Twitter, Google, Microsoft ते Adobe… टॉप टेक कंपन्यांची कमान भारतीयांकडे, सिलिकॉन व्हॅलीतला दबदबा वाढतोय

अमेरिकेतील अनेक बड्या सॉफ्टवेअर कंपन्यांची कमान भारतीयांच्या हाती आहे आणि आता यात पराग अग्रवाल यांचे नावही जोडले गेले आहे. Twitter, Google, Microsoft पासून ते Adobe पर्यंत अनेक बड्या टेक कंपन्यांची सूत्र भारतीयांच्या हातात आहे.

1/7
भारतीय वंशाचे पराग अग्रवाल आता ट्विटरचे नवे सीईओ बनले आहेत, सोमवारी संध्याकाळी माजी सीईओ जॅक डॉर्सी यांनी पराग अग्रवाल यांची ट्विटरचे सीईओ म्हणून नियुक्तीची घोषणा केली. अमेरिकेतील अनेक बड्या सॉफ्टवेअर कंपन्यांची कमान भारतीयांच्या हाती आहे आणि आता यात पराग अग्रवाल यांचे नावही जोडले गेले आहे. Twitter, Google, Microsoft पासून ते Adobe पर्यंत अनेक बड्या टेक कंपन्यांची कमान भारतीयांच्या हातात आहे. त्यामुळे दिवसेंदिवस सिलिकॉन व्हॅलीतला भारतीयांचा दबदबा वाढतोय, असं म्हणावं लागेल.

2/7
गूगल : जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या Google चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई हे देखील भारतीय वंशाचे आहेत. सुंदर पिचाई यांची 2015 मध्ये कंपनीचे सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. IIT खरगपूरमध्ये शिकलेले पिचाई 2004 मध्ये गुगलमध्ये रुजू झाले होते. लॅरी पेज अँड सेरेजी ब्रीन कंपनी सोडल्यानंतर ते गुगल सोबत काम करु लागले होते. सुंदर पिचई यांचा जन्म तामिळनाडूमध्ये झाला होता. आयआयटी खरगपूरमध्ये शिकून बाहेर पडल्यानंतर ते स्टॅनफोर्ड विद्यापीठ कॅलिफोर्निया येथे पुढील शिक्षण घेण्यासाठी गेले होते.

3/7
मायक्रोसॉफ्ट : प्रसिद्ध उद्योजक बिल गेट्स यांच्या मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या सीईओपदावर सत्या नडेला 2014 पासून काम करत आहेत. सत्या नडेला यांनी त्यांचे शिक्षण हैदराबादमध्ये पूर्ण केले. कॉम्प्युटर इंजिनीअरींगमध्ये पदवी घेतल्यानंतर ते एम.एससी करण्यासाठी अमेरिकेला गेले. अमेरिकेतील विस्कॉन्सीन-मिलावूकी विद्यापीठातून त्यांनी एम.एससी पदवी पूर्ण केली. सत्या नडेला यांचा जन्म एका तेलुगू कुटंबामध्ये झाला आहे. मायक्रोसॉफ्टमध्ये काम करण्यापूर्वी सत्या नडेला सन मायक्रोसिस्टीम्समध्ये कार्यकरत होते.

4/7
Adobe : शंतनू नारायण सध्या जगप्रसिद्ध अ‌ॅडोब या कंपनीच्या सीईओ पदावर काम करत असून ते हैदराबादचे आहेत. 2007 पासून ते अ‌ॅडोबचे चेअरमन आणि सीईओ म्हणून ते काम पाहत आहेत. शंतनू नारायण यांनी उस्मानिया विद्यापीठ, हैदराबादमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. कॅलिफोर्निया विद्यापीठातून शंतून नारायण यांनी मास्टर ऑफ बिझनेस हा अभ्यासक्रम पूर्ण केला. नारायण यांनी अ‌ॅडोबला जॉईन होण्यापूर्वी अ‌ॅपल कंपनीत काम केले आहे. नारायण हे भारतीय अमेरिकन बिझनेस एक्झिक्युटिव्ह आहेत. ते कंपनीचे चेअरमन, अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारीदेखील आहेत. याआधी ते 2005 ते 2007 पर्यंत कंपनीच्या सीओओ या पदावर कार्यरत होते.

5/7
IBM : आंध्र प्रदेशात जन्मलेले, अरविंद कृष्णा हे जगातील प्रसिद्ध कम्प्यूटर हार्डवेअर कंपनी IBM चे विद्यमान अध्यक्ष आणि CEO आहेत. अरविंद यांची एप्रिल 2020 मध्ये कंपनीचे CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. अरविंद यांच्याकडे भारताबरोबरच अमेरिकेचेही नागरिकत्व आहे. त्यांनी आयआयटी कानपूरमधून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे.

6/7
VMware :  VMware चे CEO देखील भारतीय वंशाचे आहे. या कंपनीची कमान रघू रघुराम यांच्याकडे आहे. ते 2003 मध्ये कंपनीत रुजू झाले आणि सध्या ते कंपनीचे सीईओ आहेत. रघुराम यांनीदेखील आयआयटी बॉम्बेमधून शिक्षण घेतले आहे.

7/7
Deloitte : Deloitte या व्यावसायिक सेवा कंपनीचे CEO पुनीत (Punit Renjen) हे मूळचे रोहतकचे आहेत. ते सध्या कंपनीचे CEO आहेत. 2015 पासून ते या पदावर कार्यरत आहेत. याआधी ते Deloitte Consulting LLP चे CEO होते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI