MI vs PBKS Live Score, IPL 2021 : मुंबईचा पंजाबवर विजय, सहा गडी राखून दिली मात

IPL 2021 स्पर्धेत आज अबू धाबीच्या शेख जायद आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर 42 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्ज या दोन संघांमध्ये खेळवला गेला.

MI vs PBKS Live Score, IPL 2021 : मुंबईचा पंजाबवर विजय, सहा गडी राखून दिली मात
पंजाब किंग्जचा संघ

IPL 2021 स्पर्धेत आज अबू धाबीच्या शेख जायद आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर 42 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्ज या दोन संघांमध्ये खेळवला गेला. आजचा सामना दोन्ही संघासाठी प्ले ऑफच्या दिशेने पाऊल टाकण्यासाठी महत्त्वाचा होता. सामना तसा अटीतटीचाच झाला. नाणेफेक जिंकत मुंबईने गोलंदाजी घेतली. ज्यानंतर उत्तम गोलंदाजी करत पंजाबच्या फलंदाजाना जेरीस आणलं. अखेर 20 षटकात पंजाबने 135 धावा केल्याने मुंबईसमोर 136 धावांचे आव्हान होते. जे सौरभ तिवारीच्या 45 धावांच्या जोरावर अखेऱ हार्दीक (40) आणि पोलार्डने (15) फिनिशिंग टच देत पूर्ण केलं आणि विजय नोदंवला.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
 • 28 Sep 2021 23:17 PM (IST)

  MI vs PBKS: हार्दीकची फिनीशिंग, मुंबईचा 6 विकेट्सनी विजय

  मोहम्मद शमीला 19 व्या षटकात 17 धावा ठोकत हार्दीक पंड्याने सामना एक ओव्हर तसेच 6 गडी राखून संघाला जिंकवून दिला.

 • 28 Sep 2021 23:09 PM (IST)

  MI vs PBKS: मुंबईला 12 चेंडूत 16 धावांची गरज

  सामना अतिशय रंगतदार स्थितीत आला आहे. मुंबईला 16 धावांची गरज असून हातात 12 चेंडूच आहेत.

 • 28 Sep 2021 22:51 PM (IST)

  MI vs PBKS: सौरभ तिवारीचं अर्धशतक हुकलं

  img

  मुंबईचा डाव एकहाती सांभाळणारा सौरभ तिवारी बाद झाला आहे. नॅथन एलीसच्या चेंडूवर यष्टीरक्षक राहुलने त्याचा झेल पकडला आहे. तो 45 धावा करुन बाद झाला आहे.

 • 28 Sep 2021 22:49 PM (IST)

  MI vs PBKS: सौरभ तिवारीने सांभाळला डाव

  सुरुवातीच्या तीन विकेट्स गेल्यानंतर सौैरभ तिवारीने हार्दीक पंड्यासोबत मिळून मुंबईचा डाव सांभाळण्यास सुरुवात केली आहे. अजूनही मुंबईला 30 षटकांत 44 धावांची गरज आहे.

 • 28 Sep 2021 22:22 PM (IST)

  MI vs PBKS: क्विंटन डिकॉक बाद

  img

  रोहितल आणि सूर्या बाद झाल्यानंतर क्विंंटनने सौरभसोबत डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. पण नुकतीच शमीने डिकॉकची विकेट घेतली आहे.

 • 28 Sep 2021 21:49 PM (IST)

  MI vs PBKS: रवी बिश्नोईचा हल्ला, रोहितसह सूर्याही बाद

  img

  पंजाबच्या रवी बिश्नोईने उत्कृष्ट गोलंदाजी करत एकाच षटकात मुंबईला दोन मोठे धक्के दिले आहेत. आधी रोहितला 8 धावांवर बाद केल्यानंतर सूर्यकुमारला शून्यावर बाद केलं आहे.

