस पूरन बाद
निकोलस पूरनची आक्रमक खेळी रोखण्यात युझवेंद्र चहलला यश आलं आहे. त्याने 44 धावांवर खेळणाऱ्या पूरनला बाद केलं.
-
LSG vs PBKS Live Score, IPL 2025 : लखनौच्या निकोलस पूरन आणि आयुष बदोनीने डाव सावरला
पॉवर प्लेमध्ये तीन विकेट पडल्यानंतर लखनौ सुपर जायंट्स बॅकफूटवर होती. पण निकोलस पूरन आणि आयुष बदोनी यांनी डाव सावरला आहे.
-
LSG vs PBKS Live Score, IPL 2025 : पॉवर प्लेमध्ये 3 विकेट गमवून लखनौच्या 39 धावा
पॉवर प्लेमध्ये लखनौ सुपर जायंट्सला तीन धक्के बसले आहे. मिचेल मार्श, एडन मार्करम आणि ऋषभ पंत स्वस्तात बाद झाले. पॉवर प्लेचा 6 षटकात 39 धावा केल्या.
-
LSG vs PBKS Live Score, IPL 2025 : ऋषभ पंत पुन्हा एकदा फेल
ऋषभ पंत पुन्हा एकदा फेल गेला आहे. खरं तर या सामन्यात त्याला चांगली कामगिरी करण्याची संधी होती. पण मॅक्सवेलने फक्त 2 धावांवर तंबूत पाठवला.
-
LSG vs PBKS Live Score, IPL 2025 : लखनौ सुपर जायंट्सला दुसरा धक्का, मार्करम बाद
लखनौ सुपर जायंट्सला मार्करमच्या रुपाने दुसरा धक्का बसला.
-
LSG vs PBKS Live Score, IPL 2025 : मिचेल मार्श खातं न खोलता तंबूत
पंजाब किंग्सने लखनौ सुपर जायंट्सला पहिला धक्का दिला आहे. मिचेल मार्शला खातंही खोलता आलं नाही. अर्शदीपने त्याला तंबूचा रस्ता दाखवला.
-
LSG vs PBKS Live Score, IPL 2025 : नाणेफेकीचा कौल पंजाबच्या बाजूने, श्रेयसने निवडली गोलंदाजी
नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
-
LSG vs PBKS Live Score, IPL 2025 : लखनौ विरुद्ध पंजाब यांच्यातील रेकॉर्ड
खेळलेले सामने: 4
लखनौ सुपर जायंट्स जिंकले:3
पीबीकेएस जिंकले: 1
शेवटचा निकाल: लखनौ सुपर जायंट्स 21 धावांनी विजयी (आयपीएल 2024)
-
LSG vs PBKS Live Score, IPL 2025 : लखनौचे खेळाडू
लखनऊ सुपरजायंट्स : ऋषभ पंत (कर्णधार), डेव्हिड मिलर, एडन मार्कराम, आर्यन ज्वेल, हिम्मत सिंग, मॅथ्यू ब्रेट्झके, निकोलस पूरन, मिचेल मार्श, अब्दुल समद, शाहबाज अहमद, युवराज चौधरी, राजवर्धन हंगेरगेकर, अर्शीन कुलकर्णी, आयुष खान, आयुष खान, दीप सिंह, दीप ऋषी, दिप ऋषि, दिपशकुमार सिंग, आकाश सिंग, शमर जोसेफ, प्रिन्स यादव, मयांक यादव, मोहसीन खान, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई.
-
LSG vs PBKS Live Score, IPL 2025 : पंजाबचे खेळाडू
पंजाब किंग्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), प्रियांश आर्य, पायला अविनाश, हरनूर सिंग, जोश इंग्लिस, प्रभसिमरन सिंग, विष्णू विनोद, नेहल वढेरा, अजमतुल्ला उमरझाई, आरोन हार्डी, मार्को जॅन्सन, ग्लेन मॅक्सवेल, मुशीर खान, शशांक सिंग, अरनूर सिंग, अरनूर सिंग, अरनूर सिंग, अरनूर सिंह, एक्सएनयूएमएक्स. बार्टलेट, युझवेंद्र चहल, प्रवीण दुबे, लॉकी फर्ग्युसन, हरप्रीत ब्रार, कुलदीप सेन, विजय कुमार वैशाख, यश ठाकूर.
Published On - Apr 01,2025 5:37 PM
