Mumbra Crime News : 10 वर्षीय चिमुकलीची लैंगिक अत्याचार करून हत्या; संतप्त नागरिकांचा मोर्चा
Mumbra 10 Years Girl Molestation And Death Case : मुंब्रा येथे एका 10 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी आरोपीला फाशी व्हावी या मागणीसाठी नागरिकांनी मोर्चा काढला.
मुंब्रा येथे एका 10 वर्षीय चिमुकलीची लैंगिक अत्याचार करून हत्या करण्यात आलेली आहे. या घटनेने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. या घटने नंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत मुंब्रा येथील नागरिकांनी मोर्चा काढला आहे. हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशी देण्याची मागणी त्यांनी केली आहे. तर घटना घडल्याची माहिती मिळताच 3 तासात मुंब्रा पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे. पोलिसांची चौकशी योग्य पद्धतीने सुरू राहील असं यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत बोलताना म्हंटलं आहे.
Published on: Apr 09, 2025 08:34 AM