 • 28 Sep 2021 21:41 PM (IST)

  MI vs PBKS: मुंबईची संयमी सुरुवात

  मुंबईचे सलामीवीर रोहित शर्मा आणि क्विंटन डिकॉक फलंदाजीला आले आहेत. 135 धावांच पाठलाग करण्यासाठी त्यांनी संयमी खेळीने सुरुवात केली आहे.

 • 28 Sep 2021 21:20 PM (IST)

  MI vs PBKS: पंजाबची 135 धावांपर्यत मजल

  पंजाब संघाला प्रथम फलंदाजी मिळाली असली तरी त्यांनी खास कामगिरी न केल्यामुळे केवळ 135 धावांपर्यत मजल मारली आहे. यामध्ये मार्करम (42) आणि दीपक हुडा (28) यांच्या भागिदारीमुळे संघाने इथवर मजल मारली आहे.

 • 28 Sep 2021 21:10 PM (IST)

  MI vs PBKS: दीपक हुडाही बाद

  img

  पंजाबचा डाव सावरत असलेल्या दीपक हुडाला बाद करण्यातही मुंबईला यश आलं आहे. बुमराहच्या चेंडूवर पोलार्डने त्याचा झेल घेतला आहे.

 • 28 Sep 2021 20:55 PM (IST)

  MI vs PBKS: मार्करम बाद, राहुल चाहरला यश

  img

  चार गडी बाद झाल्यानंतर पंजाब संघाकडून मार्करम आणि दिपक हुड्डा हे दोघे एक चांगली खेळी करत होते. पण राहुल चाहरने मार्करमला 42 धावा झाल्या असताना बाद करत एक चांगली भागिदारी तोडली आहे.

 • 28 Sep 2021 20:21 PM (IST)

  MI vs PBKS: बुमराहने घेतली पूरनची विकेट

  img

  पंजाबचा खराब खेळ सुरु असून निकोलस पुरनही बाद झाला आहे. बुमराहनं त्याची विकेट घेतली आहे.

 • 28 Sep 2021 20:12 PM (IST)

  MI vs PBKS: कर्णधार राहुलही बाद

  img

  मुंबईच्या पोलार्डला एकाच षटकात दोन मोठे विकेट मिळाले आहेत. त्याने केएल राहुल आणि ख्रिस गेल अशा दोघांना बाद करत संघाला मोठं यश मिळवून दिलं आहे,

 • 28 Sep 2021 20:05 PM (IST)

  MI vs PBKS: ख्रिस गेल आऊट

  img

  पंजाबचा धाकड फलंदाज ख्रिस गेल आज काही कमाल करु शकला नाही. पोलार्डच्या चेंडूवर हार्दीकने त्याचा झेळ घेत त्याला एका धावेवर बाद केले आहे.

 • 28 Sep 2021 19:36 PM (IST)

  MI vs PBKS: पंजाबचे सलामीवीर मैदानात

  सामन्याला सुरुवात झाली असून पंजाब किंग्स संघाकडून सलामीवीर केएल राहुल आणि मनदीप सिंग हे फलंदाजीसाठी मैदानात आले आहेत.

 • 28 Sep 2021 19:09 PM (IST)

  नाणेफेक जिंकून मुंबईचा गोलंदाजी करण्याचा निर्णय

  मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

 • 28 Sep 2021 19:05 PM (IST)

  आतापर्यंत मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स

  आयपीएलच्या इतिहासात मुंबई आणि पंजाब 27 वेळा आमने-सामने आले आहेत. यामध्ये दोन्ही संघानी एकमेंकाना तोडीस तोड खेळ केला आहे. केवळ एका विजयाच्या फरकाने मुंबई पुढे आहे. मुंबईने 14 सामने जिंकले असून पंजाबने 13 सामने जिंकले आहेत. दरम्यान आज होणारा सामना अबुधाबीच्या शेख जायद स्टेडियममध्ये होणार आहे. या मैदानाचा विचार करता याठिकाणी दोन्ही संघ एकमेंकाविरुद्ध एकच सामना खेळले असून तो सामना मुंबईनेच जिंकला आहे.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI