4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 24 August 2021

| Updated on: Aug 24, 2021 | 7:34 AM

केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर बोलताना पुन्हा एकदा भाषा घसरलीय. मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली लगावण्याची भाषा राणेंनी केलीय. राणे सध्या कोकणच्या दौऱ्यावर जनआशीर्वाद यात्रेसाठी आहेत. त्याच वेळेस राणे महाडमध्ये पत्रकारांशी बोलत होते. पत्रकाराच्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

Follow us on

‘त्यांचं अॅडव्हाईज कोण, त्यांनाच काही कळत नाही. ते काय आम्हाला अॅडव्हाईज करणार? ते काय डॉक्टर आहेत का? तिसऱ्या लाटेचा कुठून आवाज आला त्यांना? आणि ती पण लहान मुलांना? अपशकुनासारखं बोलू नको म्हणाव. त्याला बोलायचा अधिकार तरी आहे का? बाजूला एखादा सेक्रेटरी ठेव आणि बोल म्हणाव. त्या दिवशी नाय का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून? अरे हिरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती. हे काय देशाच्या स्वातंत्र्य दिनाची तुम्हाला माहिती नसावी?’ , अशा शब्दात राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय. नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला मुंबईतून सुरुवात झाली. त्यानंतर आज राणे यांची यात्रा रायगड जिल्ह्यात पोहोचली. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केलीय.