India vs South Africa, 3rd ODI LIVE Score Updates : दक्षिण आफ्रिकेचं शतक पूर्ण, क्विंटन डी कॉक-टेम्बा बवुमा सेट जोडी मैदानात
India vs South Africa, 3rd ODI LIVE Cricket Score and Updates : टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका दोन्ही संघांना मालिका विजयाची समसमान संधी आहे. अशात तिसरा सामना जिंकून कोणता संघ सीरिज जिंकणार? हे आज ठरणार आहे.

LIVE Cricket Score & Updates
-
IND vs SA, 3rd ODI LIVE Updates : दक्षिण आफ्रिकेचं शतक पूर्ण, क्विंटन डी कॉक-टेम्बा बवुमा सेट जोडी मैदानात
दक्षिण आफ्रिकेने 100 धावा पूर्ण केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेने 19 ओव्हरमध्ये 100 धावा पूर्ण केल्या. टेम्बा बवुमा 38 आणि क्विंटन डी कॉक 60 रन्सवर नॉट आऊट खेळत आहेत.
-
IND vs SA, 3rd ODI LIVE Updates : क्विंटन डी कॉकला सुर गवसला, टीम इंडिया विरुद्ध अर्धशतक
दक्षिण आफ्रिकेचा ओपनर बॅट्समन आणि विकेटकीपर क्विंटन डी कॉक याला अखेर सुर गवसला आहे. कॉकने अंतिम सामन्यात अर्धशतक ठोकलं आहे. कॉकने 53 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 4 फोरसह अर्धशतक पूर्ण केलं.
-
-
IND vs SA, 3rd ODI LIVE Updates : क्विंटन डी कॉक-टेम्बा बवुमा जोडी जमली, दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी
टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला रायन रिकेल्टन याला झिरोवर आऊट करत पहिला झटका दिला. त्यानंतर क्विंटन डी कॉक आणि टेम्बा बवुमा या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली आहे. त्यामुळे टीम इंडियाचा ही जोडी फोडण्याचा प्रयत्न आहे.
-
IND vs SA, 3rd ODI LIVE Updates : टीम इंडियाची चिवट बॉलिंग, दक्षिण आफ्रिकेचा धावांसाठी संघर्ष
टीम इंडियाच्या गोलंदाजांनी पावरप्लेमधील पहिल्या 7 ओव्हरमध्ये चिवट बॉलिंग केली आहे. टीम इंडियाने 7 ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेला 23 धावा दिल्या आहेत. तर टीम इंडियाकडून अर्शदीप सिंह याने एकमेव विकेट घेतली आहे.
-
IND vs SA, 3rd ODI LIVE Updates : अर्शदीपचा दक्षिण आफ्रिकेला पहिल्याच ओव्हरमध्ये दणका, रायन रिकेल्टन आऊट
अर्शदीप सिंह याने दक्षिण आफ्रिकेला सामन्यातील पहिल्याच ओव्हरमध्ये झटका दिला आहे. अर्शदीपने रायन रिकेल्टन याला कॅप्टन केएल राहुल याच्या हाती कॅच आऊट केलं आहे. रायनला भोपळाही फोडता आला नाही.
-
-
IND vs SA, 3rd ODI LIVE Updates : सामना सुरु, दक्षिण आफ्रिकेची बॅटिंग, क्विंटन डी कॉक-रायन रिकेल्टन मैदानात
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्याला सुरुवात झाली आहे. टीम इंडियाने टॉस जिंकून दक्षिण आफ्रिकेला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. दक्षिण आफ्रिकेकडून क्विंटन डी क़ॉक आणि रायन रिकेल्टन ही सलामी जोडी मैदानात आली आहे.
-
IND vs SA, 3rd ODI LIVE Updates : टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), रवींद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग आणि प्रसीध कृष्णा.
-
-
IND vs SA, 3rd ODI LIVE Updates : साऊथ आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन
रायन रिकेल्टन, क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), टेम्बा बवुमा (कर्णधार), मॅथ्यू ब्रेट्झके, एडन मार्रक्रम, डेवाल्ड ब्रेव्हीस, मार्को यान्सेन, कॉर्बिन बॉश, केशव महाराज, लुंगी एन्गिडी आणि ओटनील बार्टमन.
-
IND vs SA, 3rd ODI LIVE Updates : टीम इंडियाने टॉस जिंकला, बॅटिंग की बॉलिंग?
टीम इंडियाने तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात टॉस जिंकला आहे. कॅप्टन केएल राहुल याने फिल्डिंगचा निर्णय घेत दक्षिण आफ्रिकेला बॅटिंगची संधी दिली आहे. टीम इंडियाने या मालिकेतील पहिल्या 2 सामन्यात टॉस गमावून बॅटिंग केली होती.
-
IND vs SA, 3rd ODI LIVE Updates : वनडे सीरिजसाठी दक्षिण आफ्रिका टीम
एडन मार्कराम, क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), टेम्बा बवुमा (कर्णधार), मॅथ्यू ब्रेट्झके, डेवाल्ड ब्रेव्हिस, टोनी डी झोर्झी, मार्को यान्सेन, कॉर्बिन बॉश, केशव महाराज, नांद्रे बर्गर, लुंगी एनगिडी, रायन रिकेल्टन, ओटनील बार्टमन, रुबिन हर्मन आणि प्रिनेलन सुब्रेन.
-
IND vs SA, 3rd ODI LIVE Updates : वनडे सीरिजसाठी टीम इंडिया
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, ऋषभ पंत, तिलक वर्मा, ध्रुव जुरेल आणि नितीश कुमार रेड्डी.
-
IND vs SA, 3rd ODI LIVE Updates : तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर त्याआधी 1 वाजता टॉस होणार आहे. सामन्याचं आयोजन हे विशाखापट्टणममधील एसीए व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे.
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिका रंगतदार स्थितीत आहे. आज 6 डिसेंबरला तिसऱ्या आणि अंतिम सामन्यानंतर मालिका विजेता संघ निश्चित होणार आहे. उभयसंघातील 3 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. टीम इंडियाने या मालिकेत विजयी सुरुवात केली. भारताने रांचीत दक्षिण आफ्रिकेवर 17 धावांनी मात केली. तर दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या सामन्यात पलटवार करत मालिकेत बरोबरी साधली. आता विशाखापट्टणममध्ये कोणता संघ मालिकेवर नाव कोरणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. या सामन्यातील प्रत्येक अपडेट आपण या लाईव्ह ब्लॉगद्वारे जाणून घेणार आहोत.
Published On - Dec 06,2025 12:55 PM
