AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SRH vs MI Score, IPL 2025 : मुंबई इंडियन्सचा विजयी चौकार, हैदराबादला 7 विकेट्सने नमवलं

| Updated on: Apr 24, 2025 | 3:48 AM
Share

Sunrisers Hyderabad vs Mumbai Indians Score And Highlights in Marathi: आयपीएल 2025 स्पर्धेत मुंबई इंडियन्सची गाडी विजयाच्या रुळावर परतली आहे. मागच्या तीन पर्वात मुंबई इंडियन्सच्या पदरी वारंवार निराशा पडली होती. मात्र आता हैदराबादला पराभूत करून टॉप 4 मध्ये धडक मारली आहे.

SRH vs MI Score, IPL 2025 : मुंबई इंडियन्सचा विजयी चौकार, हैदराबादला 7 विकेट्सने नमवलं
SRH vs MI Live Updates And Score IPL 2025Image Credit source: TV9

आयपीएल 2025 स्पर्धेच्या 41व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादला 7 गडी राखून पराभूत केलं. या सामन्यात हैदराबादने विजयासाठी 144 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान मुंबई इंडियन्सने 7 गडी राखून 15.4 षटकात पूर्ण केलं. मुंबई इंडियन्सने सलग चौथा विजय नोंदवला.  या सामन्यात रोहित शर्माने 70 धावा केल्या, तर बोल्टने चार विकेट घेतल्या. मुंबईचा या स्पर्धेतील पाचवा विजय असून थेट तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. मुंबई इंडियन्सला प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी पाच पैकी 3 सामन्यात विजय मिळवणं आवश्यक आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 23 Apr 2025 10:49 PM (IST)

    SRH vs MI Live Score, IPL 2025 : मुंबई इंडियन्सचा विजयी चौकार, हैदराबादला 7 विकेट्सने नमवलं

    सनरायझर्स हैदराबादने 20 षटकात 8 गडी गमवून 143 धावा केल्या आणि विजयासाठी 144 धावा दिल्या होत्या. हे आव्हान मुंबई इंडियन्सने 3 गडी गमवून 15.4 षटकात पूर्ण केलं. या विजयासह मुंबई इंडियन्सने गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे. गुणतालिकेत मुंबई इंडियन्सने तिसरं स्थान गाठलं आहे.

  • 23 Apr 2025 10:44 PM (IST)

    SRH vs MI Live Updates : मुंबईला तिसरा झटका, रोहित शर्मा आऊट

    मुंबई इंडियन्सने तिसरी विकेट गमावली आहे. रोहित शर्मा आऊट झाला आहे. रोहितने 46 बॉलमध्ये 70 रन्स केल्या. रोहितच्या या खेळीत 3 सिक्स आणि 8 फोरचा समावेश होता. रोहितचं हे या मोसमातील सलग दुसरं आणि एकूण अर्धशतक ठरलं.

  • 23 Apr 2025 10:34 PM (IST)

    SRH vs MI Live Updates : रोहित-सूर्यकुमार जोडी जमली, मुंबई विजयाच्या आणखी जवळ

    रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव ही मुंबई इंडियन्सची लोकल जोडी सेट झाली आहे. रोहित शर्मा याने अर्धशतक पूर्ण केलं आहे. तर सूर्यानेही घट्ट पाय रोवले आहेत. त्यामुळे मुंबई या सामन्यात विजयाच्या दिशेने आणखी जवळ येऊ पोहचली आहे.

  • 23 Apr 2025 10:21 PM (IST)

    SRH vs MI Live Updates : रोहित शर्माचं सलग दुसरं अर्धशतक, मुंबई मजबूत स्थितीत

    मुंबई इंडियन्सचा अनुभवी फलंदाज रोहित शर्मा याने सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध अर्धशतक झळकावलं आहे. रोहितचं हे आयपीएल 2025 मधील सलग आणि एकूण दुसरं अर्धशतक ठरलं आहे. मुंबई यासह विजयाच्या आणखी जवळ पोहचली आहे.

  • 23 Apr 2025 10:15 PM (IST)

    SRH vs MI Live Updates : विल जॅक्स आऊट, मुंबईला दुसरा झटका

    सनरायजर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सला दुसरा झटका दिला आहे. झीशान अन्सारी याने विल जॅक्स याला अभिनव मनोहर याच्या हाती कॅच आऊट केलं. विल जॅक्स याने  19 बॉलमध्ये 2 फोर आणि 1 सिक्ससह 22 रन्स केल्या. विल आऊट झाल्यांतर सूर्यकुमार यादव मैदानात आला आहे.

  • 23 Apr 2025 10:00 PM (IST)

    SRH vs MI Live Updates : मुंबईच्या पावरप्लेमध्ये 56 धावा

    मुंबई इंडियन्सने सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध 144 धावांचा पाठलाग करताना 1 विकेट गमावून 56 धावा केल्या आहेत.  विल जॅक्स आणि रोहित शर्मा ही जोडी मैदानात खेळत आहे. तर मुंबईने रायन रिकेल्टन याच्या रुपात पहिली आणि एकमेव विकेट गमावली.

  • 23 Apr 2025 09:38 PM (IST)

    SRH vs MI Live Updates : मुंबईला पहिला झटका, रायन रिकेल्टन आऊट

    सनरायजर्स हैदराहबादने मुंबईला पहिला झटका दिला आहे. जयदेव उनाडकट याने आपल्याच बॉलिंगवर रायन रिकेल्टन याला कॅच आऊट केलं आहे. रायनने 8 बॉलमध्ये 2 फोरसह 11 रन्स केल्या.

  • 23 Apr 2025 09:28 PM (IST)

    SRH vs MI Live Updates : मुंबईच्या बॅटिंगला सुरुवात, रोहित शर्मा-रायन रिकेल्टन सलामी जोडी मैदानात, विजयासाठी 144 धावांचं आव्हान

    मुंबई इंडियन्सच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. मुंबईकडून रोहित शर्मा आणि रायन रिकेल्टन ही सलामी जोडी मैदानात आली आहे. सनरायजर्स हैदराबादने मुंबईसमोर विजयासाठी 144 धावांचं आव्हान ठेवलं आहे.

  • 23 Apr 2025 09:12 PM (IST)

    SRH vs MI Live Updates : मुंबईसमोर 144 धावांचं आव्हान, पलटण हैदराबाद विरुद्ध जिंकणार?

    सनरायजर्स हैदराबादने मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी 144 धावांचं आव्हान ठेवलं आहे.  हैदराबादने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 143 धावा केल्या. हैदराबादसाठी हेनरिक क्लासेन आणि अभिनव मनोहर या जोडीने सर्वाधिक धावा केल्या. हेनरिकने 71 धावांचं योगदान दिलं. तर अभिनवने 43 धावांचं योगदान दिलं. तर इतर फलंदाजांनी मुंबईसमोर गुडघे टेकले.

  • 23 Apr 2025 09:07 PM (IST)

    SRH vs MI Live Updates : हेनरिक क्लासेन आऊट, हैदराबादला सहावा धक्का

    मुंबई इंडियन्सने हेनरिक क्लासेन आणि अभिनव मनोहर सेट जोडी फोडली आहे. जसप्ररीत बुमराह याने ही जोडी फोडली. बुमराहने 19 व्या ओव्हरमधील शेवटच्या बॉलवर क्लासेनला तिलक वर्मा याच्या हाती कॅच आऊट केलं. क्लासेनने 44 बॉलमध्ये 71 रन्स केल्या. हैदराबादने यासह सहावी विकेट गमावली.

  • 23 Apr 2025 09:00 PM (IST)

    SRH vs MI Live Updates : हैदराबादच्या 18 ओव्हरनंतर 5 बाद 123 धावा

    सनरायजर्स हैदराबादने मुंबई इंडियन्स विरुद्ध 18 ओव्हरनंतर 5 विकेट्स गमावून 123 धावा केल्या आहेत. हेन्रिक क्लासेन आणि अभिनव कुमार या दोघांनी हैदराबादचा डाव सावरला आहे. क्लासेन 63 आणि अभिनव 33 धावांवर नाबाद खेळत आहेत.

  • 23 Apr 2025 08:44 PM (IST)

    SRH vs MI Live Updates : हेनरिक क्लासेन याचं मुंबईविरुद्ध अर्धशतक, ऑरेंज आर्मीला दिलासा

    हेनरिक क्लासेन याने सनरायजर्स हैदराबाद अडचणीत असताना निर्णायक क्षणी मुंबई इंडियन्स विरुद्ध अर्धशतक झळाकावलं आहे.  हेनरिकने 34 चेंडूत हे अर्धशतक केलं. हेनरिकचं हे या मोसमातील पहिलंवहिलं अर्धशतक ठरलं.

  • 23 Apr 2025 08:39 PM (IST)

    SRH vs MI Live Updates : हैदराबादचा मुंबईविरुद्ध संघर्ष, 13 ओव्हरनंतर 77 धावा

    झटपट 5 विकेट्स गमावल्यानंतर सनरायजर्स हैदराबादला मुंबई इंडियन्स विरुद्ध धावांसाठी संघर्ष करावा लागत आहे. हैदराबादने 13 ओव्हरनंतर 77 धावा केल्या आहेत. हेन्रिक क्लासेन 43 आणि इमपॅक्ट प्लेअर 9 धावांवर खेळत आहेत. या जोडीकडून हैदराबादला मोठ्या भागीदारीची अपेक्षा आहे.

