पावसामुळे अनेक जिल्ह्यात शेतीचे मोठं नुकसान, पहा काय आहे आपल्या जिल्ह्याच्या अपडेट 36 जिल्हे 72 बातम्यांमध्ये

| Updated on: Oct 14, 2022 | 6:34 PM

गोंदियातही परतीच्या पावसाने शेतीचे नुकसान केलं आहे. आधल्या रात्री कापून ठेवलेलं धान पीकाचे परतीच्या पावसामुळे नुकसान झालं आहे

Follow us on

गेल्या चार एक दिलसांपासून रोज्यातील विविध भागत परतीच्या पावसाने हजेरी लावलेली आहे. पुण्यात देखिल मुसळधार पाऊस झाल्याने शहराच्या अनेक भागात पाणीचपाणी झाले आहे. तर पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात पुढील तीन ते चार दिवस पावस पडणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. पुण्याच्या बारामतीच्या वडगाव निंबाळकर गावात पावसामुळे ओढ्याला आलेल्या पूराच्या पाण्यात तरूण वाहून गेला. तर प्रशासनाकडून त्याचा शोध सुरू आहे. तर सततच्या पडणाऱ्या पावसामुळे वाशिम जिल्ह्याला मोठा फटका बसला आहे. येथे अतिवृष्टीमुळे दीड लाख हेक्टर क्षेत्र बाधीत झालं आहे. तर शेतीचे प्रचंड नुकसाना ही झालं आहे. तर गोंदियातही परतीच्या पावसाने शेतीचे नुकसान केलं आहे. आधल्या रात्री कापून ठेवलेलं धान पीकाचे परतीच्या पावसामुळे नुकसान झालं आहे. दरम्यान रायगड जिल्ह्यात खोपोली आणि खालापूरमध्ये पावसाने जोरदान हजेरी लावली. तर परभणी जिल्ह्याला परतीच्या पावसाने झोडपून काढलं आहे. दरम्यार सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील अंजनडोह धबधब्याला पावसामुळे रौद्ररूप आले आहे. त्यामुळे पर्यटकांना पाण्यात न उतरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.