Breaking | 11 वीच्या सीईटी परीक्षेची तारीख ठरली, 21 ऑगस्टला होणार 11 वी सीईटीची परीक्षा
21 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेच्या दरम्यान ही सीईटी परीक्षा होणार आहे. राज्यभरात एकाच वेळी ही परीक्षा घेतली जाईल, असं राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलं आहे.
10 वी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर 11 वी प्रवेशासाठी ऐच्छिक सीईटी परीक्षा होणार असल्याचं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं होतं. त्यानुसार आता 11 वी प्रवेशासाठी होणाऱ्या सीईटी परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. 21 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेच्या दरम्यान ही सीईटी परीक्षा होणार आहे. राज्यभरात एकाच वेळी ही परीक्षा घेतली जाईल, असं राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे 10वी परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांनी आता सीईटीसाठी तयारीला लागण्याची गरज आहे
Published on: Jul 19, 2021 09:12 PM