  • 23 Apr 2025 08:17 PM (IST)

    SRH vs MI Live Updates : अनिकेत वर्मा आऊट, हैदराबादला पाचवा झटका, मुंबईची सामन्यावर घट्ट पकड

    मुंबई इंडियन्सने सनरायजर्स हैदराबादला पाचवा झटका दिला आहे. कर्णधार हार्दिक पंड्या याने त्याच्या कोट्यातील पहिल्या हैदराबादच्या डावातील नवव्या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर अनिकेत वर्मा याला विकेटकीपर रायन रिकेल्टन याच्या हाती कॅच आऊट केलं. अनिकेतने 14 बॉलमध्ये 12 रन्स केल्या.

  • 23 Apr 2025 07:56 PM (IST)

    SRH vs MI Live Updates : नितीश कुमार रेड्डी आऊट, हैदराबादच्या अडचणीत वाढ

    सनरायजर्स हैदराबादने पावर प्लेमध्ये चौथी विकेट गमावली आहे. दीपर चाहर याने नितीश कुमार याला रेड्डी याला आऊट केलं आहे. दीपकने नितीशला मिचेल सँटनर याच्या हाती 2 धावांवर कॅच आऊट केलं. त्यामुळे हैदराबादची 4 बाद 14 अशी वाईट स्थिती झाली आहे.

  • 23 Apr 2025 07:52 PM (IST)

    SRH vs MI Live Updates : अभिषेक शर्मा आऊट, हैदराबादला पावर प्लेमध्ये तिसरा धक्का

    मुंबई इंडियन्सने सनरायजर्स हैदराबाजला पावर प्लेमध्ये तिसरा झटका देत बॅकफुटवर ढकललं आहे. मुंबईने अभिषेक शर्मा याला आऊट केलं आहे. ट्रेन्ट बोल्ट याने अभिषेकला विघ्नेश पुथुर याच्या हाती कॅच आऊट केलं. अभिषेकने 8 बॉलमध्ये 8 रन्स केल्या. मुंबईने यासह पावर प्लेमध्ये अप्रतिम सुरुवात केली आहे.

  • 23 Apr 2025 07:45 PM (IST)

    SRH vs MI Live Updates : मुंबईची कडक सुरुवात, ईशान किशन आऊट, हैदराबादला दुसरा झटका

    मुंबई इंडियन्सने सनरायजर्स हैदराबादला दुसरा झटका दिला आहे. मुंबईने ट्रेव्हिस हेड याच्यानंतर ईशान किशन यालाही मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. दीपक चाहर याने ईशानला विकेटकीपर रायन रिकेल्टन याच्या हाती कॅच आऊट केलं. ईशान 1 धाव करुन आऊट झाला.

  • 23 Apr 2025 07:40 PM (IST)

    SRH vs MI Live Updates : ट्रेव्हिस हेड झिरोवर आऊट

    मुंबई इंडियन्सने सनरायजर्स हैदराबादला पहिला आणि मोठा झटका दिला आहे. ट्रेन्ट बोल्ट याने सामन्यातील दुसऱ्या ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर हेड याला नमन धीर याच्या हाती कॅच आऊट केलं.  हेडला मुंबईविरुद्ध भोपळाही फोडता आला नाही.

  • 23 Apr 2025 07:34 PM (IST)

    SRH vs MI Live Updates : हैदराबाद-मुंबई सामन्याला सुरुवात, हैदराबादची बॅटिंग

    सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्याला सुरुवात झाली आहे.  हैदराबादकडून अभिषेक शर्मा आणि ट्रेव्हिस हेड ही सलामी जोडी मैदानात आली आहे. मुंबईने टॉस जिंकून हैदराबादला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.

  • 23 Apr 2025 07:32 PM (IST)

    SRH vs MI Live Updates : सामन्याआधी पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली

    पहलगाममध्ये मंगळवारी 22 एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेकांचा मृत्यू झाला. या मृतांना मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद सामन्याआधी श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच या घटनेच्या निर्षेधार्थ सामन्यात दोन्ही संघांचे कर्णधार हे हातावर काळी पट्टी बांधून उतरले आहेत.

  • 23 Apr 2025 07:23 PM (IST)

    SRH vs MI Live Updates : थोड्यात मिनिटांमध्ये सामन्याला सुरुवात

    सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स विरुद्ध यांच्यातील सामन्याला थोड्यात वेळात 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. मुंबईने त्याआधी टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईचे गोलंदाज हैदराबादला किती धावांवर रोखणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

  • 23 Apr 2025 07:07 PM (IST)

    SRH vs MI Live Updates : सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन

    सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन : अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अनिकेत वर्मा, पॅट कमिन्स (कर्णधार), हर्षल पटेल, जयदेव उनाडकट, जीशान अन्सारी आणि एशान मलिंगा.

  • 23 Apr 2025 07:07 PM (IST)

    SRH vs MI Live Updates : मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन

    मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन : रायन रिकेल्टन (विकेटकीपर), विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह आणि विघ्नेश पुथूर.

  • 23 Apr 2025 07:03 PM (IST)

    SRH vs MI Live Updates : मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला, हैदराबादविरुद्ध फिल्डिंगचा निर्णय

    मुंबई इंडियन्सने सनरायजर्स हैदराबादविरुद्ध टॉस जिंकला आहे. कर्णधार हार्दिक पंड्या याने हैदराबादविरुद्ध त्यांच्या घरात फ्लिडंगचा निर्णय घेतला आहे. उभयसंघातील हा या मोसमातील दुसरा सामना आहे. मुंबईने गेल्या सामन्यात 17 एप्रिलला हैदराबादला 4 विकेट्सने पराभूत केलं होतं.

  • 23 Apr 2025 06:51 PM (IST)

    SRH vs MI Live Updates : मुंबई-हैदराबाद सामना, थोड्याच मिनिटांमध्ये टॉस

    मुंबई-हैदराबाद सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी थोड्याच वेळात अर्थात 7 वाजता टॉस होणार आहे. त्यामुळे सनरायजर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स या दोघांपैकी कोण टॉस जिंकणार?  तसेच टॉस फॅक्टर किती निर्णायक ठरणार? याकडे क्रिकेट चाहत्यांच लक्ष लागून आहे.

  • 23 Apr 2025 06:36 PM (IST)

    SRH vs MI Live Updates : हैदराबादसमोर मुंबईविरुद्ध सलग दुसरा पराभव टाळण्याचं आव्हान

    सनरायजर्स हैदराबादसमोर मुंबई इंडियन्सविरुद्ध सलग दुसरा पराभव टाळण्याचं आव्हान असणार आहे. मुंबईने हैदराबादला 17 एप्रिलला पराभूत केलं होतं. त्यानंतर हैदराबाद पु्न्हा मुंबईसमोर भिडणार आहे. त्यामुळे हैदराबादचा मुंबईला पराभूत करुन हिशोब बरोबर करण्याचा प्रयत्न असणार आहे.

  • 23 Apr 2025 06:11 PM (IST)

    SRH vs MI Live Updates : हेड टु हेड रेकॉर्ड्स

    सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स दोन्ही संघ आतापर्यंत एकूण 24 वेळा आमनेसामने आले आहेत. मुंबईने या 24 पैकी सर्वाधिक सामने जिंकले आहेत. मुंबईने हैदराबादवर 14 वेळा मात केली आहे. तर हैदराबादने 10 वेळा पलटवार करत पलटणवर विजय मिळवला आहे.

  • 23 Apr 2025 06:05 PM (IST)

    SRH vs MI Live Updates : मुंबई इंडियन्स टीम

    मुंबई इंडियन्स टीम : रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), तिलक वर्मा, रॉबिन मिन्झ, नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, सत्यनारायण राजू, विघ्नेश पुथूर, राज बावा, अश्वनी कुमार, कॉर्बिन बॉश, कर्ण शर्मा, जसप्रीत बुमराह, रीस टोपले, मुजीब उर रहमान, बेव्हॉन जेकब्स, अर्जुन तेंडुलकर आणि कृष्णन श्रीजीथ.

  • 23 Apr 2025 06:04 PM (IST)

    SRH vs MI Live Updates : सनरायझर्स हैदराबाद टीम

    सनरायझर्स हैदराबाद टीम : पॅट कमिन्स (कर्णधार), अभिषेक शर्मा, ट्रेव्हिस हेड, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अभिनव मनोहर, सचिन बेबी, हर्षल पटेल, ॲडम झम्पा, मोहम्मद शमी, राहुल चहर, जयदेव उनाडकट, कमिंदू मेंडिस, झीशान अन्सारी, वियान मुल्डर, अथर्व तायडे, सिमरन सिंह, एशान मलिंगा आणि अनिकेत वर्मा.

  • 23 Apr 2025 05:59 PM (IST)

    SRH vs MI Live Updates : सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने

    आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 41 व्या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने आहेत. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होणार आहे.

Published On - Apr 23,2025 5:53 PM

Follow us
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.