4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 10 August 2021
वसई विरार महापालिकेला शासनाकडून 4 हजार 850 कोव्हिशिल्डच्या लस उपलब्ध झाल्याने 10 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजल्यापासून 17 लसीकरण केंद्रावर नागरिकांना लस मिळणार आहे. त्यासाठी दुपारी 3 वाजल्यापासून ते रात्रभर महिला, पुरुष रांगेत बसले आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 2 डोस घेतलेल्या नागरिकांना लोकलमध्ये प्रवेश मिळणार असल्याची घोषणा केली. या घोषणेनंतर वसई विरार नालासोपाऱ्यात लसीकरण केंद्रावर आदल्या दिवशीच्या दुपारी 3 वाजल्यापासूनच रांगा लागायला सुरुवात झाली. वसई विरार महापालिकेला शासनाकडून 4 हजार 850 कोव्हिशिल्डच्या लस उपलब्ध झाल्याने 10 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजल्यापासून 17 लसीकरण केंद्रावर नागरिकांना लस मिळणार आहे. त्यासाठी दुपारी 3 वाजल्यापासून ते रात्रभर महिला, पुरुष रांगेत बसले आहेत.
वसई विरार महापालिकेच्या 17 लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात येणार आहे. नालासोपारा पूर्वकडील तुलिंज हॉस्पिटल हे सर्वात मोठे आहे. याठिकाणी 300 लस सकाळी 8 वाजल्यापासून नागरिकांना मिळणार आहेत. त्यातील 150 पहिला डोससाठी तर 150 दुसरा डोसवाल्या नागरिकांसाठी आहेत.
