ओप्पो (Oppo) कंपनीने आपल्या कमी किंमतीतल्या A सीरीजमधील एक नवीन स्मार्टफोन A35 लाँच केला आहे. Oppo A35 एंट्री-लेव्हल स्मार्टफोनप्रमाणे आहे, ज्यांना बजेट फोन हवा आहे, अशा युजर्ससाठी हा चांगला पर्याय आहे.
1 / 5
Oppo A35 स्मार्टफोनच्या मागच्या बाजूस स्क्वेअर कॅमेरा मॉड्यूलसह ट्रेंडी डिझाइन आहे. कंपनीने हा स्मार्टफोन तीन कलर व्हेरिएंटमध्ये सादर केला आहे, ज्यामध्ये आईस झेड व्हाइट, ग्लास ब्लॅक आणि मिस्ट सी ब्लू या रंगांचा समावेश आहे. ओप्पोने अद्याप ए 35 स्मार्टफोनची किंमत जाहीर केलेली नाही. तथापि, A15s, जो A35 सारखाच फोन आहे, या फोनची किंमत अमेझॉनवर 11,490 रुपये आहे.
2 / 5
Oppo A35 हा लो-एंड स्मार्टफोन आहे. फोनमध्ये 6.52 इंचाचा एचडी + आयपीएस एलसीडी डिस्प्ले आहे ज्यामध्ये 60 हर्ट्झ रिफ्रेश रेट, 20: 9 आस्पेक्ट रेशियो, 296 पीपीआय पिक्सेल डेन्सिटी आणि 480 एनआयटी ब्राइटनेस आहे. यात वॉटरड्रॉप-स्टाईल नॉचदेखील आहे.
3 / 5
स्मार्टफोन 4 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटर्नल स्टोरेज आणि मीडियाटेक हेलियो पी 35 प्रोसेसरसह सादर करण्यात आला आहे. याची मेमरी एक्स्टर्नल मायक्रो एसडी कार्डद्वारे वाढवता येईल. फोनच्या मागील बाजूस फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.
4 / 5
फोनच्या मागील बाजूस एक 13 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. यात 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आणि 2 मेगापिक्सेलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी यामध्ये 8 मेगापिक्सलचा सेन्सर आहे. ओप्पो ए 35 मध्ये 4230mAh बॅटरी आहे. ओप्पोने हा फोन चीनमध्ये लाँच केली आहे. डिसेंबरमध्ये भारतात लॉन्च करण्यात आलेल्या A15s चा हा रिब्रँडेड अवतार आहे.