DC VS MI, IPL 2021 Match 13 Result | अटीतटीच्या सामन्यात दिल्लीचा मुंबईवर 6 विकेट्सने विजय

| Updated on: Apr 20, 2021 | 11:44 PM

DC VS MI 2021 Live Score Marathi | दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने

DC VS MI,  IPL 2021 Match 13 Result | अटीतटीच्या सामन्यात दिल्लीचा मुंबईवर 6 विकेट्सने विजय
DC VS MI 2021 Live Score Marathi | दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने

चेन्नई :  अटीतटीच्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्सने मुंबई इंडियन्सवर 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सला विजयासाठी 138 धावांचे आव्हान दिले होते. दिल्लीने हे विजयी आव्हान 4 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं आहे. दिल्लीकडून ‘गब्बर’ शिखर धवनने सर्वाधिक 45 धावा केल्या. तर स्टीव्ह स्मिथने 33 धावांची खेळी केली. तर मुंबईकडून जयंत यादव, कायरन पोलार्ड, राहुल चहर आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी 1 विकेट घेतली. (dc vs mi live score ipl 2021 match delhi capitals vs mumbai indians scorecard online ma chidambaram stadium chennai in marathi)

DC vs MI Live Score साठी क्लिक करा

Key Events

मुंबई विरुद्धच्या सलग 5 सामन्यातील पराभवनंतर दिल्लीचा विजय

दिल्लीने मुंबई विरुद्धच्या 5 सामन्यानंतर विजय मिळवला आहे. याआधीच्या 5 सामन्यात मुंबईने दिल्लीवर 5 सामन्यांमध्ये मात केली होती.

अमित मिश्राच्या आणि शिखर धवन विजयाचे शिल्पकार

अमित मिश्रा आणि शिखर धवन ही जोडी दिल्लीच्या विजयाचे शिल्पकार ठरले. अमित मिश्राने 4 ओव्हर्समध्ये 24 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. तसेच शिखर धवनने 42 चेंडूत 5 चौकार आणि 1 सिक्ससह 45 धावा केल्या.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 20 Apr 2021 11:31 PM (IST)

    दिल्लीचा 6 विकेट्सने विजय

    दिल्ली कॅपिट्ल्सने मुंबई इंडियन्सवर 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सला विजयासाठी 138 धावांचे आव्हान दिले होते. दिल्लीने हे विजयी आव्हान 4 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं आहे. दिल्लीकडून ‘गब्बर’ शिखर धवनने सर्वाधिक 45 धावा केल्या. तर स्टीव्ह स्मिथने 33 धावांची खेळी केली. तर मुंबईकडून जयंत यादव, कायरन पोलार्ड, राहुल चहर आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

  • 20 Apr 2021 11:22 PM (IST)

    दिल्लीला विजयासाठी 6 चेंडूत 5 धावांची आवश्यकता

    दिल्लीने 19 ओव्हरनंतर 4 विकेट्स गमावून 133 धावा केल्या आहेत. दिल्ली विजयासाठी 6 चेंडूत 5 धावांची आवश्यकता आहे.

  • 20 Apr 2021 11:15 PM (IST)

    दिल्लीला विजयासाठी 12 चेंडूत 15 धावांची आवश्यकता

    दिल्लीने 18 ओव्हरनंतर 4 विकेट्स गमावून 123 धावा केल्या आहेत. दिल्ली विजयासाठी 12 चेंडूत 15 धावांची आवश्यकता आहे.

  • 20 Apr 2021 11:08 PM (IST)

    दिल्लीला चौथा धक्का

    दिल्लीला चौथा धक्का बसला आहे. कर्णधार रिषभ पंत मोठा फटका मारण्याच्या नादात कॅच आऊट झाला आहे. रिषभने 7 धावा केल्या.

  • 20 Apr 2021 10:56 PM (IST)

    दिल्लीला तिसरा धक्का

    दिल्लीला तिसरा धक्का आहे. शिखर धवन मोठा फटका मारण्याच्या नादात निर्णायक क्षणी कॅच आऊट झाला आहे. राहुलच चहरने शिखरला कृणाल पंड्याच्या हाती कॅच आऊट केलं. शिखरने 42 चेंडूत 5 चौकार आणि 1 सिक्ससह 45 धावा केल्या.

  • 20 Apr 2021 10:51 PM (IST)

    गब्बरचा शानदार सिक्स

    गब्बर शिखर धवनने 15 व्या ओव्हरची सुरुवात सिक्सने केली आहे. धवनने राहुलच चहरच्या गोलंदाजीवर हा सिक्स खेचला.

  • 20 Apr 2021 10:47 PM (IST)

    दिल्लीला विजयासाठी 6 ओव्हरमध्ये 48 धावांची आवश्यकता

    दिल्लीने 14 ओव्हरनंतर 2 विकेट्स गमावून 90 धावा केल्या आहेत. शिखर धवन 35 आणि ललित यादव 10 धावांवर नाबाद खेळत आहेत. दिल्ली विजयासाठी 6 ओव्हरमध्ये 48 धावांची आवश्यकता आहे.

  • 20 Apr 2021 10:43 PM (IST)

    दिल्लीला विजयासाठी 7 ओव्हरमध्ये 52 धावांची आवश्यकता

    दिल्लीने 13 ओव्हरनंतर 2 विकेट्स गमावून 86 धावा केल्या आहेत. शिखर धवन 33 आणि ललित यादव 9 धावांवर नाबाद खेळत आहेत. दिल्ली विजयासाठी 7 ओव्हरमध्ये 52 धावांची आवश्यकता आहे.

  • 20 Apr 2021 10:24 PM (IST)

    दिल्लीला दुसरा धक्का, स्टीव्ह स्मिथ बाद

    दिल्लीला दुसरा धक्का बसला आहे. भरवशाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथ 33 धावांवर बाद. कायरन पोलार्डने स्मिथला पायचित केलं. (दिल्ली 64/2)

  • 20 Apr 2021 10:18 PM (IST)

    स्टीव्ह स्मिथ आणि शिखर धवनची दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी

    स्टीव्ह स्मिथ आणि शिखर धवनची दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली आहे. पहिली विकेट झटपट गमावल्यानंतर या दोघांनी दिल्लीचा स्कोअरकार्ड धावता ठेवला. या दरम्यान या दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली. यामुळे दिल्ली मजबूत स्थितीत आहेत.

  • 20 Apr 2021 10:03 PM (IST)

    दिल्लीचा पावर प्लेनंतर स्कोअर

    दिल्लीने पावर प्लेच्या पहिल्या 6 ओव्हरनंतर 6 विकेट्स गमावून 39 धावा केल्या आहेत. स्टीव्ह स्मिथ 17 तर शिखर धवन 12 धावांवर नाबाद खेळत आहेत. दिल्लीला विजयासाठी 84 चेंडूत 99 धावांची आवश्यकता आहे.

  • 20 Apr 2021 09:51 PM (IST)

    दिल्लीचा 4 ओव्हरनंतर स्कोअर

    दिल्लीने 4 ओव्हरनंतर 1 विकेट गमावून 28 धावा केल्या आहेत. स्टीव्ह स्मिथ 11 तर शिखर धवन 9 धावांवर नाबाद खेळत आहेत.

  • 20 Apr 2021 09:42 PM (IST)

    दिल्लीला पहिला धक्का

    दिल्लीला पहिला धक्का बसला आहे. जयंत यादवने आपल्या गोलंदाजीवर  पृथ्वी शॉचा कॅच घेतला आहे. पृथ्वीने 7 धावा केल्या. 
     
     
  • 20 Apr 2021 09:33 PM (IST)

    शिखरची चौकाराने सुरुवात

    शिखर धवनने चौकार ठोकत आपल्या खेळीची सुरुवात केली आहे. शिखरने सामन्यातील पहिल्या ओव्हरच्या  तिसऱ्या चेंडूवर ट्रेन्ट बोल्टच्या गोलंदाजीवर फोर ठोकला.

  • 20 Apr 2021 09:31 PM (IST)

    दिल्लीच्या बॅटिंगला सुरुवात, विजयासाठी 138 धावांचे आव्हान

    दिल्लीच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. पृथ्वी शॉ आणि शिखर धवन सलामी जोडी मैदानात खेळत आहे.

  • 20 Apr 2021 09:18 PM (IST)

    दिल्लीला विजयासाठी 138 धावांचे आव्हान

    मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सला विजयासाठी 138 धावांचे आव्हान दिले आहे. मुंबईने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 137 धावा केल्या आहेत. मुंबईकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक 44 धावांची खेळी केली. अमित मिश्राच्या फिरकीसमोर मुंबईच्या गोलंदाजांनी लोटांगण घातलं. रोहित शर्मानंतर मुंबईने ठराविक अंतराने विकेट्स गमावल्या. दिल्लीकडून अमित मिश्राने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.

  • 20 Apr 2021 09:05 PM (IST)

    मुंबईला सातवा झटका

    मुंबईला सातवा झटका बसला आहे. इशान किशन दुर्देवीरित्या क्लीन बोल्ड झाला आहे.

  • 20 Apr 2021 08:53 PM (IST)

    मुंबईच्या 16 ओव्हरनंतर धावा

    मुंबईच्या 16 ओव्हरनंतर 6 विकेट्स गमावून 114 धावा केल्या आहेत.

  • 20 Apr 2021 08:51 PM (IST)

    इशान किशनचा फ्लॅट सिक्स

    इशान किशनने अश्विनच्या गोलंदाजीवर 16 व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर फ्लॅट सिक्स लगावला आहे.

  • 20 Apr 2021 08:50 PM (IST)

    मुंबईच्या 100 धावा पूर्ण

    मुंबईने 14.4 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 100 धावा पूर्ण केल्या आहेत. जयंत यादव आणि इशान किशन मैदानात खेळत आहेत.

  • 20 Apr 2021 08:35 PM (IST)

    मुंबईला सहावा झटका

    अमित मिश्राने आपल्या फिरकीच्या जाळ्यात कायरन पोलार्डला अडकवत मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. मिशीने गुगली बोलवर पोलार्डला एलबीडबल्यू आऊट केलं आहे. पोलार्डने 2 धावा केल्या.

  • 20 Apr 2021 08:27 PM (IST)

    मुंबईला पाचवा झटका

    मुंबईला पाचवा झटका लागला आहे.  कृणाल पंड्या आऊट झाला आहे. मुंबईने झटपट विकेट गमावल्याने पलटणवर दबाव आला आहे. दरम्यान कायरन पोलार्ड आणि इशान किशन मैदानात खेळत आहेत.

  • 20 Apr 2021 08:24 PM (IST)

    मुंबईला 9 व्या ओव्हरमध्ये 2 धक्के

    अमित मिश्राने मुंबईला 9 व्या ओव्हरमध्ये 2 मोठे धक्के  दिले आहेत. मिश्राने आपल्या गोलंदाजीवर आधी सेट झालेल्या रोहित शर्माला आणि त्यानंतर हार्दिक पंड्याला बाद केलं. त्यामुळे काही ओव्हरआधी फ्रंटफुटवर असेलेली पलटण आता बॅकफुटवर गेली आहे.

  • 20 Apr 2021 08:19 PM (IST)

    मुंबईला मोठा झटका

    अमित मिश्राने मुंबईला मोठा धक्का दिला आहे. मिश्राने जोरदार फलंदाजी करत असेलला मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला आऊट केलं आहे. रोहितने 30 चेंडूत  प्रत्येकी 3 सिक्स आणि 3 चौकारांसह 44 धावांची खेळी केली.

  • 20 Apr 2021 08:12 PM (IST)

    मुंबईला दुसरा धक्का

    मुंबईला दुसरा धक्का बसला आहे.  सू्र्यकुमार यादव आऊट कॅच आऊट झाला आहे. आवेश खानने सूर्याला विकेटकीपर रिषभ पंतच्या हाती कॅच आऊट केलं. सूर्याने 15 चेंडूत 4 चौकारासह 24 धावा केल्या.

  • 20 Apr 2021 08:08 PM (IST)

    मुंबईची दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी

    रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली आहे. दोन्ही फलंदाज मैदानात सेट झाले आहेत.

  • 20 Apr 2021 08:03 PM (IST)

    पावर प्लेच्या 6 ओव्हरनंतर मुंबईचा स्कोअर

    पावर प्लेच्या पहिल्या 6 ओव्हरनंतर मुंबईने 1 विकेट गमावून 55 धावा केल्या आहेत. सूर्यकुमार यादव 23 तर कर्णधार रोहित शर्मा 29 धावांवर नाबाद खेळत आहेत. या दोघांनी आतापर्यंत दुसऱ्या विकेटसाठी 46 धावा जोडल्या आहेत.

  • 20 Apr 2021 08:00 PM (IST)

    सूर्यकुमारचा चौकार, मुंबई 50 पार

    सूर्यकुमार यादवने अमित मिश्राच्या बोलिंगवर सामन्यातील 6 व्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर फोर लगावला आहे. यासह मुंबईच्या 50 धावा पूर्ण झाल्या आहेत.

  • 20 Apr 2021 07:57 PM (IST)

    रोहितचा जोरदार सिक्स

    रोहितने कगिसो रबाडाच्या बोलिंगवर 5 व्या ओव्हरच्या 5 चेंडूवर 95 मीटरचा सिक्स मारला आहे.

  • 20 Apr 2021 07:53 PM (IST)

    अश्विनच्या बोलिंगवर रोहितचा सिक्स

    रोहित शर्माने आर अश्विनच्या बोलिंगवर चौथ्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर सिक्स खेचला. यासह मुंबईचा स्कोअर 4 ओव्हरनंतर 1 बाद 31 झाला आहे. रोहितसोबत सूर्यकुमार यादव है मैदानात खेळत आहे.

  • 20 Apr 2021 07:44 PM (IST)

    मुंबई इंडियन्सला पहिला धक्का

    मुंबई इंडियन्सला पहिला धक्का बसला आहे.  क्विंटन डी कॉक आऊट झाला आहे. क्विंटन 1 रन करुन माघारी परतला.

  • 20 Apr 2021 07:31 PM (IST)

    मुंबईच्या बॅटिंगला सुरुवात

    मुंबईच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक सलामी जोडी मैदानात खेळत आहे.

  • 20 Apr 2021 07:20 PM (IST)

    दोन्ही संघात बदल

    दिल्ली विरुद्धच्या सामन्यासाठी मुंबईने प्लेइंग इलेव्हनमध्ये 1 बदल केला आहे. वेगवान गोलंदाज एडम मिल्नच्या जागी फिरकीपटू जयंत यादवला स्थान देण्यात आले आहे. तसेच दिल्लीमध्ये 2 बदलाव झाले आहेत. ख्रिस वोक्स आणि लुकमान मेरीवालाच्या जागी शिमरोन हेटमायर आणि अमित मिश्राला संधी देण्यात आली आहे.

  • 20 Apr 2021 07:17 PM (IST)

    अशा आहेत दोन्ही टीम

  • 20 Apr 2021 07:15 PM (IST)

    दिल्ली कॅपिटल्सचे अंतिम 11 खेळाडू

    रिषभ पंत (कप्तान), पृथ्वी शॉ, शिखर धवन, स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टोयनिस, ललित यादव, आर अश्विन, कगिसो रबाडा, आवेश खान, शिमरॉन हेटमायर आणि अमित मिश्रा.

  • 20 Apr 2021 07:13 PM (IST)

    मुंबईची प्लेइंग इलेव्हन

    रोहित शर्मा (कर्णधार) , क्विंटन डीकॉक, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, जंयत यादव, राहुल चहर, जसप्रीत बुमराह आणि ट्रेन्ट बोल्ट.

  • 20 Apr 2021 07:04 PM (IST)

    मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला

    मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला आहे. रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. 

     
     
  • 20 Apr 2021 06:34 PM (IST)

    दिल्ली विरुद्ध मुंबई आमनेसामने

    आयपीएलच्या 14 व्या मोसमातील 13 वा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला अवघ्या काही मिनिटांमध्ये सुरुवात होणार आहे.

Published On - Apr 20,2021 11:31 PM

Follow us
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.